बाळासाहेब पाटील तुम्ही सहकाराचे रक्षक की भक्षक? 2013 चं आंदोलन विसरु नका,राजू शेट्टींचा इशारा

तुम्ही सहकार मंत्री आहात का सह्याद्रीचे चेअरमन आहात ते सांगा, असे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी सहकार मंत्र्यांना केले आहे.

बाळासाहेब पाटील तुम्ही सहकाराचे रक्षक की भक्षक? 2013 चं आंदोलन विसरु नका,राजू शेट्टींचा इशारा
राजू शेट्टी
Follow us
| Updated on: Oct 25, 2021 | 7:03 PM

सातारा: एकरकमी एफआरपी आणि ऊसदराच्या मुद्यावरुन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी सहकारमंत्री बाळासाहेब पाटील  यांना फटकारलं आहे. तुम्ही सहकार मंत्री आहात का सह्याद्रीचे चेअरमन आहात ते सांगा, असे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी सहकार मंत्र्यांना केले आहे. राज्यातील 30 ते 35 साखर कारखाने एक रककमी एफआरपी देण्यास तयार आहेत. मग, सहकार मंत्र्यांना काय अडचण आहे असा सवाल राजू शेट्टींनी केला आहे.

सहकाराचे रक्षक की भक्षक

सातारा जिल्ह्यात स्वर्गीय पी.डी. पाटील आणि यशवंतराव चव्हाण यांचा वारसा सांगत बाळासाहेब पाटील सहकारमंत्री झाले. स्वत: सहकारमंत्र्यांची जबाबदारी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना कायद्याचं संरक्षण देण्याची आहे. त्यांची भूमिका रक्षक असून ते भक्षकासारखं वागत आहेत. कायद्यात तरतूद असूनही एकरकमी एफआरपी विरोधात बाळासाहेब पाटील विरोधात भूमिका घेत आहेत. राज्याचा सहकारमंत्री असून एक टप्प्यात एफआरपी देणं शक्य नाही असं ते म्हणत आहेत. तुम्ही कारखान्याचे चेअरमन आहात की सहकारमंत्री आहात, असा सवाल राजू शेट्टी यांनी केला आहे. तुम्ही सहकारमंत्री अगोदर आणि नंतर कारखान्याचे चेअरमन आहात याची जाणीव करुन देण्याची गरज नाही, असं राजू शेट्टी म्हणाले. सातारा जिल्हाधिकारी यांच्याकडं होणारी ऊस दरासंदर्भातील बैठक रद्द झाली. त्यात तुमचा हात असू शकतो मात्र याची प्रतिक्रिया आजपासून येण्यास सुरुवात होईल, असा इशारा राजू शेट्टी यांनी दिला आहे.

2013 चा इतिहास विसरू नका

राजू शेट्टी यांनी महापूर अतिवृष्टीमुळे शेतकरी अडचणीत आहे आला असून त्यांना महाविकास आघाडी सरकारने वा- यावर सोडले. सरकार अडमुठी भूमिका घेणार असतील तर 2013 प्रमाणे आम्ही आंदोलन करणार आहे. हे लक्षात घ्या असा इशारा त्यांनी सरकारला दिला आहे. राजू शेट्टी कराड येथे पत्रकार परिषदेत बोलत होते. कराडमध्ये 2013 मध्ये झालेल्या आंदोलनाला विसरु नका, असा इशारा देखील राजू शेट्टींनी दिला.

इतर बातम्या:

बिरोबाच्या नावानं चांगभल,भाविकांकडून भंडाऱ्याची उधळण, यंदाची भाकणूक काय सांगते?

समीर वानखेडेंना पहिला धक्का, मुंबई सत्र न्यायालयाने याचिका फेटाळली! आता पुढे काय?

Raju Shetti slam Balasaheb Patil and MVA over Sugarcane FRP in one installment

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.