रत्नागिरीत डेल्टा प्लसचे रुग्ण, प्रशासन ॲलर्ट मोडवर, 100 टक्के लसीकरणाचं टार्गेट, 358 गावात कंटेन्मेंट झोन

राज्यातील काही ठिकाणी डेल्टा प्लस वेरिएंटचे रुग्ण आढळल्यानं प्रशासनाची चिंता वाढली आहे. निर्बंध शिथील न केलेल्या जिल्ह्यांमध्ये रत्नागिरीचा देखील समावेश आहे. त्यातचं जिल्ह्यात डेल्टाचे रुग्ण आढळल्यानं प्रशासन अलर्ट झालं आहे.

रत्नागिरीत डेल्टा प्लसचे रुग्ण, प्रशासन ॲलर्ट मोडवर, 100 टक्के लसीकरणाचं टार्गेट, 358 गावात कंटेन्मेंट झोन
प्रातिनिधिक फोटो
Follow us
| Updated on: Aug 11, 2021 | 4:37 PM

रत्नागिरी: महाराष्ट्रात कोरोना विषाणू संसर्गाची लाट आटोक्यात येत असल्याचं चित्र आहे. गेल्या काही दिवसांपासून रुग्ण संख्या 10 हजारांच्या खाली आहे. राज्य सरकारनं कोरोना विषाणू संसर्ग अधिक असलेले जिल्हे वगळता इतर ठिकाणचे निर्बंध शिथील करण्यात आले आहेत. मात्र, राज्यातील काही ठिकाणी डेल्टा प्लस वेरिएंटचे रुग्ण आढळल्यानं प्रशासनाची चिंता वाढली आहे. निर्बंध शिथील न केलेल्या जिल्ह्यांमध्ये रत्नागिरीचा देखील समावेश आहे. त्यातचं जिल्ह्यात डेल्टाचे रुग्ण आढळल्यानं प्रशासन ॲलर्ट झालं आहे.

रत्नागिरी जिल्ह्यात 358 गावात कंटेन्मेंट झोन

रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुका डेल्टा व्हेरिएंटचा हॉटस्पॉट ठरतोय. त्यामुळे आता जिल्हा आरोग्य यंत्रणा हाय अ‌ॅलर्टवर झालीय. रत्नागिरी जिल्ह्यात एकाच वेळी 20 पेक्षा जास्त रुग्ण सापडलेल्या गावांमध्ये कंन्टेंटमेंट झोन करण्यात आली आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातील 358 गावांमध्ये सध्या कन्टेंटमेंट झोन करण्यात आलेत.

संगमेश्वर तालुक्यात डेल्टा वेरिएंटचा रुग्ण

रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यात डेल्टा वेरिएंटचे रुग्ण सापडलेल्या संगमेश्वरमधील एका वाडीत कडक कंन्टेंटमेंट झोन करण्यात आल्याची माहिची जिल्हा शल्यचिकित्सक संगमित्रा फुले यांनी दिलीय. या गावांमध्ये 100 टक्के लसीकरण आणि टेंस्टिंग करण्याचे प्रयत्न सुरु आहेत, असं देखील त्यांनी सांगितलंय.

डेल्टा प्लसच्या रुग्णांची प्रकृती उत्तम

कोरोनाची दुसरी लाट किंवा दुसऱ्या लाटेतील कोरोना रूग्णांची संख्या कमी होत असताना रत्नागिरीत जिल्ह्यात दोन नव्या डेल्टा प्लस व्हेरिएंटचे रूग्ण आढळून आले आहेत. दोन्ही रूग्ण हे संगमेश्वर तालुक्यातील असून त्यांची प्रकृती उत्तम असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली आहे. त्यामुळे जिल्हावासियांना काळजी करण्याचं कारण नाही. जवळपास महिनाभरापूर्वी या दोन रूग्णांचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. त्याचा रिपोर्ट 9 ऑगस्टला प्राप्त झाला होता.

घाबरून जाऊ नका, राजेश टोपेंचं आवाहन

राज्यात डेल्टा प्लस रुग्णांची वाढ झालीय. राज्यातील रत्नागिरी, जळगाव, पुणे, ठाणे मुंबई बरोबरच बीड आणि औरंगाबाद मध्ये देखील डेल्टाचा वेरियंट आढळल्याची माहिती त्यांनी दिली होती. दरम्यान, यामुळे घाबरून न जाण्याचा सल्ला देखील राजेश टोपे यांनी दिला होता.

रत्नागिरीत शाळा सुरु करण्याची तयारी

17 आँगस्टपासून राज्यातील शाळा सुरु होतायत. रत्नागिरी जिल्ह्यात कोरोनाचे दरोरोज 150 च्या घरात रुग्ण संख्या आहे. त्यामुळे शाळा सुरु करण्यासंदर्भातील निर्णय झालेला नाही. पण शाळा सुरु होण्याच्या दृष्टीनं सध्या शाळा प्रशासनाची तयारी सुरु झालीय. रत्नागिरीतल्या उद्यमनगर येथील सिक्रेट हार्ट कॉन्व्हेट स्कूलमध्ये सध्या साफ सफाई केली जातेय. मुलांना बसावयाची बेंच सॅनिटाईझ केले जात आहेत. शाळेकडून शाळा सुरु होण्यापुर्वीची नियमावली सुद्धा तयार केली गेलीय.

इतर बातम्या:

VIDEO : 25 व्या वर्षी घरातच हेलिकॉप्टर बनवलं, ट्रायलवेळी पंख्याने घात केला, महाराष्ट्राच्या कर्तबगार तरुणाचा मृत्यू

नागपूरच्या तांदूळ घोटाळ्यात अनेक बडे मासे अडकण्याची शक्यता, रेशन दुकानदार संघटना फडणवीसांच्या भेटीला

Ratnagiri Delta Plus Variant update Health Department set target of 100 percent vaccination

धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?
धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?.
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल.
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?.
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट.
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'.
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'.
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य.
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर.
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस.
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?.