BREAKING | साई रिसॉर्ट प्रकरणी मोठी कारवाई, आता तिसरी अटक, आणखी कुणाकुणाच्या अडचणी वाढणार?

दापोली येथील साई रिसोर्ट प्रकरणी आणखी एक मोठी बातमी समोर आली आहे. पोलिसांनी याप्रकरणी आज आणखी एकाला अटक केली आहे. त्यामुळे आता ही कारवाई कुठपर्यंत जाणार हे पाहणं महतत्वाचं ठरणार आहे.

BREAKING | साई रिसॉर्ट प्रकरणी मोठी कारवाई, आता तिसरी अटक, आणखी कुणाकुणाच्या अडचणी वाढणार?
Image Credit source: tv9
Follow us
| Updated on: Mar 16, 2023 | 7:56 PM

मुंबई : दापोली येथील साई रिसोर्ट (Dapoli Sai Resort) प्रकरणी कडक कारवाई सुरुच आहे. ईडीने या प्रकरणी आणखी एकाला अटक केली आहे. या प्रकरणातील ही तिसरी अटक आहे. बीडीओने दिलेल्या तक्रारीनुसार सुधीर पारदुले यांना अटक करण्यात आली आहे. सुधीर पारदुले हे मंडळ अधिकारी आहेत. त्यांना दापोली पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. याआधी या प्रकरणी शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांचे बंधू आणि ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांचे निकटवर्तीय असेलेले सदानंद कदम यांना सर्वात आधी अटक करण्यात आलेली. त्यानंतर दापोलीचे माजी उपविभागीय अधिकारी जयराम देशपांडे यांना ईडीकडून अटक करण्यात आली. तर सुधीर पारदुले यांना आता दापोली पोलिसांनी अटक केलीय.

दापोलीतील साई रिसॉर्ट प्रकरणात ईडीने कारवाईचा धडाका लावला आहे. गेल्या काही दिवसांत छापेमारी आणि चौकशी सुरु ठेवल्यानंतर शिवसेना नेते रामदास कदम यांचे भाऊ सदानंद कदम यांना अटक करण्यात आली. सदानंद कदम हे अनिल परब यांचे निकटवर्तीय असून, त्यांच्या माध्यमातून परब यांनी ना-विकास क्षेत्रावर साई रिसॉर्ट उभारुन आर्थिक अफरातफर केल्याचा आरोप आहे. याप्रकरणात अटकेची टांगती तलवार उभी राहिल्याने अनिल परब यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतलेली.

या प्रकरणी दोन्ही पक्षाची बाजू ऐकल्यानंतर अनिल परब यांना मुंबई उच्च न्यायालयाने दिलासा दिला. कोर्टाने 20 मार्चपर्यंत सक्तीच्या कारवाईपासून अंतरिम संरक्षण दिले आहे. अनिल परब यांच्यावतीने अॅड. अमित देसाई यांनी या प्रकरणाची तातडीची सुनावणी करण्यात यावी, जेणेकरून जबरदस्तीच्या कारवाईपासून अनिल परब यांना संरक्षण मिळेल, अशी विनंती याचिकेद्वारे केली होती. मात्र या प्रकरणात पुढील सुनावणी 20 मार्च 2023 पर्यंत तहकूब करण्यात आली आहे.

ईडीने काही दिवसांपूर्वी सदानंद कदम यांना याप्रकरणी अटक केली होती. ईडी अधिकाऱ्यांनी आधी सदानंद कदम यांच्या घरी छापा टाकला होता. तिथे त्यांनी सदानंद कदम यांना मुंबई येथील ईडी कार्यालयात चौकशीसाठी येण्याची विनंती केली होती. कदम यांनी त्यावेळी आपली तब्येत बरी नसून चौकशीसाठी मुदतवाढची मागणी केलेली. पण ई़डी अधिकाऱ्यांनी त्यांची मागणी फेटाळली होती. त्यानंतर कदम हे आपल्या गाडीने मुंबईत ईडी कार्यालयात दाखल झाले.

ईडी अधिकाऱ्यांनी सदानंद कदम यांची तब्बल चार तास चौकशी केली. या प्रदीर्घ चौकशीनंतर ईडीने सदानंद कदम यांना अटक केली. त्यानंतर त्यांना कोर्टात हजर करण्यात आलं. कोर्टाने सदानंद कदम यांना ईडी कोठडी सुनावली. या सगळ्या घडामोडींनंतर माजी उपविभागीय अधिकारी जयराम देशपांडे यांना अटक करण्यात आली. त्यानंतर आज सुधीर पारदुले यांना अटक करण्यात आली.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.