राज ठाकरे यांची कोकणातील लोकप्रतिनिधींवर टीका, कुणालाच सोडलं नाही, कोकणात खरंच तोफ डागली

"मी जेव्हा मुंबई-गोवा महामार्गावरुन गेलो तेव्हा देवेंद्र फडणवीस यांना फोन केला. अहो त्या रस्त्याचं एकदा बघा. मला बोलले तुम्ही नितीन गडकरी यांच्याशी बोलून घेता का, मी बोललो त्यांच्याशी. नितीन गडकरी यांना फोन केला. इतकी वर्ष झाली रस्ता पूर्ण होत नाही. त्यावर म्हणाले, त्याचे कंत्राटदार पळून गेले. पळून गेले?", असा सवाल राज ठाकरे यांनी केला.

राज ठाकरे यांची कोकणातील लोकप्रतिनिधींवर टीका, कुणालाच सोडलं नाही, कोकणात खरंच तोफ डागली
Follow us
| Updated on: May 06, 2023 | 11:33 PM

रत्नागिरी : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांची आज रत्नागिरीतील खेडमध्ये जाहीर सभा पार पडली. या सभेत त्यांनी बारसू रिफायनरी प्रकल्पाला विरोध करणारी भूमिका अप्रत्यक्षपणे मांडली. यावेळी त्यांनी आपल्या भाषणात कोकणातील लोकप्रतिनिधींवर टीका केली. “व्यापारी लोकप्रतिनिधींना एकदा घरी बसवा. तुमचा राग एकदा या गोष्टींचा व्यक्त होऊ देत की, आम्हाला आजपर्यंत विकत आलात ना तुम्ही. आम्ही तुम्हाला यापुढे किंमत देणार नाही. सगळा खेळ चालू आहे, शिवसेनेचे खासदार काय, आमदार काय, एक म्हणतो पाठिंबा देणार, पक्ष म्हणजो पाठिंबा देणार, खासदार म्हणतो पाठिंबा देणार नाही. पक्ष म्हणून काय भूमिका?”, असा सवाल करत राज ठाकरेंनी निशाणा साधला.

राज ठाकरे यांचा उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा

“पक्ष नसलेल्या पक्षाचे अध्यक्ष आज येऊन गेले. आता काय सांगत आहेत? जी लोकांची भावना असेल ती आमची भावना. अरे व्वा. मग तुम्हाला हवा होता, बाळासाहेब ठाकरे यांच्या नावावर मुंबईच्या महापौरांचा बंगला हा लोकांना विचारुन ढापलात?”, असा खोचक सवाल करत राज ठाकरे यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला.

राज ठाकरे यांचा सरकारवर निशाणा

“आता तुमच्यासमोर येत आहेत की, तुमची भावना. तुमची भावनेला काय अर्थ आहे? लोकं ज्यावेळेला तुम्हाला निवडून देतात त्यावेळेला तुम्ही जनतेचं हित बघितलंच पाहिजे. जनतेचं हित कशामध्ये आहे, त्यांना चार पैसे जास्त कशामध्ये मिळतील, त्यांना घरदार सोडायला लागणार नाही, त्यांच्या पुढच्या ज्या पिढ्या आहेत त्यांना त्रास होणार नाही याची काळजी सरकारने घ्यायचे असते. सरकार काय सांगतंय, त्यांची जी भावना ती आमची भावना”, अशा शब्दांत राज ठाकरे यांनी थेट सरकारवर निशाणा साधला.

हे सुद्धा वाचा

“हे सगळेजण तुम्हाला मुर्ख बनवत आहेत, फसवत आहेत. ही लोकं आजपर्यंत तुम्हाला मुर्ख बनवत आली. अलर्ट राहा. तयारीने या गोष्टींचा विचार करा. हे कधी या प्रदेशाची धुळधान करतील समजणार देखील नाही. सगळ्यांचे व्यापाऱ्याचे हेतू आहेत. या सगळ्या गोष्टींमधून फक्त माझ्या कोकणाला वाचवा ही विनंती करण्यासाठी आज मी इथे तुमच्यासमोर आलो. मी सांगितलेल्या गोष्टींचा आपण गांभीर्याने विचार कराल, एवढंच मी अपेक्षा बाळगतो”, असं आवाहन राज ठाकरे यांनी यावेळी केलं.

राज ठाकरे आणखी काय-काय बोलले?

आज कोकणात आलोय. अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. पण ते प्रलंबित राहण्याची कारणं किंवा उभे राहण्याची कारणं तुम्ही आहात. त्याच त्याच व्यापारी लोकप्रतिनिधी, पक्षांना निवडून देऊन तुम्ही आहे तसेच आहात. तीच तीच माणसं निवडून येत आहेत. राज्य सरकारमध्ये त्यांनाही किंमत नाही. पण त्यांची त्यांची किंमत झालेलीच आहे.

२००७ साली मुंबई-गोवा महामार्गाचं काम सुरु झालं. पण अजून काम सुरु झालं नाही. काय करताय तुमचे आमदार, खासदार, काय करताय तुमचे लोकप्रतिनिधी? कारण त्याच त्याच लोकांना तुम्ही निवडून देत आहात. त्यांना फरकच पडत नाही. त्यांचं असं म्हणणं आहे की, काम केलं किंवा नाही केलं काय, ही माणसं निवडून देणारच आहेत. खाचखळग्यातून जाणारे तुम्ही, तुमच्याबद्दल या लोकांना आपुलकी शुन्य आहे. २००७ ला सुरु झालेला हा प्रकल्प १६ वर्षानंतरही तयाप झालेला नाही.

मी जेव्हा मुंबई-गोवा महामार्गावरुन गेलो तेव्हा देवेंद्र फडणवीस यांना फोन केला. अहो त्या रस्त्याचं एकदा बघा. मला बोलले तुम्ही नितीन गडकरी यांच्याशी बोलून घेता का, मी बोललो त्यांच्याशी. नितीन गडकरी यांना फोन केला. इतकी वर्ष झाली रस्ता पूर्ण होत नाही. त्यावर म्हणाले, त्याचे कंत्राटदार पळून गेले. पळून गेले? ज्यांना आजपर्यंत निवडून दिले त्यांनी एकदा तरी विचारलं का, का पळून गेले? कारण या लोकांना फक्त तुमच्याशी मतदानाचा संबंध आहे.

तोच समृद्ध महामार्ग बघा, नागपूर पासून मुंबईपर्यंत, आता नाशिक, शिर्डीपर्यंत आला, सुरुही झाला ते सुद्धा चार वर्षात. नागपूर ते शिर्डी पुढचं काम सुरु आहे. पण आमच्याकडे १६ वर्ष कोकणात रस्ते होत नाहीयत. मी नेहमी सांगत आलो ना, तुम्हाला गृहीत धरलेलं आहे.

मतदानाचा दिवशी जीवंत राहा, म्हणजे झालं, बाकी तुम्हाला मोजतं कोण? आम्ही त्याच त्याच गोष्टींवर कोकण बोलतोय. पण आम्हाला त्या गोष्टीचा राग येत नाही. आम्हाला वाईट वाटत नाही. आज राज ठाकरे बोलून गेला. उद्या विसरुन जाणार आहात. मनाला लागतही नाही की अरे ते मनाला लागेल असा अपमान करत आहेत. पण आम्हाला त्याचं काही नाही.

आज आम्ही इथे भांडतोय, वाद चालू आहेत, प्रकल्प नाणारला होणार की बारसूला होणार? आता नवीन बारसू कुठून आलं? मला वाटलं नाणारचं नाव बदललं आणि बारसू झालं. हे होताहेत कुठून? मला कोकणातल्या लोकांबद्दल आश्चर्य वाटतं. तुमच्या पायाखालून जागा निघून जाते, शंभर एकरची जमीन निघून जाते, पायाखालचे हजारो एकराचे पॅचेस निघून जातात तुम्हाला समजत नाही?

कळत नाही कोणीतरी विकत घेत आहे म्हणून? सगळ्या लोकप्रतिनिधींना पहिल्यांदा कळतं की प्रकल्प येत आहेत. ते कवडीमोल भावात तुमच्याकडून जमिनी खिशात घालतात, ज्यावेळी प्रकल्प जाहीर होतो तेव्हा हजारपट मोबदला घेऊन मोकळे होतात. नुसता व्यापार चालू आहे.

नाणारमध्ये प्रकल्प आणणार होते. विरोध झाला, आता नाणारला आणला. माझ्याकडे आज कलेक्टर आले होते, त्यांना विचारलं बारसूला किती जमीन हातात आली? ते म्हणाले 1000 एकर आली. कशी आली? मुंबईहून गणपतीला कोकणाला येता, तेव्हा चर्चा करता तेव्हा तुमची जमीन गेलीय ते समजत नाही? याच लोकप्रतिनिधींचे व्यापारी मित्र तुमच्यासमोर फिरत असतात. कवडीमोल किंमतीत जमिनी विकत घेतात. मग सरकारला बड्या दामात विकतात.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.