प्रस्थापित मराठ्यांना विस्थापितांना मोठं होऊ द्यायचं नाही: सदाभाऊ खोत

Sadabhau Khot | राज्यात प्रस्थापित आणि विस्थापित असा प्रकार आहे. प्रस्थापित मराठयांना विस्थापितांना मोठं होऊ द्यायचं नाही, म्हणून राज्यात अनेक मराठा मुख्यमंत्री झाले त्यांनी मराठा समजाला आरक्षण दिले नाही, असेही खोत यांनी सांगितले.

प्रस्थापित मराठ्यांना विस्थापितांना मोठं होऊ द्यायचं नाही: सदाभाऊ खोत
सदाभाऊ खोत, रयत क्रांती संघटना
Follow us
| Updated on: Jun 23, 2021 | 3:20 PM

जळगाव: राज्यातील प्रस्थापित मराठा समाजाला विस्थापितांना मोठं होऊन द्यायचं नाही, असे वक्तव्य रयत क्रांती संघटनेचे प्रमुख सदाभाऊ खोत यांनी केले. त्यामुळेच राज्यात अनेक मराठा मुख्यमंत्री होऊनही मराठा समाजाला आरक्षण (Maratha Reservation) मिळालेले नाही, असा आरोप सदाभाऊ खोत यांनी केला. (Sadabhau Khot on Maratha Reservation issue)

ते बुधवारी जळगावमधील चाळीसगाव येथे शेतकरी संवाद यात्रेच्या कार्यक्रमाला आले होते. यावेळी त्यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन महाविकासआघाडी सरकारला लक्ष्य केले. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी मराठा समाजाला आरक्षण दिले. मात्र, महाविकासआघाडी सरकारला ते टिकवता आले नाही. आतादेखील सर्वोच्च न्यायालय मराठा आरक्षणाची पुनर्विचार याचिका फेटाळून लावेल. ती स्वीकारली तरी मराठा आरक्षणाला मान्यता मिळण्याची शक्यता कमीच असल्याचे सदाभाऊ खोत यांनी म्हटले. राज्यात प्रस्थापित आणि विस्थापित असा प्रकार आहे. प्रस्थापित मराठयांना विस्थापितांना मोठं होऊ द्यायचं नाही, म्हणून राज्यात अनेक मराठा मुख्यमंत्री झाले त्यांनी मराठा समजाला आरक्षण दिले नाही, असेही खोत यांनी सांगितले.

‘श्रीमंत मराठ्यांना एक टक्काही आरक्षण नको, पण बहुजनांना जो न्याय, तोच गरीब मराठ्यांनाही द्या’

‘राज्य सरकार शेतकरी विरोधी आणि पळपुटं’

राज्य सरकार शेतकरी विरोधी आणि पळपुटं आहे. त्यामुळे अधिवेशनापूर्वी हे सरकार बरखास्त करण्याची मागणी आम्ही करणार असल्याचेही सदाभाऊ खोत यांनी सांगितले.

25 तारखेला मुंबईत गोलमेज परिषद

येत्या 25 तारखेला मुंबईत गोलमेज परिषद घेण्यात येणार आहे. त्यात आंदोलनाची दिशा ठरणार आहे. या गोलमेज परिषदेला माजी मुख्यमंत्री नारायण राणे उपस्थित राहणार आहेत. खासदार उदयनराजे भोसले यांनाही परिषदेला आमंत्रित केलं जाणार आहे, असं सांगतानाच प्रश्न सुटेपर्यंत रस्त्यावरचं आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. तसेच केंद्राविरोधात आंदोलन करावं लागलं तर तेही करू, पण सध्या प्रश्न राज्याचा आहे. त्यामुळे राज्य सरकारविरोधात आंदोलन करण्यात येत आहे, असे संभाजीराजे छत्रपती यांनी सांगितले होते.

संबंधित बातम्या:

संभाजीराजे आणि अजित पवारांच्या बैठकीवर समाधानी नाही; मराठा आरक्षण संघर्ष समिती आंदोलनावर ठाम

VIDEO: 36 जिल्ह्यात आंदोलन करण्याची इच्छा नाही, पुढची दिशा आज ठरणार; खासदार संभाजी छत्रपती यांची घोषणा

मराठा मोर्चात जाऊन भुजबळ म्हणाले, आक्रोश मोर्चे मराठ्यांविरोधात नाहीत, दोन्ही समाज अडचणीत

(Sadabhau Khot on Maratha Reservation issue)

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.