Rohit Patil: शाब्बास रोहित… खूप खूप अभिनंदन; रोहित पवारांकडून रोहित पाटील यांचं अभिनंदन

दिवंगत नेते आर. आर. पाटील यांचे चिरंजीव रोहित पाटील यांची राजकारणात दणक्यात एन्ट्री झाली आहे. सांगलीतील कवठेमहंकाळमध्ये रोहित पाटील यांनी बाजी मारली आहे.

Rohit Patil: शाब्बास रोहित... खूप खूप अभिनंदन; रोहित पवारांकडून रोहित पाटील यांचं अभिनंदन
rohit patil
Follow us
| Updated on: Jan 19, 2022 | 6:04 PM

सांगली: दिवंगत नेते आर. आर. पाटील यांचे चिरंजीव रोहित पाटील यांची राजकारणात दणक्यात एन्ट्री झाली आहे. सांगलीतील कवठेमहंकाळमध्ये रोहित पाटील यांनी बाजी मारली आहे. रोहित पाटील यांना नेत्रदीपक विजय मिळाल्यानंतर त्यांच्यावर सर्वच स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. स्वत: राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी रोहित पाटील यांचं ट्विटरवरून अभिनंदन केलं आहे. शाब्बास रोहित… खूप खूप अभिनंदन, अशा शुभेच्छा रोहित पवार यांनी दिल्या आहेत.

राष्ट्रवादीच्या आमदार सुमनताई पाटील यांच्या पायावर शस्त्रक्रिया झाल्याने त्यांचे चिरंजीव रोहित पाटील यांनी नगरपंचायत निवडणुकीची सर्व सूत्रे हाती घेतली होती. रोहित पाटील यांनी जोरदार भाषणं करत विरोधकांना नामोहरण केलं होतं. या निवडणुकीत रोहित पाटील यांच्या राष्ट्रवादी पॅनेलला 10, तर शेतकरी विकास पॅनलला 6 तर अपक्ष 6 जागांवर विजयी झाले आहेत. या विजयानंतर आर. आर. पाटील यांच्या मातोश्री आणि रोहित पाटील यांच्या आजी भागिरथी पाटील यांनी रोहित यांचं औक्षण केलं. हाच फोटो ट्विट करत रोहित पवार यांनी रोहित पाटील यांचं अभिनंदन केलं आहे. शाब्बास रोहित… खूप खूप अभिनंदन, अशा शुभेच्छा रोहित पवार यांनी रोहित पाटील यांना दिल्या आहेत.

पाणी प्रश्न मार्गी लावणार

या निकालानंतर रोहित पाटील यांनी मीडियाशी संवाद साधला. कवठेमहंकाळमधील पाणी प्रश्न अजूनही काही ठिकाणी कायम आहे. त्याच प्रश्नावर सुरुवातील सोडवण्यासाठी आम्ही आधीच काम करायला सुरुवात केली होती. आताही तेच काम सगळ्यात आधी तेच काम पूर्ण करण्यासाठी झटणार आहोत, असं रोहित यांनी सांगितलं. आपला विजय हा लोकांमुळेच शक्य झाला असून या विजयाचं श्रेयदेखील रोहित पाटील यांनी त्यांनाच दिलंय.

विरोधकांना बाप दाखवला

या निवडणुकीच्या प्रचारात रोहित पाटील यांची तोफ धडाधडताना पहिल्यांदाच दिसली. रोहित पाटील यांनी आक्रमक भाषणं करून विरोधकांना नामोहरम केलं. निवडणूक प्रचारातील त्यांची भाषणंही चांगलीच चर्चेचा विषय झाली. खासकरून त्यांनी विरोधकांना त्यांचा बाप दाखवण्याचं केलेलं विधान तर अधिकच चर्चेत ठरलं. यावेळी अनेकांना आरआर आबा पाटील यांची छबीच रोहित यांच्यात दिसत होती. विरोधकांनी टीका करताना रोहित पाटील यांच्यावर निशाणा साधताना ‘त्याला बाप आठवेल’ असा टोला लगावला होता. दरम्यान, या विरोधकांच्या वक्तव्यांना उत्तर देताना विरोधकांना निकालानंतर माझा बाप आठवल्याशिवाय राहणार नाही, असं विधान केलं होतं.

संबंधित बातम्या:

Nagar Panchayat Election result 2022 : केंद्रीय मंत्री भारती पवारांची आमदार दिराकडून धोबीपछाड

Nagar Panchayat Election Results 2022 LIVE : जालना जिल्ह्यातील पाच नगरपंचायतींचे अंतिम निकाल, कोण विजयी, कोणाचा पराभव ?

Election Results: जालन्यात घनसावंगी, तीर्थापुरीवर राष्ट्रवादीचे राजेश टोपेंचे वर्चस्व कायम, इतर तीन ठिकाणचे निकाल वाचा!

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.