AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मराठा आरक्षण लढ्याचे रणशिंग कोल्हापुरमधून फुंकले जाणार, संभाजीराजेंच्या उपस्थितीत महत्वाची बैठक

बैठकीनंतर संभाजीराजे समाधीस्थळावर नतमस्तक होऊन करणार राज्याच्या दौऱ्याला सुरवात करणार आहेत. | sambhaji raje chhatrapati

मराठा आरक्षण लढ्याचे रणशिंग कोल्हापुरमधून फुंकले जाणार, संभाजीराजेंच्या उपस्थितीत महत्वाची बैठक
संभाजीराजे छत्रपती
Follow us
| Updated on: May 23, 2021 | 8:49 AM

कोल्हापूर: संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या मराठा आरक्षण लढ्याचे रणशिंग लवकरच कोल्हापूरमधून फुंकले जाण्याची शक्यता आहे. कारण, संभाजीराजे छत्रपती (sambhaji raje chhatrapati) यांच्या उपस्थितीत सोमवारी कोल्हापुरात महत्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला कायदेतज्ञ आणि तालीम संस्थांचे प्रतिनिधी हजर असतील. शिवाजी पेठेतील शिवाजी मंडळाच्या सभागृहात सोमवारी सकाळी साडेदहा वाजता या बैठकीला सुरुवात होईल. (sambhaji raje chhatrapati hold improtant meeting in Kolhapur regrading Maratha Reservation)

या बैठकीत संभाजीराजे समाजाची भूमिका जाणून घेणार आहेत. बैठकीनंतर संभाजीराजे समाधीस्थळावर नतमस्तक होऊन करणार राज्याच्या दौऱ्याला सुरवात करणार असल्याचे समजते. संभाजीराजे यांनी यापूर्वीच आपण 27मे रोजी मराठा आरक्षणासंदर्भातील भूमिका जाहीर करणार असल्याचे म्हटले होते. त्यामुळे आता कोल्हापुरातील बैठकीत नक्की काय घडणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

‘पंतप्रधान मोदींना चारवेळा पत्र दिले, अद्याप भेट दिली नाही’

मराठा आरक्षणासाठी राज्यभरात आंदोलन करण्यासाठी आग्रही असलेल्या भाजपला संभीजीराजे छत्रपती (sambhaji raje) यांनी चांगल्याच कानपिचक्या दिल्या आहेत. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर तोडगा काढण्यासाठी मला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भेट हवी होती. त्यासाठी मी चारवेळेला पंतप्रधान मोदींना पत्रही दिले. मात्र, अद्याप त्यांनी मला भेटीसाठी वेळ दिलेली नाही, असे सांगत संभाजीराजे छत्रपती यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली होती.

‘आमदार-खासदारांनी माघार घेतली तर बघाच’

माझ्याकडे अनुभव असला तरी मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर माझ्यापेक्षा जास्त अभ्यास असलेले अनेकजण आहेत. त्यांच्याशी चर्चा करुन मी 27 तारखेला माझी भूमिका मांडेन. एकदा मी पाय पुढे टाकला की मागे घेणार नाही. त्यावेळी मराठा आमदार आणि खासदारांनी माझं-तुझं केलं तर बघा, असा इशाराही संभाजीराजे छत्रपती यांनी दिला.

राज्यात भाजपने मराठा आरक्षणासंदर्भात त्यांची भूमिका घ्यावी. मी काही भाजपचा ठेका घेतलेला नाही. त्यांनी मराठा समाजाच्या भावनेशी खेळू नये, त्यावर मार्ग काढावा. आंदोलन काय असतं, हे कोणीही मला शिकवू नये. आक्रमक व्हायला दोन मिनिटं लागतात. आंदोलनाला काय लागतं, आता लगेच करु. पण त्यामध्ये कोणी मयत झाले तर त्याला जबाबदार कोण, शाहुंचा वंशज, असा सवाल संभाजीराजे यांनी उपस्थित केला.

संबंधित बातम्या:

छत्रपतींचे वंशज, मराठा आरक्षणाच्या लढाईतील प्रमुख योद्धा, जाणून घ्या खासदार संभाजीराजेंची राजकीय कारकीर्द

Maratha Reservation: मराठा आरक्षण रद्द, छत्रपती संभाजीराजे म्हणतात, आता ठाकरे सरकारनं ‘हे’ करावं!

Maratha Reservation: ही मोर्चे काढण्याची वेळ नाही, संभाजीराजेंचा पुनरुच्चार

(sambhaji raje chhatrapati hold improtant meeting in Kolhapur regrading Maratha Reservation)

पहलगाम हल्ल्यात मुश्ताक अहमद जरगरचा हात?
पहलगाम हल्ल्यात मुश्ताक अहमद जरगरचा हात?.
पाकिस्तानचे पश्तून लोक भारतासोबत; काय आहे कारण?
पाकिस्तानचे पश्तून लोक भारतासोबत; काय आहे कारण?.
युद्धाची चाहूल? राज्यांना सुरक्षा यंत्रणांची मॉक ड्रिल घेण्याचे आदेश
युद्धाची चाहूल? राज्यांना सुरक्षा यंत्रणांची मॉक ड्रिल घेण्याचे आदेश.
राहुल गांधी पंतप्रधान मोदींच्या भेटीसाठी दाखल, काय होणार चर्चा?
राहुल गांधी पंतप्रधान मोदींच्या भेटीसाठी दाखल, काय होणार चर्चा?.
'मेरा ये वतन..', काश्मीरच्या शाळकरी मुलींनी गायलं देशभक्तीचं गाणं
'मेरा ये वतन..', काश्मीरच्या शाळकरी मुलींनी गायलं देशभक्तीचं गाणं.
'तुला पुढे काय शिकायचं?', उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा वैभवीला फोन
'तुला पुढे काय शिकायचं?', उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा वैभवीला फोन.
विशेष दलाची शोध मोहीम, tv9 चा ग्राऊंड रिपोर्ट
विशेष दलाची शोध मोहीम, tv9 चा ग्राऊंड रिपोर्ट.
काहीतरी मोठं होणार? पंतप्रधान मोदींचा लष्कराला फ्री हँड
काहीतरी मोठं होणार? पंतप्रधान मोदींचा लष्कराला फ्री हँड.
पाकसोबतचा वाद, पुतीन यांचा मोदींना फोन, युद्धजन्य परिस्थितीत काय घडतय?
पाकसोबतचा वाद, पुतीन यांचा मोदींना फोन, युद्धजन्य परिस्थितीत काय घडतय?.
कशाचे पेढे अन् काय.., 12वीचा निकाल लागताच सुप्रिया सुळेंचा वैभवीला फोन
कशाचे पेढे अन् काय.., 12वीचा निकाल लागताच सुप्रिया सुळेंचा वैभवीला फोन.