औरंगजेबाच्या मुद्द्यावरून वार पलटवार, संभाजीराजे यांची प्रकाश आंबेडकर यांच्यावर सडकून टीका; म्हणाले, औरंगजेब हा…

माझी खासदारांना सूचना आहे की, त्यांनी किसान रेल्वे सुरू करण्याबाबत रेल्वेमंत्र्यांकडे आग्रह धरावा. 37 देशात सांगोल्यातील डाळिंब जाते. मात्र किसान रेल्वे बंद असल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे.

औरंगजेबाच्या मुद्द्यावरून वार पलटवार, संभाजीराजे यांची प्रकाश आंबेडकर यांच्यावर सडकून टीका; म्हणाले, औरंगजेब हा...
prakash ambedkar Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Aug 07, 2023 | 7:59 AM

सोलापूर | 7 ऑगस्ट 2023 : औरंगजेब देवेंद्र फडणवीस यांचा हिरो होऊ शकत नाही, पण देशाचा हिरो होऊ शकतो, असं विधान वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केलं आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. त्यावरून प्रकाश आंबेडकर यांच्यावर टीकाही होत आहे. आता या वादात स्वराज्य पक्षाचे नेते आणि माजी खासदार संभाजीराजे यांनी उडी घेतली आहे. संभाजीराजे यांनी याप्रकरणी प्रकाश आंबेडकर यांच्यावर टीका केली आहे.

संभाजीराजे सोलापुरात आले होते. यावेळी त्यांनी प्रकाश आंबेडकर यांच्यावर नाव न घेता टीका केली. औरंगजेब हा देशात कोणत्याही समाजाचा किंवा व्यक्तीचा आदर्श होऊ शकत नाही. जे कोणी असं बोलत असतील ते साफ चुकीचे आहे, असं म्हणत संभाजीराजे यांनी प्रकाश आंबेडकर यांच्यावर पलटवार केला आहे.

हे सुद्धा वाचा

किसान रेल्वे सुरू करा

यावेळी त्यांनी सोलापूर जिल्ह्यातील सांगोल्यातील समस्यांवरही भाष्य केलं. माझी खासदारांना सूचना आहे की, त्यांनी किसान रेल्वे सुरू करण्याबाबत रेल्वेमंत्र्यांकडे आग्रह धरावा. 37 देशात सांगोल्यातील डाळिंब जाते. मात्र किसान रेल्वे बंद असल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. मी सांगोल्यात सर्व ठिकाणी फिरलो. आता येथे पाण्याचे दुर्भिक्ष आहे. येथे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्ड्याचं साम्राज्य आहे. इथे रस्त्याचे काम सुरू आहे. मात्र अतिशय निकृष्ट दर्जाचे रस्ते होत आहेत. त्याचे पुरावे मी स्वतः देईन, असं संभाजीराजे म्हणाले.

गुवाहाटीबद्दल बोलणार नाही

स्वराज्य पक्ष 2024 ला वेगळा पर्याय म्हणून उभा राहील, असा दावाही त्यांनी केला. मी कोणावर वैयक्तिक टीका करणार नाही. गुवाहाटीबद्दल काही बोलणार नाही. गेल्या 75 वर्षात महाराष्ट्रातील राजकारण एवढ्या खालच्या पातळीला कधीच गेले नव्हते, असंही त्यांनी सांगितलं.

राष्ट्रवादी-भाजपवर टीका

यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपची खिल्ली उडवली. राष्ट्रवादी म्हणायची आम्ही पुरोगामी विचाराचे लोक आहोत. जातीयवादी पक्षांसोबत जाणार नाही. तर भाजपचे नेते म्हणायचे, नाही नाही नाही.. आम्ही राष्ट्रवादी सोबत कदापिही युती करणार नाही. वर केंद्रात मोठमोठी भाषणं करतात. मात्र राज्यातही तेच बोलतात. चक्की पिसिंग पिसिंग.

त्यांच्या आमदारांनी सर्वात जास्त टीका पवार कुटुंबावर केली. अजितदादा, शरद पवार यांच्यावर टीका केली. आता त्यांच्याच मांडीला मांडी लावून बसावे लागत आहे. निधी मिळत नाही म्हणून हे सत्तेबाहेर पडले. आता त्याच नेत्याकडे अर्थ खात गेले, अशा शब्दात संभाजीराजे यांनी भाजप आणि राष्ट्रवादीची खिल्ली उडवली.

Non Stop LIVE Update
'टिकल्या, बुचड्या...', कालिचरण महाराजांची नक्कल करत जरांगेंचा पलटवार
'टिकल्या, बुचड्या...', कालिचरण महाराजांची नक्कल करत जरांगेंचा पलटवार.
अनिल देशमुखांवर नागपुरात हल्ला, गाडीवर दगडफेक अन डोक्याला गंभीर दुखापत
अनिल देशमुखांवर नागपुरात हल्ला, गाडीवर दगडफेक अन डोक्याला गंभीर दुखापत.
बारामतीचा दादा कोण? अजित पवार की युगेंद्र? लढाई पुतण्यावरून तापली
बारामतीचा दादा कोण? अजित पवार की युगेंद्र? लढाई पुतण्यावरून तापली.
प्रचाराच्या शेवटच्या दिवशी ठाकरे बंधू भिडले, कोणाची तोफ कोणावर धडाडली?
प्रचाराच्या शेवटच्या दिवशी ठाकरे बंधू भिडले, कोणाची तोफ कोणावर धडाडली?.
'थडग्यावर चादर चढवणारा, हिंदुत्व तोडण्यासाठी निघालेला जरांगे राक्षस'
'थडग्यावर चादर चढवणारा, हिंदुत्व तोडण्यासाठी निघालेला जरांगे राक्षस'.
युगेंद्र पवार यांच्या सभेत शरद पवार यांची रॉयल एन्ट्री... बघा व्हिडीओ
युगेंद्र पवार यांच्या सभेत शरद पवार यांची रॉयल एन्ट्री... बघा व्हिडीओ.
अजित पवारांच्या सभेत मुलगी हरवली? दादा काय म्हणाले? एकदा बघाच...
अजित पवारांच्या सभेत मुलगी हरवली? दादा काय म्हणाले? एकदा बघाच....
दादागिरी वाढली तर उघडावा लागतो तिसरा डोळा अन्...कोल्हेंचा रोख दादांवर?
दादागिरी वाढली तर उघडावा लागतो तिसरा डोळा अन्...कोल्हेंचा रोख दादांवर?.
अजित पवारांच्या बारामतीच्या सांगता सभेला; दादांच्या आईंनी लावली हजेरी
अजित पवारांच्या बारामतीच्या सांगता सभेला; दादांच्या आईंनी लावली हजेरी.
थडग्यावर चादर चढवणारा.., मराठा मोर्चाची कालीचरण महाराजांकडून खिल्ली
थडग्यावर चादर चढवणारा.., मराठा मोर्चाची कालीचरण महाराजांकडून खिल्ली.