Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गुलाबराव पाटील यांचं सट्टा चालवणाऱ्यांशी कनेक्शन?, गुलाबराव देवकर यांचे गंभीर आरोप; जळगाव जिल्ह्यात खळबळ

राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री गुलाबराव देवकर यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटलांवर खळबळजनक आरोप केले आहेत. जळगाव जिल्ह्यात वाळूमाफियांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार सुरू आहे. त्याला पालकमंत्र्यांचे आशीर्वाद आहेत...

गुलाबराव पाटील यांचं सट्टा चालवणाऱ्यांशी कनेक्शन?, गुलाबराव देवकर यांचे गंभीर आरोप; जळगाव जिल्ह्यात खळबळ
gulabrao patilImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: May 29, 2023 | 1:50 PM

जळगाव : जळगाव जिल्ह्यात वाळू माफियांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार सुरू आहे. तसेच जिल्ह्यात सट्टाही सुरू आहे. त्यावरून राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री गुलाबराव देवकर यांनी राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. वाळू माफिायंच्या भ्रष्टाचारात प्रशासनातील अधिकाऱ्यांसोबत पालकमंत्री गुलाबराव पाटील हे देखील सहभागी आहेत. पालकमंत्र्यांची वाहने दररोज धरणगाव तालुक्यात वाळू वाहण्यासाठी फिरत आहेत. गुलाबराव पाटील यांचा सट्टा चालवणाऱ्यांना आशीर्वाद आहे, असा गंभीर आरोप गुलाबराव देवकर यांनी केला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

गुलाबराव देवकर यांनी मीडियाशी संवाद साधताना हा आरोप केला आहे. या जिल्ह्यात वाळू माफियांच्या माध्यमातून मोठा भ्रष्टाचार सुरू आहे. या भ्रष्टाचारात प्रशासकीय यंत्रणा आणि पालकमंत्रीही सामील आहेत. पालकमंत्र्यांची वाहने रोज रेती वाहण्यासाठी धरगाव तालुक्यात फिरत आहेत. पालकमंत्रीच जर रेती वाहतूक करणार असेल आणि सट्टा चालवणाऱ्यांना त्यांचा आशीर्वाद असेल, बोगस रेशन विक्रेत्यांना त्यांचा आशीर्वाद असेल, दारू विक्रेत्यांना त्यांचा आशीर्वाद असेल तर जनतेने न्याया कुणाकडे मागायचा?, असा सवाल गुलाबराव देवकर यांनी केला आहे.

हे सुद्धा वाचा

पालकमंत्री काय करत आहेत?

धरणगाव शहरात पायधी गावात टपऱ्या टपऱ्यावर दारू विकली जाते. सट्टा लावला जातो. हे पालकमंत्री काय करत आहेत? या जिल्ह्यातील, धरणगाव तालुक्याची अक्षरश: दैना सुरू आहे. युवकाचे जीवन उद्ध्वस्त करण्याचं काम पालकमंत्री करत आहेत. त्यामुळे आम्ही प्रशासनाला जाब विचार आहोत. तुम्ही काय धोरण आखणार आहात? काय निर्णय घेणार आहात? बेरोजगारी वाढत आहे. शासन काही करत नाही. तरुण आत्महत्या करत आहेत. त्यावर सरकार काय उपाय करणार आहे? हा सुद्धा आमचा सवाल आहे, असं ते म्हणाले.

रक्षकच भक्षक

जे रक्षक असायला हवेत. तेच भक्षक झाले आहेत. त्यांच्याच माध्यमातून कायदा आणि सुव्यवस्था बिघडवली जात आहे. अवैध रेती वाहतुकीमुळे अपघात होत आहे. आमदार लता सोनावणे यांच्या वाहनाला अपघात झाला. तो रेतीचा ट्रक होता. आव्हाने गावात 15 दिवसांपूर्वी अपघात झाला होता. एका रिक्षाला वाळूच्या ट्रकने धडक दिली होती. रोज अपघात होत आहेत. पण प्रशासन काहीच करत नाही, त्याकडेही आम्ही प्रशासनाचे लक्ष वेधत आहोत, असं देवकर म्हणाले.

मंत्री अदिती तटकरेंच्या जिल्ह्यात 15 हजार महिला अपात्र
मंत्री अदिती तटकरेंच्या जिल्ह्यात 15 हजार महिला अपात्र.
'हो, ते वक्तव्य बरोबर होतं, समजलं?', 'त्या' व्हिडिओवर अजितदादा संतापले
'हो, ते वक्तव्य बरोबर होतं, समजलं?', 'त्या' व्हिडिओवर अजितदादा संतापले.
कोरटकर प्रकरणावरून विरोधक सत्ताधारी भिडले
कोरटकर प्रकरणावरून विरोधक सत्ताधारी भिडले.
अजितदादांच्या 'त्या' व्हिडिओवर गुलाबराव पाटलांची मिश्किल टिपणी
अजितदादांच्या 'त्या' व्हिडिओवर गुलाबराव पाटलांची मिश्किल टिपणी.
'तसा एक नेपाळी महाराष्ट्रात फिरतोय', परबांची राणेंवर नाव न घेता टीका
'तसा एक नेपाळी महाराष्ट्रात फिरतोय', परबांची राणेंवर नाव न घेता टीका.
मराठी असल्याने डायमंड असोसिएशनने नाकारलं सभासदत्व
मराठी असल्याने डायमंड असोसिएशनने नाकारलं सभासदत्व.
माझ्या बाळाला फक्त..., शिंदेंनी मदतीचा हात पुढे करताच आईला अश्रू अनावर
माझ्या बाळाला फक्त..., शिंदेंनी मदतीचा हात पुढे करताच आईला अश्रू अनावर.
माझ्यावर कोणाचाही दबाव नाही; दिशाच्या वडिलांचं मोठं विधान
माझ्यावर कोणाचाही दबाव नाही; दिशाच्या वडिलांचं मोठं विधान.
साताऱ्यातील त्या मजूर कुटुंबातील चिमुकल्याचा वैद्यकीय खर्च शिंदे करणार
साताऱ्यातील त्या मजूर कुटुंबातील चिमुकल्याचा वैद्यकीय खर्च शिंदे करणार.
संतापजनक... कचऱ्यात 6 ते 7 अर्भकं, राज्य महिला आयोगाकडून दखल अन्...
संतापजनक... कचऱ्यात 6 ते 7 अर्भकं, राज्य महिला आयोगाकडून दखल अन्....