Sangli | तासगाव शहरात शिवनेरी मंडळाचे अध्यक्ष अनिल जाधव यांच्यावर तलवारीने वार करुन केली हत्या
ढवळवेस येथे तरूणांमध्ये जुन्या कारणांवरून वाद सुरू असल्याची माहिती अनिल जाधव यांना मिळाली असता ते घटनास्थळी पोहचले. तेथे बाचाबाची, शिवीगाळ आणि बघून घेण्याची भाषा वापरली जात होती. हा वाद मिटवण्यासाठी अनिल जाधव आणि अन्य काही तरूण प्रयत्न करत होते. रात्री साडे नऊच्या दरम्यान ते ढवळवेस येथील चौकात थांबले होते.
सांगली : काल रात्री सांगलीच्या तासगाव येथे एक धक्कादायक (Shocking) घटना घडलीयं. सांगलीच्या तासगाव शहरातील धवळवेस येथील शिवनेरी मंडळाचे अध्यक्ष अनिल जाधव यांच्यावर तलवारीने वार करुन त्यांचा खून (Murder) करण्यात आलायं. ही घटना गुरुवारी रात्री साडेनऊच्या दरम्यान घडलीयं. या प्रकाराने तासगावात एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी अज्ञात हल्लेखोरांचा शोध रात्री उशिरा पोलीस (Police) घेत होते. ढवळवेस येथील काही तरुणांमध्ये जुन्या कारणावरून वाद सुरू होता.
ढवळवेस येथे तरूणांमधील जुन्या वाद सोडवण्यासाठी गेले होते अनिल जाधव
ढवळवेस येथे तरूणांमध्ये जुन्या कारणांवरून वाद सुरू असल्याची माहिती अनिल जाधव यांना मिळाली असता ते घटनास्थळी पोहचले. तेथे बाचाबाची, शिवीगाळ आणि बघून घेण्याची भाषा वापरली जात होती. हा वाद मिटवण्यासाठी अनिल जाधव आणि अन्य काही तरूण प्रयत्न करत होते. रात्री साडे नऊच्या दरम्यान ते ढवळवेस येथील चौकात थांबले होते. यावेळी अचानक आलेल्या हल्लेखोरांनी त्यांच्यावर तलवारीने डोक्यात वार केले. अचानक झालेल्या या हल्ल्याचा अनिल जाधव प्रतिकार करू शकले नाहीत.
धारदार तलवारीने वार करत अनिल जाधव यांचा खून, हल्लेखोरांचा शोध सुरू
अनिल जाधव यांच्यावर तलवारीने जोरदार वार झाल्याने ते रक्ताच्या थारोळ्यात खाली कोसळले. उपचारासाठी त्यांना तासगाव येथील खाजगी रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र उपचारादरम्यान अनिल जाधवांचा जीव गेला. घटनेची माहिती मिळताच तासगाव पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत हल्लेखोरांचा तपास शोध सुरू केला. हल्ल्याची माहिती मिळताच शेकडो तरुणांनी रुग्णालयाबाहेर एकच गर्दी केली होती. या घटनेने तासगावात एकच खळबळ उडाली आहे. आज तासगाव बंद ठेवण्याचा इशारा शिवनेरी मंडळाने घेतला आहे.