Video | गोपीचंद पडळकरांच्या गाडीची पुन्हा तोडफोड, कार्यकर्ते जखमी, सांगलीत वाद उफाळला

सांगली जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात वातावरण चांगलेच तापले आहे. उमदेवार पळवापळीवच्या मुद्द्यावरुन भाजप आमदार गोपीचंद पडळकर तसेच शिवसेना-राष्ट्रवादी गट आमनेसामने आले आहेत. दोन्ही गटात चांगलाच वाद झाला असून पडळकर यांच्या गाडीची तोडफोड करण्यात आलीय. काही कार्यकर्ते जखमीदेखील झाले आहेत.

Video | गोपीचंद पडळकरांच्या गाडीची पुन्हा तोडफोड, कार्यकर्ते जखमी, सांगलीत वाद उफाळला
SANGLI CLASH
Follow us
| Updated on: Nov 07, 2021 | 7:52 PM

सांगली : सांगली जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात वातावरण चांगलेच तापले आहे. उमदेवार पळवापळीवच्या मुद्द्यावरुन भाजप आमदार गोपीचंद पडळकर तसेच शिवसेना-राष्ट्रवादी गट आमनेसामने आले आहेत. दोन्ही गटात चांगलाच वाद झाला असून पडळकर यांच्या गाडीची तोडफोड करण्यात आलीय. काही कार्यकर्ते जखमीदेखील झाले आहेत.

नेमकं काय घडलं ?

सांगली येथे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुका होत आहे. या निवडणुकांमुळे येथील वातावरण सध्या भारले आहे. निवडणूक जिंकण्यासाठी प्रत्येक पक्ष डावपेच आखताना दिसतोय. या घडामोडी घडत असताना आटपाडी येथे सोसायटी गटातील उमेदवार फोडाफोडीच्या मुद्द्यावरुन गोपीचंद पडळकर गट आणि शिवसेना-राष्ट्रवादी गट आमनेसामने आले. या दोन्ही गटात चांगलाच वाद झाला. यामध्ये भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या गाडीची तोडफोड करण्यात आली आहे. तसेच पडळकर यांच्या ताफ्यातील काही गाड्यादेखील फोडण्यात आल्या.

पाहा व्हिडीओ :

कार्यकर्ते जखमी, पोलिसांनी कुमक वाढवली

या वादामध्ये काही कार्यकर्ते जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. आटपाडी येथील साठे चौकात हा प्रकार घडला आहे. आटपाडीमध्ये तणावाचे वातावरण असून वाद वाढण्याची शक्यता लक्षात घेता पोलिसांकडून खबरदारी घेण्यात असून पोलिसांनी आपली कुमक वाढवलीय. यापूर्वीदेखील गोपीचंद पडळकर यांच्या गाडीवर दगडफेक करण्यात आली होती.

21 नोव्हेंबरला मतदान 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी

दरम्यान, सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत दाखल झालेल्या उमेदवारी अर्जांची छाननी 25 ऑक्टोबर रोजी पार पडली. तर 9 नोव्हेंबरपर्यंत अर्ज मागे घेता येणार आहेत. 21 नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून मतमोजणी 23 नोव्हेंबर केली जाईल. अर्ज मागे घेतल्यानंतरच या निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे.

इतर बातम्या :

नरेंद्र मोदींचा जगभर डंका, जगातील सर्वात लोकप्रिय नेते ठरले; ब्रिटन, अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनाही पछाडले

T20 World Cup 2021: न्यूझीलंडकडून अफगाणिस्तानचा पराभव, भारत स्पर्धेबाहेर, किवीजची सेमीफायनलमध्ये एन्ट्री

आगीच्या घटनांमुळे महाराष्ट्र होरपळला, राजेश टोपे यांनी सांगितला ‘मास्टर प्लॅन,’ अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न करणार

(sangli clash between gopichand padalkar and ncp shiv sena activist)

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.