सांगली : सांगली जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात वातावरण चांगलेच तापले आहे. उमदेवार पळवापळीवच्या मुद्द्यावरुन भाजप आमदार गोपीचंद पडळकर तसेच शिवसेना-राष्ट्रवादी गट आमनेसामने आले आहेत. दोन्ही गटात चांगलाच वाद झाला असून पडळकर यांच्या गाडीची तोडफोड करण्यात आलीय. काही कार्यकर्ते जखमीदेखील झाले आहेत.
सांगली येथे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुका होत आहे. या निवडणुकांमुळे येथील वातावरण सध्या भारले आहे. निवडणूक जिंकण्यासाठी प्रत्येक पक्ष डावपेच आखताना दिसतोय. या घडामोडी घडत असताना आटपाडी येथे सोसायटी गटातील उमेदवार फोडाफोडीच्या मुद्द्यावरुन गोपीचंद पडळकर गट आणि शिवसेना-राष्ट्रवादी गट आमनेसामने आले. या दोन्ही गटात चांगलाच वाद झाला. यामध्ये भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या गाडीची तोडफोड करण्यात आली आहे. तसेच पडळकर यांच्या ताफ्यातील काही गाड्यादेखील फोडण्यात आल्या.
पाहा व्हिडीओ :
या वादामध्ये काही कार्यकर्ते जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. आटपाडी येथील साठे चौकात हा प्रकार घडला आहे. आटपाडीमध्ये तणावाचे वातावरण असून वाद वाढण्याची शक्यता लक्षात घेता पोलिसांकडून खबरदारी घेण्यात असून पोलिसांनी आपली कुमक वाढवलीय. यापूर्वीदेखील गोपीचंद पडळकर यांच्या गाडीवर दगडफेक करण्यात आली होती.
दरम्यान, सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत दाखल झालेल्या उमेदवारी अर्जांची छाननी 25 ऑक्टोबर रोजी पार पडली. तर 9 नोव्हेंबरपर्यंत अर्ज मागे घेता येणार आहेत. 21 नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून मतमोजणी 23 नोव्हेंबर केली जाईल. अर्ज मागे घेतल्यानंतरच या निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे.
इतर बातम्या :
(sangli clash between gopichand padalkar and ncp shiv sena activist)