सांगलीमध्ये कोरोनाचा विस्फोट; एकाच दिवशी 303 नव्या रुग्णांची नोंद
सांगली जिल्ह्यात आज कोरोनाचा विस्फोट झाला आहे. एकाच दिवसात तब्बल 303 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. 303 नव्या कोरोनाबाधितांसह जिल्ह्यातील सक्रीय कोरोनाबाधितांचा एकूण आकडा 955 वर पोहोचला आहे.
सांगली : सांगली जिल्ह्यात आज कोरोनाचा विस्फोट झाला आहे. (Sangli Corona Update) एकाच दिवसात तब्बल 303 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. 303 नव्या कोरोनाबाधितांसह जिल्ह्यातील सक्रीय कोरोनाबाधितांचा एकूण आकडा 955 वर पोहोचला आहे. तर आज दिवसभरात 77 जणांनी कोरोनावर मात केली आहे. 303 नव्या कोरोनाबाधित रुग्णांमध्ये सांगली महापालीका क्षेत्रातील 122 जणांचा समावेश आहे. तर उर्वरित रुग्ण हे ग्रामिण भागामधील आहेत. सागलीमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने प्रशासन सतर्क झाले आहे. कोरोना संर्गाला आळा घालण्यासाठी विविध उपाययोजनांची अमंलबजावणी करण्यात येत आहे. प्रतिबंधामध्ये देखील वाढ करण्यात आली आहे. प्रशासनाकडून नागरिकांना वारंवार कोरोना नियमांचे पालन करण्याचे आव्हान करण्यात येत आहे.
शहरी भागातील रुग्णांचे प्रमाण अधिक
दरम्यान सांगली महापालिका क्षेत्र आणि सांगली ग्रामीणमध्ये दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा वाढत असलयाचे दिसून येत आहे. विशेष: शहरी भागातील रुग्णांचे प्रमाण अधिक आहे. आज दिवसभरात तब्बल 303 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. यातील 122 रुग्ण हे सांगली महापालिका क्षेत्रातील आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्बंध अधिक कडक करण्यात आले आहेत.
प्रशासनाकडून कोरोना नियम पाळण्याचे आवाहन
सांगली जिल्ह्यात कोरोना रुग्णांची वाढत असलेली संख्या पहाता जिल्हा प्रशासनाची चिंता वाढली आहे. जिल्हा प्रशासनाकडून वारंवार नागरिकांना कोरोनाचे नियम पाळण्याचे, गर्दी न करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. तसेच जे नागरिक कोरोना नियमांचे उल्लंघन करताना आढळून येतील त्यांच्यावर दंडात्मक कारवाई देखील करण्यात येत आहे. मात्र तरी देखील अनेक नागरिक हे कोरोना नियमांचे उल्लंघन करत असल्याचे पहायला मिळत आहे.
संबंधित बातम्या
‘आई आता आपण काय करायचं गं?’ अपघातात दगावलेल्या सलीलच्या मुलाचा सवाल, कुटुंब संकटात!
पीएनबीच्या ग्राहकांना अलर्ट: बँक सेवा शुल्कात बदल, लॉकरच्या दरात वाढ