प्रांताधिकाऱ्यांवर अतिक्रमणाचा आरोप, सांगलीतल्या दाम्पत्यानं पोलिसांकडे मागितली इच्छा मरणाची परवानगी

सांगलीत एका दाम्पत्याने प्रांताधिकाऱ्यांवर गंभीर आरोप केले आहेत. पतीने पोलिसांकडे इच्छामरणाची मागणी केली आहे. तर पत्नीने त्यापुढे जात महापालिकेत थेट आत्मदहनाचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

प्रांताधिकाऱ्यांवर अतिक्रमणाचा आरोप, सांगलीतल्या दाम्पत्यानं पोलिसांकडे मागितली इच्छा मरणाची परवानगी
Follow us
| Updated on: May 18, 2023 | 10:24 PM

सांगली : सांगलीतल्या एका दाम्पत्याने हक्काच्या जागेसाठी आता थेट मरणाचा मार्ग स्वीकारला आहे. पतीने विशेष पोलीस महानिरीक्षकांकडे इच्छा मरणाची परवानगीची मागणी केली आहे. तर पत्नीने थेट आत्मदहनाचा प्रयत्न केला आहे. शहरातल्या त्यांच्या मिळकतीच्या जागेवर एका प्रांताधिकारी असणाऱ्या एका अधिकाऱ्याकडून अतिक्रमण करण्यात आल्याचा आरोप करण्यात आलाय. या आरोपातून सुनील पाटील दाम्पत्याने हे टोकाचं पाऊल उचललं आहे.

सांगली शहरातल्या दक्षिण शिवाजीनगर इथल्या जुन्या माळी चित्र मंदिराच्या मागील बाजूस सुनील पाटील यांनी 2006 मध्ये दोन गुंठे जागा खरेदी केली. त्याची रीतसर नोंद देखील केली. त्यांच्याकडे असणाऱ्या उपलब्ध कागदपत्रांच्या अनुसार त्यांच्या आणि जुन्या मालकामध्ये 2 हजार 100 स्क्वेअर फुट जागेची खरेदी झाली.

अधिकाऱ्याने हक्काच्या जागेवर अतिक्रमण केल्याचा आरोप

यानंतर पाटील यांच्या असणाऱ्या भूखंडावर पूर्वीच्या बाजूने सुमारे 300 स्केवर फूट अतिक्रमण झाले आहे. त्यांच्या जागी शेजारी असणाऱ्या गजानन गुरव यांनी हे अतिक्रमण केल्याचा आरोप सुनील पाटील यांनी केला आहे. गजानन गुरव हे पंढरपूर या ठिकाणी सध्या प्रांताधिकारी म्हणून कार्यरत आहेत. उच्च अधिकारी असल्यामुळे त्यांनी आपल्या पदाचा गैरवापर करत आपल्या हक्काच्या जागेवर अतिक्रमण केल्याचा आरोप देखील केला आहे.

हे सुद्धा वाचा

प्रांताधिकाऱ्यांना महापालिकेकडून परवानगी

याबाबत सुनील पाटील यांनी अगदी जागेशी संबंधित असणाऱ्या विविध विभागांमध्ये पोलीस ठाण्यामध्ये तक्रारी केल्या. मात्र त्यांच्या पदरी निराशा आली आहे. याप्रकरणी सुनील पाटील यांनी जागेचे मूळ मालक माळी यांच्या समवेत गुरव यांच्या विरोधात न्यायालयात धाव घेतली आहे. गुरव यांनी आपल्या जागेवर आता बांधकाम केलं आहे. याला महापालिकेकडून बांधकामाची परवानगी देखील मिळाली आहे. त्यामुळे पाटील कुटुंब पुन्हा या आपल्या जागेच्या मिळकतीवरून आक्रमक झाले आहे.

पाटील दाम्पत्य आक्रमक

गुरव एक उच्च अधिकारी असल्यामुळे त्यांच्याकडून पदाचा गैरवापर करत प्रशासकीय यंत्रणेला हाताशी धरून कारभार सुरू असल्याचा आरोप पाटील दाम्पत्याने केला आहे. त्यामुळे न्याय मिळत नसल्याने पाटील दाम्पत्य हतबल झाले आहे. त्यांनी आता शेवटचा मार्ग म्हणून मरणाचा मार्ग स्वीकारला आहे. सुनील पाटील यांनी कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांच्याकडे इच्छा मरण अर्ज दाखल केला आहे. आपल्याला न्याय मिळत नसल्याने इच्छा मरण द्यावे, अशी मागणीचे निवेदन त्यांनी दिले आहे.

दुसरीकडे महापालिकेकडे तक्रार दाखल करून देखील गुरव यांना बांधकाम परवाना देण्यात आला आहे. त्यामुळे मनस्तापाने आपल्या पतीला इच्छा मरण मागण्याची वेळ आली, पाटील यांच्या पत्नी सारिका पाटील यांनी थेट महापालिकेच्या कार्यालयात जाऊन महापौरांच्या दालनामध्ये अंगावर डिझेल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला.

महापौर काय म्हणाले?

महापालिकेचे महापौर यांनी या प्रकरणाचा दुजोरा देत गुरुव यांनी अतिक्रमण केलेले आहे. तसेच भूमापनकडे आम्ही कागद पाठवले आहेत. कागद पाहून योग्य तो निर्णय आयुक्त घेतील. मात्र सिटीसर्वे आणि सातबारा या दोन्हींच्यामध्ये नावे वेगवेगळे असल्यामुळे हा घोळ झाल्याचा समोर आलं. मात्र पाटील कुटुंब त्रस्त झाले आहे. त्यांना न्याय मिळवून नक्कीच महापालिका देईल, असा विश्वास महापौर यांनी दिला आहे.

जागेच्या अतिक्रमणाबाबत पंढरपूरचे प्रांताधिकारी गुरव यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी हे सर्व प्रकरण सध्या न्यायप्रविष्ठ असल्याने आपण याबाबत काही बोलू शकत नसल्याचे स्पष्टीकरण दिले आहे. पण एकूणच या सर्व प्रकरणात पाटील दाम्पत्याने न्याय मिळत नसल्याने थेट आता मरणाचा मार्ग स्वीकारला आहे. तर राज्य सरकारनेच या प्रकरणात लक्ष घालावं आणि संबंधित प्रांताधिकार यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी देखिल पाटील दांपत्याने केली आहे.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.