बार्शीत गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं? गौतमी पाटील हिची पहिली प्रतिक्रिया

डान्सर गौतमी पाटील हिच्याविरोधात बार्शीत गुन्हा दाखल झालाय. गौतमी बार्शीत उशिराने मंचावर आली होती. याशिवाय आयोजकांनी गौतमीवर फसवणुकीचे गंभीर आरोप केले आहेत. या सर्व प्रकारावर गौतमी पाटील हिने आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

बार्शीत गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं? गौतमी पाटील हिची पहिली प्रतिक्रिया
Follow us
| Updated on: May 15, 2023 | 9:53 PM

मुंबई : डान्सर गौतमी पाटील हिच्या विरोधात बार्शीत गुन्हा दाखल झालाय. या प्रकरणावर गौतमी पाटील हिची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. गौतमीने ‘टीव्ही 9 मराठी’सोबत खास बातचित केली. यावेळी तिने विविध प्रश्नांवर सविस्तर प्रतिक्रिया दिली. “मला या गोष्टीची अजूनही माहिती नाही. मी अजून याबाबत कोणतीही माहिती घेतलेली नाही. मी याबाबतचा व्हिडीओ दुपारी पाहिला. मी याबाबत पूर्ण माहिती काढून सविस्तर माहिती देईन. आता सध्या तरी मी याबाबत काहीच बोलू शकत नाही”, अशी प्रतिक्रिया गौतमीने बार्शीत घडलेल्या घटनेवर दिलीय.

“मी वेळेत पोहोचले होते. आजपर्यंत असं घडलं नाहीय की, लेट गेले आणि उशिराने कार्यक्रम सुरु झालाय. मी वेळेत पोहोचले होते. मला दहा वाजेपर्यंत परवानगी असते. माझ्या कार्यक्रमाला पोलीस असतात. त्यांची साथ असते. त्यामुळे त्यांचं म्हणणं मला ऐकावं लागणार. ते मला म्हटले दहाला कार्यक्रम बंद करा. तर मी दहा वाजता कार्यक्रम बंद करणारच आहे. याबाबत मी सविस्तर माहिती घेऊन आपल्याशी बोलेन”, अशी प्रतिक्रिया गौतमीने दिली.

‘सबसे कातील गौतमी पाटील’ का म्हणतात?

“प्रेक्षकांचं प्रेम आहे. मला संपूर्ण महाराष्ट्र प्रेम करतोय. या गोष्टीचं खूप छान वाटतंय. मी इतकंच म्हणते की, असंच प्रेम कायम राहूद्या. आमच्या कार्यक्रमात आता महिला वर्गही यायला लागला आहे. त्यामुळे जास्त छान वाटतं”, असं गौतमी पाटील म्हणाली. “प्रेक्षकांनीच मला प्रेम दिलं आहे. सबसे कातील गौतमी पाटील असं मला प्रेक्षकांनीच नाव दिलं आहे. त्यांनी मला इथपर्यंत आणलं, हे त्यांचेच उपकार आहेत”, असं गौतमी पाटील म्हणाली. दरम्यान, बार्शीतल्या प्रकरणावर पुन्हा प्रश्न विचारण्यात आला असता, “मी वेळेत पोहोचले होते. पण मी जास्त बोलू शकत नाही. कारण मी पूर्ण माहिती घेतलेली नाही. मी सगळा विषय जाणून घेईन”, असं गौतमी पाटीलने सांगितलं.

हे सुद्धा वाचा

वर्षभराच्या तारखा बूक आहेत?

गौतमी पाटील हिला यावेळी एक महत्त्वाचा प्रश्न विचारण्यात आला. तिच्या वर्षभराच्या तारखा बूक आहेत का? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर तिने नाही, असं उत्तर दिलं. “माझ्या कार्यक्रमासाठी वर्षभराच्या तारख्या बूक नाहीत. फक्त एवढ्या महिन्याच्या तारखा बूक आहेत. पुढच्या महिन्याच्या तारखा खाली आहेत”, असं गौतमीने सांगितलं.

लग्न कधी करणार?

“अजून लवकर लग्न करणार नाही. कारण आताच सुरुवात झालीय. एवढ्या लवकर लग्न करणार नाही. ज्यावेळेस लग्न ठरेल आणि करायचा विचार करेन त्यावेळी तुम्हाला नक्की सांगेन”, अशी प्रतिक्रिया गौतमीने दिली.

उदयनराजेंची भेट का घेतली?

गौतमीने आज खासदार उदयनराजे भोसले यांची भेट घेतली. या भेटीवरही गौतमी पाटील हिने प्रतिक्रिया दिली. “उदयनराजे भोसले यांच्या आशीर्वादासाठी त्यांना भेटले. त्यांना दोन मिनिटे भेटले आणि कार्यक्रमाला आले”, असं गौतमीने सांगितलं.

गौतमी पाटील हिचं प्रेक्षकांना आवाहन

मला कुठल्याही राजकारणात यायचं नाही. मी कलाकार आहे. मी माझी कला सादर करत असणार आहे, अशी प्रतिक्रिया तिने यावेळी दिली. यावेळी गौतमीने प्रेक्षकांनाही महत्त्वाचं आवाहन केलं. “माझं एवढंच सांगणं आहे की, तुम्ही एवढ्या लांबून माझ्या कार्यक्रमाला येत असतात, तुमचं माझ्यावर प्रेम आहे. माझं एकच म्हणणं आहे, प्रत्येक कार्यक्रमाला वाद होत नाहीत. थोडंफार होतं. पण ते पुढे वाढवलं जातं. त्यामुळे काहीतरी चर्चा होते. कार्यक्रमाला या, कार्यक्रम इन्जॉय करा”, असं आवाहन गौतमी पाटील हिने केलं.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.