VIDEO : ’21 वर्ष काम करुन वेतन नाही’, प्राध्यापकाच्या पत्नीचं पुण्यात शिक्षण संचालक कार्यालयाबाहेर श्राद्ध घालत आंदोलन

अहमदनगर जिल्ह्यातील शेवगावच्या कांचन बनसोडे (Kanchan Bansode) या महिलेने मृत प्राध्यापकाच्या वेतन आणि इतर लाभाची मागणी पूर्ण न झाल्यानं अखेर थेट पुण्याच्या शिक्षण संचालक कार्यालयाबाहेर श्राद्ध घालत आंदोलन केलंय.

VIDEO : '21 वर्ष काम करुन वेतन नाही', प्राध्यापकाच्या पत्नीचं पुण्यात शिक्षण संचालक कार्यालयाबाहेर श्राद्ध घालत आंदोलन
Follow us
| Updated on: Aug 26, 2021 | 9:49 PM

पुणे : अहमदनगर जिल्ह्यातील शेवगावच्या कांचन बनसोडे (Kanchan Bansode) या महिलेने मृत प्राध्यापकाच्या वेतन आणि इतर लाभाची मागणी पूर्ण न झाल्यानं अखेर थेट पुण्याच्या शिक्षण संचालक कार्यालयाबाहेर श्राद्ध घालत आंदोलन केलंय. त्यांचे पती बाळासाहेब बनसोडे यांचा मृत्यू होऊन 1 वर्ष पूर्ण झालं मात्र, त्यानंतरही त्यांच्या हक्काच्या वेतन आणि इतर लाभांवर निर्णय न झाल्यानं त्यांनी पतीचं वर्षश्राद्ध शिक्षण संचालकांच्या कार्यालयाबाहेर घातलं. त्यांच्या पतीला 21 वर्षे पूर्णवेळ अधिव्याख्याता म्हणून काम करुन घेऊनही वेतन न दिल्याचा आरोप पीडित महिलेनं केलाय. (Shevgaon Ahmednagar Professor wife protest in front of Pune education office for salary demand).

पीडित महिला कांचन बनसोडे यांनी शिक्षण संचालक उच्च शिक्षण (महाराष्ट्र राज्य, पुणे) यांच्या कार्यालयाबाहेर पतीचं श्राद्ध घालत आंदोलन केलं. विशेष म्हणजे मागील 1 वर्षांपासून त्यांनी या प्रकरणात न्याय मिळावा म्हणून शिक्षणाधिकाऱ्यांपासून उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यापर्यंत पाठपुरावा केला. मात्र, त्यांना न्याय मिळाला नाही, असा आरोप त्यांनी केलाय. त्यांचे पती प्राध्यापक बाळासाहेब नामदेव बनसोडे हे अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यात आबासाहेब काकडे कला महाविद्यालय, बोधेगाव येथे काम करत होते.

पीडित महिलेचे नेमके आरोप काय?

1. शिक्षण सहसंचालकांवरील आरोप

मृत प्रा. बाळासाहेब नामदेव बनसोडे यांचे चार वेळा वेतन अनुदान निर्धारण केले, तीन वेळा पूर्णवेळ वेतन मान्य करूनही मृत्यू येईपर्यंत अर्धवेळ वेतन बिल स्वीकारले, 21 वर्ष सेवा होऊनही वेतन निश्चिती केली नाही, कोणत्याही वेतन आयोगाचे लाभ शेवटपर्यंत मिळू दिले नाहीत, रिकव्हरीच्या (recovery) नावावर घेण्यात आलेल्या 1,32,000 रुपये 12 वर्षांपासून कोठे आहेत याचा थांगपत्ता लागू दिला नाही, सुनावणीत शिक्षण विभागानं शतशः खोटी व चुकीची माहिती सादर केली, स्वतःच्या दालनात प्राचार्यांना बोलावून चौकशी अहवाल संगनमताने सादर केला, संस्था व प्राचार्य यांच्याशी संगनमत करून मनमानीपणाने, बेकायदेशीर रितीने केव्हाही, कुणालाही पूर्णवेळचे अर्धवेळ, CHB करण्यात आले.

2. पुणे शिक्षण संचालकांवरील आरोप

कलम 14 नुसार सर्वासाठी कायदा समान असताना काही व्यक्तींसाठी एक कायदा व इतरांसाठी एक कायदा असा न्याय या विभागाने केला. सहसंचालक कार्यालयाने केलेल्या अन्यायाकडे वर्षानुवर्षे डोळेझाक करण्यात आले. प्राध्यापक बनसोडे मृत्यू होण्यापूर्वी जवळपास 12 वर्ष त्याच्यावरील अन्यायाची दाद पुणे कार्यालयाकडे मागत राहिले, तरीही या कार्यालयाने दखल घेतली नाही. अखेर बनसोडे यांचा मृत्यू झाला. कार्यालयाने संस्था, प्राचार्य, सहसंचालक कार्यालयाने केलेल्या अन्यायावर, छळावर, पांघरून घालण्याचं काम केलं.

3. शिक्षण विभाग, पुणेवरील आरोप

उच्च व तंत्र शिक्षण विभागाकडे माझ्या पतीवर झालेल्या अन्यायाची, चौकशी अधिकाऱ्यांच्या फसवणुकीची तक्रार केली. त्यावर या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी दुसऱ्या अशा शिक्षण सह संचालक अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आली ज्यांच्या मालमत्तेची ईडीमार्फत चौकशी करण्याची मागणी अनेक संघटना करत आहेत.

4. प्राचार्यांवरील आरोप

आबासाहेब काकडे कला महाविद्यालयातील प्राचार्यांनी इंग्रजी शब्दही वाचता येत नसताना, सेट-नेट उत्तीर्ण नसतानाही स्वतःला लाखाच्या पुढे वेतन घेतलं. दुसरीकडे सेट, नेट, पीएचडी असलेल्या पूर्णवेळ प्राध्यापकांना मृत्यू येईपर्यंत शिपाई पदाएवढे वेतन दिले. त्यांनी दोन पूर्णवेळ प्राध्यापकांचं काम एकाच प्राध्यापकाकडून करून घेतलं, मात्र वेतन एका पदाचं आणि तेही अर्धवेळचं दिलं. PF ची रक्कम 12 वर्ष बेकायदेशीर रितीने वापरली, रिकव्हरी (recovery) रक्कम शिक्षण सहसंचालक कार्यालयाला दिली की गहाळ झाली याची कोणतीही माहिती नाही. त्यांनी खोटी कागदपत्रे तयार करून चुकीचे असेसमेंट (assessment) करुन घेतले, प्राध्यापक बनसोडे यांच्या मृत्यूनंतर मूळ सेवापुस्तिकेत खाडाखोड केली. 16 सप्टेंबर 2011 रोजी शिक्षण सहसंचालक कार्यालयाने पूर्णवेळ वेतन मान्य करून देखील अर्धवेळ वेतन बिल पाठवले. त्यांनी एका गरीब हुशार प्राध्यापकाचा इतका मानसिक, आर्थिक छळ, फसवणूक केली की त्या प्राध्यापकाचा पहिल्याच हृदय विकाराच्या तीव्र झटक्यानं मृत्यू झाला.

“न्यायासाठी 17 दिवस उपोषण केल्यानंतर प्राणघातक हल्ला”

“माझ्या पतीला न्याय मिळविण्यासाठी मी शेवगाव पोलीस स्टेशनसमोर आमरण उपोषणाचा मार्ग देखील अवलंबला होता. मात्र 17 दिवस उपोषण केल्यानंतर माझ्यावर प्राणघातक हल्ला करवून माझे उपोषण उधळून लावण्यात आले. उपोषणानंतर शिक्षण संचालक उच्च शिक्षण महाराष्ट्र राज्य (पुणे) व शिक्षण सहसंचालक उच्च शिक्षण पुणे यांच्या दालनात अनेकदा सुनावणी झाल्या. मोहन खताळ (शिक्षण सहसंचालक पुणे) व दिगंबर गायकवाड (शिक्षण सहसंचालक औरंगाबाद) यांच्या अध्यक्षते खाली महाविद्यालयाच्या सखोल चौकशीचे आदेश देण्यात आले. अहवाल सादर करण्यात आले व हा अहवाल शेवटी उच्च शिक्षण संचालक धनराज माने यांनी या प्रकरणी योग्य आदेशासाठी शासनाकडे पाठविला,” असं कांचन बनसोडे यांनी सांगितलं.

“डोळ्यानं दिसंना, काम होईना, तुमच्या पाया पडते, माझ्या लेकराच्या कष्टाचं आहे तेच द्या”

मृत अधिव्याख्याते बाळासाहेब बनसोडे यांच्या वयोवृद्ध आईने देखील मुलाच्या कष्टाचे वेतन देण्याची मागणी केलीय. त्या म्हणाल्या, “डोळ्यानं दिसंना, काम होईना, आजारी पडते आहे. तुमच्या पाया पडते, माझ्या लेकराच्या कष्टाचं आहे तेच द्या.”

हेही वाचा :

“21 वर्षे पतीकडून काम करुन घेतलं, वेतन नाही, मृत्यूनंतरही न्याय नाही”, पीडितेचा आत्मदहनाचा इशारा

व्हिडीओ पाहा :

Shevgaon Ahmednagar Professor wife protest in front of Pune education office for salary demand

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.