25 वर्षांपासून क्षीरसागरांची एक हाती सत्ता, नगरपालिकेने महावितरणाचं बिल थकवलं, बीड अंधारात, शिवसंग्रामचं आंदोलन
गेल्या अनेक वर्षांपासून शहरात बंद असलेल्या पथ दिव्याच्या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी शिवसंग्रामकडून बीडच्या शाहूनगर भागात रात्रभर कंदील लावून आंदोलन करण्यात आलंय. (Shiv Sangram agitation Against Beed Nagar Parishad over Road Street light issue)
बीड : बीड नगरपरिषदेच्या ढिसाळ कारभाराविरोधात शिवसंग्राम संघटना आक्रमक झाली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून शहरात बंद असलेल्या पथ दिव्याच्या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी शिवसंग्रामकडून बीडच्या शाहूनगर भागात रात्रभर कंदील लावून आंदोलन करण्यात आलंय. (Shiv Sangram agitation Against Beed Nagar Parishad over Road Street light issue)
25 वर्षांपासून क्षीरसागरांची एक हाती सत्ता
शहरातील पथदिवे बंद असल्याने अपघात, गुन्हेगारी त्याबरोबरच महिला सुरक्षित नाहीय. जवळपास 25 वर्षांपासून क्षीरसागर कुटुंबीयांची बीड नगरपालिकेवर एक हाती सत्ता आहे. परंतु नगरपालिकेने महावितरणाचे बिल थकवले असल्यानं, बीडकरांना याचा त्रास सहन करावा लागतोत.
याबाबत अनेक वेळा पाठपुरावा करून देखील सदरील प्रश्न मार्गी लागत नसल्याने, हे आंदोलन करण्यात आलं आहे. बीड शहरातील जवळपास 90 टक्के भाग अंधारात आहे. तरी देखील नगरपालिका याकडे दुर्लक्ष करतेय. वेळीच हा प्रश्न मार्गी लावला नाही, तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी शिवसंग्राम संघटनेकडून देण्यात आला आहे.
शिवसंग्रामचे कार्यकर्ते आक्रमक
शहरातील नागरिकांना ज्या सुविधा नगरपरिषदेने द्यायला हव्यात, त्या सुविधा नगरपरिषद देत नाही. यासाठी आम्ही वेळोवेळी आंदोलन केलेलं आहे. शहरातील पथदिव्यांचा प्रश्नासंदर्भात मी आणि आमची संघटना गेले अनेक दिवस आंदोलन करतो आहे. परंतु नगरपरिषद कोणत्याच पद्धतीने लक्ष देत नाहीये. आता आम्ही आज या आंदोलनाद्वारे इशारा देतोय की जर शहरातील पथदिव्यांचा प्रश्न लवकरात लवकर सोडवला नाही तर आम्ही यापुढे तीव्र आंदोलन करुन नगर परिषदेला धडा शिकवू, अशी आक्रमक भूमिका शिवसंग्रामचे कार्यकर्ते दत्ता गायकवाड यांनी घेतली. यावेळी आमदार विनायक मेटे आप आगे बढो, मह तुम्हारे साथ है, अशा जोरदार घोषणा देण्यात आल्या.
(Shiv Sangram agitation Against Beed Nagar Parishad over Road Street light issue)
हे ही वाचा :
अरुण गवळीचा 28 दिवसांच्या संचित रजेसाठी अर्ज, कुटुंबाला भेटण्यासाठी फर्लोची मागणी
लै पुण्य लागल ब्वा… नांदेडच्या अवलियाची रुग्णसेवा, समाजाला ‘नको’ असलेल्या उपेक्षितांचा ‘कायापालट’!