कदम समर्थकांना बाहेरचा रस्ता, शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या नव्या नियुक्त्या जाहीर; रामदास कदम यांना धक्का
शिवसेना नेते रामदास कदम आणि त्यांचे चिरंजीव आमदार योगेश कदम यांना शिवसेनेने मोठा धक्का दिला आहे. शिवसेनेने नव्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत.
रत्नागिरी: शिवसेना नेते रामदास कदम आणि त्यांचे चिरंजीव आमदार योगेश कदम यांना शिवसेनेने मोठा धक्का दिला आहे. शिवसेनेने नव्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. या नियुक्त्यांमधून रामदास कदम समर्थकांना बाहेरचा रस्ता दाखवला आहे. तसेच नव्या नियुक्त्यांमध्ये एकाही कदम समर्थकांना स्थान देण्यात आलेले नाही. आधी विधान परिषदेची उमेदवारी नाकारल्यानंतर आता कदम समर्थकांना जिल्हा संघटनेतून डच्चू दिल्याने रामदास कदम यांना हा मोठा धक्का असल्याचं मानलं जात आहे.
शिवसेना नेते रामदास कदम यांना त्यांचे वादग्रस्तं आँडियो क्लीप प्रकरण चांगलेच भोवल्याचं दिसून येतंय. रत्नागिरी जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य निवडणुकांत शिवसेना नेते रामदास कदम आणि त्यांचे चिरंजीव आमदार योगेश कदम यांच्या समर्थकांना हटवून, तात्काळ त्यांच्या पदांवर शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रत्नागिरी जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या नव्या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. त्यामुळे ऐन निवडणुकांच्या रणधुमाळीत रामदास कदम आणि त्यांचे चिरंजीव आमदार योगेश कदम यांना मोठा झटका मिळालाय. शिवसेनेत पक्षाशी गद्दारी करणाऱ्यांना जागा नाही हे पुन्हा एकदा शिवसेना पक्ष प्रमुखांनी ठामपणे दाखवून दिल्याचीही चर्चा सध्या शिवसेनेत सुरू आहे.
ठाकरे-तटकरे चर्चा
शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस रत्नागिरी जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत एकत्रित येण्याचे घटत आहे. भाजप विरोधात एकत्र येऊन निवडणुका लढवण्याचं या दोन्ही पक्षाने ठरवलं आहे. संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे स्थानिक खासदार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुनिल तटकरे यांच्यात चर्चा झाली असल्याचं सूत्रांनी सांगितलं.
या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या
राजू निगुडकर, उपजिल्हाप्रमुख, उत्तर रत्नागिरी
किशोर देसाई,विधानसभा क्षेत्रप्रमुख, दापोली विधानसभा
ऋषिकेश गुजर, तालुकाप्रमुख, दापोली तालुका
संतोष गोवले, तालुकाप्रमुख, मंडणगड तालुका
संदीप चव्हाण, शहरप्रमुख, दापोली शहर
विक्रांत गवळी, उपशहरप्रमुख, दापोली शहर
तेव्हा कदम म्हणाले होते…
दरम्यान, विधान परिषदेच्या निवडणुकीत शिवसेनेने रामदास कदम यांचा पत्ता कापला होता. त्यांच्या ऐवजी सुनील शिंदे यांना विधान परिषदेची उमेदवारी देण्यात आली होती. ऑडिओ क्लिप प्रकरणामुळे कदम यांचा पत्ता कापल्याची तेव्हा चर्चा होती. पण आपण कोणतीच निवडणूक लढवणार नाही हे आधीच जाहीर केलं होतं, असं कदम यांनी स्पष्ट केलं होतं. मात्र, आता त्यांच्या समर्थकांना डच्चू देत शिवसेनेने पक्ष परिवहन मंत्री अनिल परब यांच्या पाठीशी असल्याचं दाखवून दिल्याची चर्चा आहे.
VIDEO : 4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 16 December 2021#FastNews #News #Headline pic.twitter.com/thkb3QA8qV
— TV9 Marathi (@TV9Marathi) December 16, 2021
संबंधित बातम्या:
पोरी, तुझा बाप कर्जबाजारी झालाय, गळफास घेतोय, लवकर मातीला ये.. म्हणत त्यानं जीव संपवला…