कोकणात शिवसेनेला मोठा धक्का; नाणार प्रकल्प समर्थक शिवसैनिकांचा भाजपमध्ये प्रवेश

Nanar project | तारळ, अनसुरे, मिठगावणे या गावातील हे कार्यकर्ते आहेत. प्रवेश केलेले कार्यकर्ते हे सेना आमदार राजन साळवी यांच्या गटातील आहेत. राजापूर तालुक्यात रिफायनरी झाली पाहिजे असे या कार्यकर्ते यांचे मत आहे.

कोकणात शिवसेनेला मोठा धक्का; नाणार प्रकल्प समर्थक शिवसैनिकांचा भाजपमध्ये प्रवेश
नाणार तेलशुद्धीकरण प्रकल्प
Follow us
| Updated on: Jul 04, 2021 | 3:13 PM

रत्नागिरी: कोकणातील नाणार रिफायनरीचा मुद्दा पुन्हा एकदा तापण्याची शक्यता आहे. शिवसेनेने नाणार प्रकल्पाविरोधात (Nanar Project) भूमिका घेतल्यामुळे शिवसेनेच्या काही कार्यकर्त्यांनी रविवारी भाजपमध्ये प्रवेश केला. यामध्ये जवळपास 70 शिवसैनिकांचा समावेश आहे. (Nanar refinery project supporters Shivsena workers joins BJP)

तारळ, अनसुरे, मिठगावणे या गावातील हे कार्यकर्ते आहेत. प्रवेश केलेले कार्यकर्ते हे सेना आमदार राजन साळवी यांच्या गटातील आहेत. राजापूर तालुक्यात रिफायनरी झाली पाहिजे असे या कार्यकर्ते यांचे मत आहे. पण सेनेची नवीन जागेबाबत भूमिका अद्याप देखील स्पष्ट नाही. त्यामुळे आता हे कार्यकर्ते यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे सेनेला कोकणात धक्का बसला आहे. सोमवारी विधिमंडळाचे अधिवेशन असून त्याचा अगोदर कोकणात रिफायनरीबाबत हालचाली सुरु झाल्या आहेत. सर्व परिस्थिती पाहता आता सेनेला आपली भूमिका स्पष्ट करावी लागणार आहे.

‘शिवसेनेच्या डोळ्यासमोर काजवे चमकले असतील’

शिवसैनिकांच्या भाजप प्रवेशानंतर भाजप जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी सेनेला टोला लगावला. राजा काजवे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर आता शिवसेनेच्या समोर नक्कीच काजवे चमकले असतील, अशी प्रतिक्रिया प्रमोद जठार यांनी व्यक्त केली.

नाणार रिफायनरी प्रकल्प नेमका काय होता?

कोकणातील निसर्गसंपन्न अशा रत्नागिरी-सिंधुदुर्गाच्या सीमेवर नाणार तेलशुद्धीकरण (रिफायनरी) प्रकल्प प्रस्तावित होता. रत्नागिरीतील राजापूर तालुक्यातील 14 गावं आणि सिंधुदुर्गातील देवगड तालुक्यातील 2 गावांमध्ये प्रकल्पाचा विस्तार होणार होता. 13000 एकरावर हा प्रकल्प उभारला जाणार होता. नागरिकांचा विरोध असतानाही, या गावांमधील क्षेत्र 18 मे 2017 रोजी आद्योगिक क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आलं. हिंदुस्थान पेट्रोलियम, इंडियन ऑइल आणि भारत पेट्रोलियम या तीन सरकारी कंपन्या नाणार रिफायनरी प्रकल्प उभारत असून, त्यांची संयुक्तपणे रत्नागिरी रिफायनरी आणि पेट्रोकेमिकल लिमिटेड म्हणजेच RRPCL कंपनी 22 सप्टेंबर 2017 रोजी स्थापन करण्यात आली.

काही महिन्यांपूर्वीच सौदी अरेबियाच्या अरामको कंपनीशी नाणार रिफायनरीबाबत करार झाला. नाणार रिफायनरीच्या उभारणीला तीन लाख कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. आशियातील सर्वात मोठा रिफायनरी प्रकल्प असल्याचे सांगण्यात येत असून, 2023 पर्यंत हा प्रकल्प कार्यन्वित करण्याचा सरकारचा विचार आहे. आणखी एक विशेष गोष्ट म्हणजे, प्रस्तावित नाणार रिफायनरी प्रकल्पापासून अवघ्या 15-16 किलोमीटरच्या अंतरावर जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प आहे.

संबंधित बातम्या:

‘त्या’ प्रकल्पाला नाणार म्हणू नका, रिफायनरी म्हणा; नाणार रिफायनरीला उद्धव ठाकरेंचा विरोध कायम

नाणार प्रकल्प रायगडमध्ये हलवणार, मुख्यमंत्र्यांचं लेखी उत्तर

EXCLUSIVE : तब्बल 9 हजार एकर जागा उपलब्ध, नाणार रिफायनरीला पर्याय सापडला?

(Nanar refinery project supporters Shivsena workers joins BJP)

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.