ठाकरे गटाचं आऊट गोईंग सुरूच; या जिल्ह्यातील तीन नगरसेवक भाजपात…
आता पुन्हा एकदा नितेश राणे यांनी ठाकरे गटाला जोरदार धक्का दिला आहे. कोकणामधील वैभववाडीत आमदार नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांना धक्का देत ठाकरे गटाचे तीन नगरसेवक भाजपामध्ये आल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
सिंधुदुर्ग : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काही महिन्यापूर्वी बंडखोरी महाविकास आघाडीचे सरकार उलथवून लावले होते. त्यांच्या बंडखोरीमुळे तत्कालीन शिवसेनेचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना राजीनामा द्यावा लागला होता. त्यानंतर राज्यातील राजकीय घडामोडींना प्रचंड वेग आला. त्यानंतर ठाकरे गट आणि शिंदे गट आमनेसामने उभा राहिले आहे. एकनाथ शिंदे यांच्याबरोबर चाळीस आमदार निघून गेल्यानंतरही अनेकांनी ठाकरे गटाला सोडचिठ्ठी देत शिंदे गटात सामील झाले.
आमदार, खासदार यांच्यानंतर आता महानगरपालिका, नगरपरिषदेचे नगरसेवकांनीही आता ठाकरे गटाला सोडचिठ्ठी देत कोण शिंदे गटाबरोबर तर कोण भाजपसोबत जात असल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत.
ठाकरे गटाचा बालेकिल्ला म्हणून कोकणला ओळखले जाते. त्यातच सिंधुदुर्गमध्ये ठाकरे गट मजबूत असल्याचेही सांगितले जाते.
मात्र त्यानंतर नारायण राणे यांच्या कोकणातील ठाकरे गटाचा बुरूज ढासळू लागला असला तरी आमदार वैभव नाईक, आमदार भास्करावर जाधव, खासदार राजन साळवी यांनी ठाकरे गट शाबूत ठेवण्याचा प्रयत्न केला. मात्र आता पुन्हा एकदा ठाकरे गटाला खिंडार पाडण्याचे काम आमदार नितेश राणे यांच्याकडून केले जात आहे.
केंद्रीय मंत्री नारायण राणे, आमदार नितेश राणे यांच्याकडून नेहमीच ठाकरे गटाला धक्के देण्याचे काम केले गेले आहे. ठाकरे गटावर वारंवार सडकून टीका करण्याचे कामही राणे पिता पुत्रांकडून केले जाते.
मात्र आता पुन्हा एकदा नितेश राणे यांनी ठाकरे गटाला जोरदार धक्का दिला आहे. कोकणामधील वैभववाडीत आमदार नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांना धक्का देत ठाकरे गटाचे तीन नगरसेवक भाजपामध्ये आल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी त्यांनी सांगितले की, सुभाष रावराणे, श्रद्धा रावराणे आणि प्रदीप रावराणे या तिन्ही नगरसेवकांनी ठाकरे गटाला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यांच्या या प्रवेशामुळे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत या नगरसेवकांनी प्रवेश केला आहे.