VIDEO | Sindhudurg | चिवला समुद्र किनाऱ्यावर मच्छीमारांच्या जाळ्यात डॉल्फिन मासा, पाहाण्यासाठी पर्यटकांची गर्दी
सिंधुदुर्गातील मालवण चिवला समुद्र किनारा हा सफारी आणि डॉल्फिन दर्शनासाठी प्रसिध्द आहे. शुक्रवारी (12 नोव्हेंबर) या ठिकाणी पारंपारिक मच्छीमारांनी लावलेल्या रापण जाळीत चक्क डॉल्फिन मासे सापडले आहेत. जवळपास 15 हून अधिक डॉल्फिन मासे रापण जाळीत अडकल्याचे मच्छिमारांच्या निदर्शनास येताच सर्वांना पुन्हा समुद्रात सोडण्यात आले.
सिंधुदुर्ग : सिंधुदुर्गातील मालवण चिवला समुद्र किनाऱ्यावर चक्क डॉल्फिन मासे सापडले आहेत. यावेळी मच्छीमारांनी लावलेल्या जाळ्यात तब्बल 15 डॉल्फिन सापडल्या आहेत. त्यामुळे पर्यटकांनी या डॉल्फिनला पाहाण्यासाठी गर्दी केली आहे.
सिंधुदुर्गातील मालवण चिवला समुद्र किनारा हा सफारी आणि डॉल्फिन दर्शनासाठी प्रसिध्द आहे. शुक्रवारी (12 नोव्हेंबर) या ठिकाणी पारंपारिक मच्छीमारांनी लावलेल्या रापण जाळीत चक्क डॉल्फिन मासे सापडले आहेत. जवळपास 15 हून अधिक डॉल्फिन मासे रापण जाळीत अडकल्याचे मच्छिमारांच्या निदर्शनास येताच सर्वांना पुन्हा समुद्रात सोडण्यात आले. दरम्यान, हे डॉल्फिन पाहण्यासाठी पर्यटकांनी मोठी गर्दी केली होती.
शरीर माशाचं आणि तोंड मगरीचं असणारा मासा
झारखंडच्या धनबादमध्ये मासेमारी करताना मच्छीमारांनी असा मासे पकडला, ज्याचे शरीर आणि तोंड मगरीसारखे आहे. जेव्हा गावकऱ्यांनी त्याच्या तोंडात लाकडाचा तुकडा टाकला, तेव्हा एका झटक्यात मगरीसारखे तोंड असलेल्या माशाने त्याचा चुरा केला. ही माशाची प्रजाती अद्याप कुठेही सापडलेली नाही. या माशाला काय म्हणतात, हेही या मच्छिमारांना माहित नाही. मात्र, माशाचं हे रौद्ररुप पाहून लोक घाबरले आहेत.
गावातील लोक मासेमारी करत होते. यासाठी मच्छीमारांनी जाळं टाकलं होतं. गावकऱ्यांच्या मते, जाळ्यात एक मोठा मासा आला. जेव्हा जाळं जोरजोरात हलायला लागलं, तेव्हा मच्छीमारांनी जाळं ओढून बाहेर काढलं. पण जाळ्यात असलेला मासा पाहून प्रत्येकाचे डोळे विस्फारले. कारण याचं रुप. याचं तोंड मगरीचं होतं, आणि शरीर माशाचं.
संबंधित बातम्या :