AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जयदीप आपटे याची नाटकं सुरूच; छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा पडल्याप्रकरणात मोठी अपडेट, आज न्यायालयासमोर हजर करणार

Jaydeep Apte : छत्रपती शिवाजी महाराज यांचा मालवणमधील राजकोट येथील पुतळा पडला. फारसा अनुभव गाठीशी नसलेल्या जयदीप आपटे याला नौदलाने पुतळा उभारणीचे काम कसे दिले, यावर मोठे प्रश्नचिन्ह आहेच. पण आता मुख्य आरोपी जयदीपची पण पोलीस कोठडीतील नाटकं दिसून येत आहे.

जयदीप आपटे याची नाटकं सुरूच; छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा पडल्याप्रकरणात मोठी अपडेट, आज न्यायालयासमोर हजर करणार
जयदीप आपटे, चेतन पाटील
Follow us
| Updated on: Sep 10, 2024 | 10:44 AM

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडला. त्यामुळे राज्यात एकच संतापाची लाट उसळली. फरार झालेल्या जयदीप आपटे आणि चेतन पाटील याच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या. या दोघांची पोलीस कोठडी आज 10 सप्टेंबर रोजी संपत आहे. या दोघांना पण आज न्यायालयात हजर करण्यात येईल. आपटे हा पाच दिवसांपासून तर चेतन हा 10 दिवसांपासून पोलीस कोठडीत आहे. पण या दरम्यान आपटेची नाटकं पाहायला मिळाली.

न्यायालयासमोर हजर करणार

आरोपी जयदीप आपटे आणि चेतन पाटीलची आज पोलीस कोठडी संपणार आहे. मालवण राजकोट येथील छत्रपतींचा पुतळा दुर्घटना प्रकरणी पोलीस कोठडी संपत असल्याने सल्लागार चेतन पाटील याला तिसऱ्यांदा मालवन पोलीस न्यायलायासमोर हजर करणार आहेत. तर घटनेतील मुख्य आरोपी मूर्तिकार जायदीप आपटे याला दुसऱ्यांदा न्यायल्यासमोर हजर करणार आहेत. चेतन पाटील मागील दहा दिवस आहे पोलीस कोठडीत तर जायदीप आपटे मागील पाच दिवसांपासून पोलीस कोठाडीत आहे.

हे सुद्धा वाचा

तपासात सहकार्य नाही

पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार अद्याप तपासात अनेक विसंगती आहे. तसेच आरोपी महत्वाची माहिती लपवत आहे. त्याने तपासात सहकार्य न केल्याने आरोपींना अजून पोलीस कोठाडी देण्याची विनंती पोलीस आज करणार आहेत. त्यामुळे पुन्हा आपटे आणि पाटील याला जेल होते की बेल मिळते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

26 ऑगस्ट रोजी पुतळा कोसळला

आठ महिन्यापूर्वी राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात आला होता. नौदल दिनाच्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या पुतळ्याचे लोकार्पण केले होते. या 26 ऑगस्ट रोजी हा 28 फुटी ब्राँझचा पुतळा कोसळला होता. त्यानंतर आपटे हा एक आठवडा फरार होता. तो घरी असल्याचे समजताच कल्याणमधील घराबाहेर पोलिसांनी सापळा रचून त्याला अटक केली होती.

आपटेने केला गंजलेल्या साहित्याचा वापर?

पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यात गंजलेल्या साहित्याचा वापर करण्यात आल्याचा दावा सिंधुदुर्ग पोलिसांनी न्यायालयात केला होता. शिवरायांचा पुतळा कोसळल्यानंतर त्याचे अवशेष जमा करण्यात आले होते. ते गंजलेले होते. पुतळा तयार करताना निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरण्यात आले होते का,याचा तपास करावा लागेल, असे पोलिसांनी न्यायालयाला सांगितले होते. या मुळे आज पुन्हा यांची पोलीस कोठडी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

भारताचा मोठा स्ट्राईक, पाकचे 5 एअरबेस उडवले; पाकसाठी किती महत्त्वाचे?
भारताचा मोठा स्ट्राईक, पाकचे 5 एअरबेस उडवले; पाकसाठी किती महत्त्वाचे?.
बलुचिस्तानकडून पाक आणि चीनला उघड धमकी, VIDEO शेअर करत वाढवलं टेन्शन
बलुचिस्तानकडून पाक आणि चीनला उघड धमकी, VIDEO शेअर करत वाढवलं टेन्शन.
पाकड्यांना पाडलं उघडं, भारतीय लष्करानं सांगितलं काय खरं काय खोटं
पाकड्यांना पाडलं उघडं, भारतीय लष्करानं सांगितलं काय खरं काय खोटं.
अमृतसरमध्ये पाकचं ड्रोन घरावर, काचा फुटल्या तर कुठ आग लागली, बघा VIDEO
अमृतसरमध्ये पाकचं ड्रोन घरावर, काचा फुटल्या तर कुठ आग लागली, बघा VIDEO.
पाकच पितळ उघडं, गेले हल्ला करायला अन् मिसाईल फुटलंच नाही; फुसका बार...
पाकच पितळ उघडं, गेले हल्ला करायला अन् मिसाईल फुटलंच नाही; फुसका बार....
राजस्थानात स्फोट, मध्यरात्री भारताच्या धमाक्यांनी पाक एअरबेस उद्ध्वस्त
राजस्थानात स्फोट, मध्यरात्री भारताच्या धमाक्यांनी पाक एअरबेस उद्ध्वस्त.
पाक सेनेसाठी तबाहीची सकाळ, भारताने 'हे' 4 एअरबेस उद्ध्वस्त करत हादरवल
पाक सेनेसाठी तबाहीची सकाळ, भारताने 'हे' 4 एअरबेस उद्ध्वस्त करत हादरवल.
पाकचा मोठा हल्ला, राजौरीमधील घरांची अवस्था बघा, विदारक VIDEO पाहून...
पाकचा मोठा हल्ला, राजौरीमधील घरांची अवस्था बघा, विदारक VIDEO पाहून....
पंतप्रधान नरेंद्र मोदींची तिन्ही सैन्य प्रमुखांसोबत महत्वाची बैठक
पंतप्रधान नरेंद्र मोदींची तिन्ही सैन्य प्रमुखांसोबत महत्वाची बैठक.
नागरी विमानांचा ढाल म्हणून वापर; पाकिस्तानचं काळं सत्य
नागरी विमानांचा ढाल म्हणून वापर; पाकिस्तानचं काळं सत्य.