Guhagar | जयगड समुद्रात पलटी झालेले सिंगापूरचे तेलवाहू बार्ज पालशेत किनारी, प्रशासनाने केले नागरिकांना आवाहन!
जयगड समुद्रात पलटी झालेले सिंगापूरचे तेलवाहु कंपनीचे बार्ज लाटांच्या तडाख्यात आल्याने पलटी झाले. किनाऱ्यावरील नागरिकांनी वाहून किनारी आलेल्या वस्तूंना हात लावू नये. असे आवाहन प्रशासनाकडून केले गेले आहे. तसेच काही संशयित वस्तूबाबत समजून आल्यास पोलीस स्टेशनला संपर्क साधावा, असेही नागरिकांना सांगण्यात आले.
गुहागर : मंगळवारी जयगड (Jaigad) समुद्रात पलटी झालेले सिंगापूर येथील तेलवाहु कंपनीचे बार्ज अजस्त्र लाटांच्या तडाख्याने गुहागर (Singapore) तालुक्यातील पालशेत समुद्रकिनारी आले आहे. सिंगापूर येथून तेल घेऊन आलेले बार्ज रविवारी 17 रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील जयगड येथील 13 नॉटीकल मैल खोल समुद्रात आले असता सकाळी 9 वाजता पलटी झाले. त्यामुळे बार्ज मधील तेल व इतर वस्तू समुद्रात वाहून गेल्या आहेत. या बार्जवरील कर्मचारी (Employees) सुखरूप असल्याची माहिती देखील मिळते आहे.
सिंगापूरचे तेलवाहु कंपनीचे बार्ज लाटांच्या तडाख्यात
जयगड समुद्रात पलटी झालेले सिंगापूरचे तेलवाहु कंपनीचे बार्ज लाटांच्या तडाख्यात आल्याने पलटी झाले. किनाऱ्यावरील नागरिकांनी वाहून किनारी आलेल्या वस्तूंना हात लावू नये. असे आवाहन प्रशासनाकडून केले गेले आहे. तसेच काही संशयित वस्तूबाबत समजून आल्यास पोलीस स्टेशनला संपर्क साधावा, असेही नागरिकांना सांगण्यात आले. बार्जवरील कर्मचारी सुखरूप असून त्यांना उपचारासाठी दवाखान्यात दाखल केल्याची माहिती देखील मिळते आहे.
प्रशासनाने नागरिकांना केले आवाहन
तेलवाहु कंपनीचे बार्ज पलडी झाल्याने अनेक वस्तू वाहून गेल्या आहेत. बार्ज पलडी झाल्यानंतर बार्ज मधील तेल व इतर वस्तू समुद्रात वाहून गेल्या आहेत. यामुळे किनारपट्टीवर तेल पसरल्याचे देखील अनेक ठिकाणी दिसून आले. किनारपट्टी लगत राहणाऱ्या नागरिकांना सतर्क राहण्याचा आणि संशयित वस्तू आढळल्यास पोलिसांना संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले.