संप असला म्हणून काय झालं?… गर्भवती महिला येताच त्यांनी आंदोलन सोडलं; परिचारिकांनी असं काही केलं की…

आज दुसऱ्या दिवशीही सोलापुरातील शासकीय रुग्णालयातील कर्मचारी संपावर आहेत. त्यामुळे रुग्णालयातील 40 शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात आल्या आहेत. दुसऱ्या दिवशीही रुग्णालयाच्या गेटवर येऊन आंदोेलकांनी जोरदार घोषणाबाजी केली.

संप असला म्हणून काय झालं?... गर्भवती महिला येताच त्यांनी आंदोलन सोडलं; परिचारिकांनी असं काही केलं की...
nurse strikeImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Mar 15, 2023 | 12:02 PM

सोलापूर : राज्यात कालपासून 18 लाख सरकारी आणि निमसरकारी कर्मचारी संपावर गेले आहेत. यामध्ये वैद्यकीय कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे. पारिचारिका आणि इतर वैद्यकीय स्टाफही संपावर गेला आहे. या सर्वांनी काम बंद आंदोलन केलं आहे. त्यामुळे रुग्णांचे प्रचंड हाल होताना दिसत आहेत. हे सर्व कर्मचारी रुग्णालयाच्या गेटवर येऊन जोरजोरात घोषणाबाजीही करताना दिसत आहेत. या संपातही माणुसकीचं दर्शन घडताना दिसत आहे. सोलापूरमध्ये याची प्रचिती आली. एक गर्भवती महिला उपचारासाठी रुग्णालयात आली. त्यावेळी परिचारिका आंदोलन करत होत्या. घोषणा देत होत्या. पण ही गर्भवती महिला येताच या परिचारिकांनी आंदोलन सोडून तिला हात दिला अन् माणुसकीचं दर्शन घडवलं.

सोलापूरमध्ये आज दुसऱ्या दिवशीही शासकीय रुग्णालयातील परिचारिकांनी काम बंद आंदोलन सुरू केलं आहे. रुग्णालयाच्या बी ब्लॉकसमोर जमून या महिला आंदोलकांनी जोरजोरात घोषणाबाजी करत संपूर्ण परिसर दणाणून सोडलं होतं. हा संप सुरू असतानाच इतक्यात एक गर्भवती महिला उपचारासाठी रुग्णालयात आली. ही महिला रिक्षातून आली. तिला खूप वेदना होत होत्या. हे पाहून आंदोलन करणाऱ्या महिला परिचारिका अस्वस्थ झाल्या. त्यांनी घोषणाबाजी बंद केली. अन् तात्काळ त्या महिलेला मदत करण्यासाठी धावल्या.

हे सुद्धा वाचा

अन् पुन्हा घोषणाबाजी सुरू

या परिचारिकांनी या गर्भवती महिलेला रिक्षातून उतरवले. तिला रुग्णालयात घेऊन गेल्या. या महिलेला अॅडमिट करून तिच्यावर उपचार सुरू केले. त्यानंतर या परिचारिका पुन्हा आंदोलनात आल्या आणि त्यांनी घोषणाबाजी देण्यास सुरुवात केली. या महिला आंदोलकांची ही माणुसकी पाहून सर्वांनाच सुखद धक्का बसला. आंदोलनातही परिचारिकांनी माणुसकी दाखवल्याने त्याची सर्वत्र चर्चा होत आहे.

40 शस्त्रक्रिया पुढे ढकलल्या

सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात केवळ सोलापूरच नाही तर उस्मानाबाद, लातूर शिवाय कर्नाटकातून देखील रुग्ण मोठ्या संख्येने येतात. आजही सोलापूरच्या शासकीय रुग्णालयातील 350 स्टाफ नर्स, 110 मामा-मावशी, 110 क्लार्क आणि शिपाई संपात सहभागी झाले आहेत. आम्ही कालपासून कामकाजावर बंदी घातलीय, त्यामुळे रुग्णालयातील 40 शस्त्रक्रिया पुढे ढकलल्या आहेत. रुग्णांचे जे काही बरे वाईट होईल त्याला प्रशासन आणि शासन जबाबदार असेल, असा इशारा संपकऱ्यांनी दिला आहे.

तोपर्यंत माघार नाही

कोविड काळात केवळ परिचारिका सेवा देत होत्या, त्यावेळी आम्हाला वाढीव भत्ता देण्याचे आश्वासन दिले, मात्र भत्ता दिला नाही. आम्ही कोणत्याही परिस्थितीत जोपर्यंत जुनी पेन्शन लागू होत नाही तोपर्यंत कामावर हजर होणार नाही, असंही या संपकऱ्यांनी म्हटलं आहे. सोलापूर शासकीय रुग्णालयातील जवळपास 1200 कर्मचारी कालपासून संपात सहभागी आहोत. व्हीलचेअर, स्ट्रेचर ढकलण्यापासून सर्व काम रुग्णांच्या नातेवाईकांना करावी लागत आहेत. दुसऱ्या दिवशी शासकीय रुग्णलयात एकत्रित येऊन शासन विरोधात घोषणाबाजी करत आहेत.

संभाजी नगरमध्ये 15 शस्त्रक्रिया रद्द

दरम्यान, परिचारिका आणि इतर कर्मचारी संपावर असल्यामुळे संभाजी नगर जिल्ह्यातील 15 शस्त्रक्रिया रद्द करण्यात आल्या आहेत. जिल्ह्यातील दोन हजार आरोग्य कर्मचारी संपावर गेल्यामुळे रुग्णांना त्याचे परिणाम भोगावे लागत आहेत. संपामुळे रुग्णांचे हाल होत असून कचरा आणि अस्वच्छतेने घाटी परिसरात दुर्गंधी पसरली आहे. घाटी रुग्णालयात दररोज 1200 रुग्ण दाखल होतात. मात्र संपामुळे फक्त 956 रुग्ण दाखल झाले आहेत. जुन्या पेन्शनसाठी पुकारलेल्या संपामुळे रुग्णांच्या नातेवाईकांचेही हाल होताना दिसत आहेत.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.