सोलापुरात सहाय्यक पोलीस आयुक्तांना हार्ट अटॅक, जीमला गेले, आराम केला, नेमकं काय घडलं?
सोलापूर शहर पोलीस आयुक्तालयातील सहाय्यक पोलीस आयुक्त सुहास भोसले यांचा आज हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला.
सोलापूर : सोलापूर शहर पोलीस आयुक्तालयातील सहाय्यक पोलीस आयुक्त सुहास भोसले (Suhas Bhosale) यांचा आज हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. सकाळी जीममध्ये व्यायाम करताना त्यांना अचानकपणे चक्कर आली. त्यानंतर त्यांना हृदयविकाराचा झटका आला. ते मूळचे माढा तालुक्यातील बेंबळी येथील रहिवासी असून त्यांच्या पश्चात पत्नी एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे. (solapur Assistant Commissioner of Police Suhas Bhosale passes away due to heart attack while exercising in gym)
व्यायाम करताना त्यांना अचानकपणे चक्क आली
मिळालेल्या माहितीनुसार सोलापूर शहर पोलीस आयुक्तालयातील सहाय्यक पोलीस आयुक्त सुहास भोसले हे सकाळी जीममध्ये व्यायाम करण्यासाठी गेले होते. यावेळी व्यायाम करताना त्यांना अचानकपणे चक्क आली आणि ते खाली कोसळले. त्यानंतर शुद्धीवर आल्यावर त्यांनी थोडा वेळ आराम करुन पुन्हा व्यायामाला सुरुवात केली. मात्र, यावेळी व्यायामादरम्यान त्यांना हृदयविकाराचा झटका आला.
डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर त्यांना मृत घोषित केले
सुहास भोसले खाली कोसळल्याचे समजताच त्यांना सोलापुरातील खासगी रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर त्यांना मृत घोषित करण्यात आले. सुहास भोसले हे शहर आयुक्तालयात विभाग क्रमांक एकचे सहाय्यक पोलीस आयुक्त होते. 56 वर्षीय भोसले हे सहा महिन्यापूर्वीच अमरावतीहून सोलापुरात बदलून आले होते.
भोसले यांंना पोलीस दलाची मानवंदना
भोसले यांच्या मृत्यूनंतर शहर पोलीस दलाच्या वतीने त्यांना मानवंदना देऊन श्रद्धांजली देण्यात आली. भोसले हे मूळचे माढा तालुक्यातील बेंबळी येथील रहिवासी आहेत. त्यांच्या अशा अचानकपणे जाण्याने सोलापूर पोलीस दलातून दु:ख व्यक्त करण्यात येत आहे.
इतर बातम्या :
लाचखोरी प्रकरणात नाशिक जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी वैशाली वीर-झनकर फरार घोषित
पोलिसांनी सापळा रचला, जोडप्याला रुग्णालयात पाठवलं, नंतर डॉक्टराला रंगेहाथ पकडलं, नेमकं काय घडलं?
(solapur Assistant Commissioner of Police Suhas Bhosale passes away due to heart attack while exercising in gym)