सोलापुरात दोन वर्षांनंतर पुन्हा शाळेची घंटा वाजणार, जिल्हा परिषदेच्या 83 शाळा सुरु
कोरोनामुक्त असलेल्या 678 गावातील 83 जिल्हा परिषदेच्या शाळा पुन्हा सुरु होणार आहेत. यामुळे आजपासून या शाळेची घंटा वाजणार आहे.
सोलापूर : गेल्या दोन वर्षांपासून बंद असलेल्या शाळेची घंटा अखेर आजपासून वाजणार आहे. सोलापुरात जिल्हापरिषदेच्या आजपासून भरणार आहेत. गेल्या दोन शैक्षणिक वर्षात बंद असलेल्या जिल्हा परिषदेच्या 83 शाळा आजपासून सुरु होणार आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांसह पालकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. (Solapur ZP 83 School Restart from today after two years Covid Pandemic)
आजपासून शाळेची घंटा वाजणार
सोलापुरात जिल्ह्यात 1 हजार 024 पैकी 678 गावे कोरोनामुक्त झाली आहेत. यातील 335 गावात शाळा सुरु करण्यास जिल्हा प्रशासनाने परवानगी दिली आहे. यानुसार कोरोनामुक्त असलेल्या 678 गावातील 83 जिल्हा परिषदेच्या शाळा पुन्हा सुरु होणार आहेत. यामुळे आजपासून या शाळेची घंटा वाजणार आहे.
राज्यातील शाळा सुरु करण्याचा पहिला निर्णय सोलापुरात
दरम्यान काही दिवसांपूर्वी राज्य शासनाने कोरोनामुक्त असलेल्या गावात आठवी ते बारावीच्या शाळा सुरु करण्यास परवानगी दिली आहे. त्यानुसार राज्यातील शाळा सुरू करण्याचा पहिला निर्णय सोलापूरमध्ये घेण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी सोलापुरात झालेल्या प्रशासनाच्या आढावा बैठकीत शाळा सुरु करण्याबाबत पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी घोषणा केली.
कोरोना नियमांचे पालन करत शाळा सुरु होणार
सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सोलापूर जिल्ह्यात शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या पार्श्वभूमीवर आज 12 जुलै सोमवारपासून 8 वी ते 12 वीपर्यंतचे सर्व वर्ग सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सोलापूर जिल्ह्यातील ज्या गावांमध्ये कोरोना आटोक्यात आला आशा 335 गावांमध्ये शाळेची घंटा वाजणार आहे. शाळा सुरू करत असताना कोरोना नियमांचे पालन करण्यात येणार आहे. तसेच शिक्षण विभाग याबाबत योग्य ती खबरदारी घेईल, अशा सूचना पालकमंत्र्यांनी केल्या आहेत.
बारामतीकर तरुणाच्या पाठीवर ‘साहेबां’चा पर्मनंट टॅटू, खुद्द शरद पवारांकडूनही कौतुक https://t.co/TfCWTP6wMj #SharadPawar | #Tattoo | #AkshaySalve | #Baramati | @PawarSpeaks | @NCPspeaks
— TV9 Marathi (@TV9Marathi) July 12, 2021
(Solapur ZP 83 School Restart from today after two years Covid Pandemic)
संबंधित बातम्या :
पालघरमध्ये शालेय विद्यार्थ्यांना पोषण आहारात भेसळ, प्लास्टिकचा तांदुळ सापडल्यानं खळबळ
लहान मुलांना कोरोनाच्या प्रादुर्भावाचा धोका जास्त, सध्याच शाळा सुरु करु नयेत : राजेश टोपे
नांदेडमध्ये लसीकरणाला वेग, आतापर्यंत 7 लाख ‘लसवंत’, 25 लाखांचं जिल्हाधिकाऱ्यांचं उदिष्ट