सोलापूर : ग्लोबल पुरस्कार विजेते शिक्षक रणजितसिंह डिसले (Ranjitsinh Disale) यांच्या अडचणी वाढत असल्याचं समोर येत आहे. ग्लोबल टीचर रणजितसिंह डिसलेंवर आणखी एक गंभीर आरोप करण्यात आला आहे. सोलापूर जिल्हा परिषदेच्या सभेत (Solapur ZP Meeting ) रणजितसिंह डिसले यांच्या विरोधात निषेधाचा सूर पाहायला मिळाला. जिल्हा परिषद सदस्य भारत शिंदे (Bharat Shinde) यांनी डिसले यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. जिल्हा परिषदेच्या सभेत रणजित डिसलेंविरोधात निषेधाचा सूर दिसून आला. डिसले यांनी पुरस्कारासाठी परितेवाडी हा आदिवासी भाग आहे. लोक कन्नड भाषिक असून झेडपी शाळा गोठ्यात भरते. तसेच येथे 80 टक्के बालविवाह होतात, अशी खोटी माहिती पुरस्कारासाठी दिल्याचा आरोप झेड पी सदस्य भारत शिंदे यांनी केला. या प्रकरणामुळं रणजितसिंह डिसले यांच्या अडचणी वाढणार असल्याचं दिसून येत आहे. तर, जिल्हा परिषदेच्या सभेत मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी आणि शिक्षणाधिकारी किरण लोहार यांच्या अभिनंदनाचा ठराव मांडण्यात आला.
पुरस्कारासाठी डिसलेंनी परितेवाडी हा आदिवासी भाग आहे. लोक कन्नड भाषिक असून झेडपी शाळा गोठ्यात भरते. तसेच येथे 80 टक्के बालविवाह होतात, अशी खोटी माहिती पुरस्कारासाठी दिल्याचा आरोप झेडपी सदस्य भारत शिंदे यांनी केला. भारत शिंदे हे परितेवाडी भागातील जिल्हा परिषस सदस्य असून त्यांनी झेडपीच्या ऑनलाईन सभेत हा आरोप करत निषेध केला
जिल्हा परिषदेच्या ऑनलाईन सभेत शिक्षणाधिकारी किरण लोहार आणि झेडपी सीईओ दिलीप स्वामी यांच्या अभिनंदनाचा ठराव मांडण्यात आला.
मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना लिहिलेल्या पत्रात डिसले गुरुजींनी प्रसारमाध्यमासमोर मी अनावधानाने बोलल्याची कबुली पत्राद्वारे दिली आहे, असे या सीईओ स्वामी यांनी सांगितलं होतं. रणजितसिंह डिसले यांनी सोलापूर जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना एक पानाचे पत्र लिहून यापुढे माध्यमासमोर न जण्याची हमी दिल्याची सीईओंनी माहिती दिली होती. परदेशी शिष्यवृत्तीसाठी अधिकाऱ्यांनी पैशांची मागणी केली, तसेच मानसिक त्रास दिल्याचा डिसले गुरुजींनी दावा केला होता. या वक्तव्यानंतर सोलापूर जिल्हा परिषद सीईओ दिलीप स्वामी यांनी खुलासा करण्याबाबत डिसले गुरुजींना नोटीस दिली होती, अशी माहितीही त्यांनी दिली आहे.
डिसले गुरुजींच्या पीएचडीचा मार्ग मोकळा; अध्यायन रजेच्या अर्जला अखेर मंजुरी
ग्लोबल टिचर डिसले गुरूजींनी माफी मागितल्याचा दावा, अवधानाने बोलल्याची पत्रात कबुली-ZP CEO
Solapur ZP meeting Bharat Shinde accuse Ranjitsinh Disale wrote wrong things about Paritewadi