AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लातूरमध्ये सोयाबीन संशोधन केंद्र उभारण्यात येणार, कृषी सचिव-अमित देशमुख यांच्या बैठकीत चर्चा

लातूर... मराठवाड्यातला एक महत्त्वाच जिल्हा... राजकारण, अर्थकारण, सांस्कृतिक आणि कृषी या सगळ्यांसाठीच महत्त्वात अललेला... याच लातूरमध्ये आता सोयाबीन संशोधन केंद्र उभारण्यात येणार आहे. (Soyabean Research Centre At Latur Amit Deshmukh And Secretary of Agriculture meeting)

लातूरमध्ये सोयाबीन संशोधन केंद्र उभारण्यात येणार, कृषी सचिव-अमित देशमुख यांच्या बैठकीत चर्चा
एकनाथ डवले-अमित देशमुख बैठक
Follow us
| Updated on: Jun 14, 2021 | 10:42 AM

लातूरलातूर… मराठवाड्यातला एक महत्त्वाच जिल्हा… राजकारण, अर्थकारण, सांस्कृतिक आणि कृषी या सगळ्यांसाठीच महत्त्वात अललेला… याच लातूरमध्ये आता सोयाबीन संशोधन केंद्र उभारण्यात येणार आहे. कृषी सचिव एकनाथ डवले आणि मंत्री अमित देशमुख यांच्या बैठकीत यासंबंधी चर्चा झालीय. (Soyabean Research Centre At Latur Amit Deshmukh And Secretary of Agriculture meeting)

कृषी महाविदयालय परिसरात सोयाबीन संशोधन केंद्र?

लातूर जिल्हयातील सोयाबीन पिकाची पेरणी, उत्पादन, बाजारपेठ व त्यावर आधारीत येथे उभारलेले गेलेले उदयोग लक्षात घेता येथील कृषी महाविदयालय परिसरात सोयाबीन संशोधन केंद्र उभारण्याच्यादृष्टीने निर्णय घ्यावा, अशी सूचना राज्याचे वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री तथा लातूरचे पालकमंत्री ना. अमित विलासराव देशमुख यांनी लातूर भेटीवर आलेले राज्याच्या कृषी विभागाचे सचिव एकनाथ डवले यांना केली आहे.

लातूर भेटीवर असलेले कृषी विभागाचे सचिव एकनाथ डवले यांनी शनिवारी लातूरचे पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांची त्यांच्या कार्यालयात येऊन भेट घेतली. यावेळी लातूर जिल्हयातील कृषी उत्पादन, शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपनी, जिल्हयातील हवामान येथे राबवायचे कृषी प्रकल्प, कृषी महाविदयालय, गळीत धान्य संशोधन केंद्र, कृषी विज्ञान केंद्र, पशुधन या संदर्भाने सविस्तर चर्चा झाली.

कृषी सचिव-अमित देशमुखांमध्ये काय चर्चा?

सध्याचे पेरणीचे दिवस लक्षात घेता बियाणे व खताचा पूरवठा सुरळीत व्हावा मागच्या वर्षी ज्या शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान झाले आहे त्या नुकसानग्रस्थ शेतकऱ्यांना थकीत वीमा भरपाई मिळवून दयावी. पात्र लाभधारक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई न देणाऱ्या वीमा कंपन्यांना काळया यादीत टाकावे. लातूर जिल्हयात आवश्यकतेनुसार महाबीजचे सोयाबीन बियाणे उपलब्ध करून दयावे. नुकसान भरपाई न देणाऱ्या बियाणे कंपन्यावरही कार्यवाही करावी, अशा सूचना मंत्री महोदयांनी केल्या.

लातूर जिल्हयाची कृषी उत्पादकता लक्षात घेता येथे फुडपार्क उभारण्याच्यादृष्टीने प्रस्ताव तयार करावा. जिल्हयात दाळवर्गीय कृषी उत्पादनासाठी शेतकऱ्यांमध्ये जागृती निर्माण करावी, असंही मंत्री महोदयांननी कृषी सचिव एकनाथ डवले तसंच त्यांच्या समवेत भेटीसाठी आलेल्या इतर अधिकाऱ्यांना यावेळी केल्या.

लातुरात उदयोग व्यवसाय उभारणीच्यादृष्टीने प्रस्ताव तयार करावा

कृषी सचिव एकनाथ डवले यांनी लातूर येथे जिल्हाधिकारी म्हणून उत्कृष्ट काम केले आहे. लातूर जिल्हयातील शेती, शेतकरी, येथील हवामान याचा त्यांना चांगला अभ्यास आहे. त्यामुळे त्यांनी लातूर येथे शेतीशी निगडीत उदयोग व्यवसाय उभारणीच्यादृष्टीने प्रस्ताव तयार करावे, अशा सूचनाही पालकमंत्री देशमुख यांनी यावेळी केल्या आहेत.

(Soyabean Research Centre At Latur Amit Deshmukh And Secretary of Agriculture meeting)

हे ही वाचा :

… तेव्हाच पेरणीला सुरुवात करा; कृषी विभागाचा शेतकऱ्यांना महत्वाचा सल्ला

काँग्रेसमध्ये ज्यांचे कोणी नाही त्यांच्यासोबत मी आहे; नितीन राऊतांचा कार्यकर्त्यांना ग्वाही

20 ते 22 तास चालून बैसरन खोऱ्यात पोहोचले; एनआयएच्या तपासात मोठे खुलासे
20 ते 22 तास चालून बैसरन खोऱ्यात पोहोचले; एनआयएच्या तपासात मोठे खुलासे.
जळगाव हादरलं! मुलीने प्रेमविवाह केला म्हणून बापानेच घेतला लेकीचा जीव
जळगाव हादरलं! मुलीने प्रेमविवाह केला म्हणून बापानेच घेतला लेकीचा जीव.
एनआयएकडून पहलगाम हल्ल्याच्या तपासाला वेग
एनआयएकडून पहलगाम हल्ल्याच्या तपासाला वेग.
ठाकरे बंधु एकत्र येणार? आता थेट मातोश्रीबाहेरच बॅनरबाजी
ठाकरे बंधु एकत्र येणार? आता थेट मातोश्रीबाहेरच बॅनरबाजी.
दहशतवाद्यांना कठोर उत्तर देऊ; पंतप्रधान मोदींचा पाकला थेट इशारा
दहशतवाद्यांना कठोर उत्तर देऊ; पंतप्रधान मोदींचा पाकला थेट इशारा.
दहशतवाद्यांना सैन्याचा दणका! 9 दहशतवाद्यांची घरं उद्ध्वस्त
दहशतवाद्यांना सैन्याचा दणका! 9 दहशतवाद्यांची घरं उद्ध्वस्त.
..पाकिस्तानातून आले होते, कसे समजले? -स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती
..पाकिस्तानातून आले होते, कसे समजले? -स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती.
पाकिस्तानी नागरिकांवरून महायुतीत समन्वयाचा अभाव
पाकिस्तानी नागरिकांवरून महायुतीत समन्वयाचा अभाव.
व्यापार ठप्प झाला, जनजीवन विस्कळीत झालं; पहलगाममध्ये शुकशुकाट
व्यापार ठप्प झाला, जनजीवन विस्कळीत झालं; पहलगाममध्ये शुकशुकाट.
'काही लोक घरातून बाहेर पडले की..', नाव न घेता शिंदेंचा ठाकरेंना टोला
'काही लोक घरातून बाहेर पडले की..', नाव न घेता शिंदेंचा ठाकरेंना टोला.