Chandrapur accident : चंद्रपुरात स्पार्कल मेणबत्तीचा स्फोट, 10 वर्षीय बालकाचे गाल, जीभ फाटली, 5 तास चालली शस्त्रक्रिया, यशस्वी प्लास्टिक सर्जरीने वाचला जीव

एक स्पार्कल मेणबत्ती किती घातक-स्फोटक ठरू शकते, याची चुणूक या प्रसंगाने मिळाली आहे. उपचार वेळेत मिळाल्याने आरंभ थोडक्यात बचावला. मात्र समस्त पालकवर्गाने या घटनेतून बोध घेण्याची गरज आहे.

Chandrapur accident : चंद्रपुरात स्पार्कल मेणबत्तीचा स्फोट, 10 वर्षीय बालकाचे गाल, जीभ फाटली, 5 तास चालली शस्त्रक्रिया, यशस्वी प्लास्टिक सर्जरीने वाचला जीव
चंद्रपुरात स्पार्कल मेणबत्तीचा स्फोट, 10 वर्षीय बालकाचे गाल, जीभ फाटली,Image Credit source: t v 9
Follow us
| Updated on: Jul 31, 2022 | 9:45 PM

चंद्रपूर : वाढदिवसाचा कार्यक्रम म्हणजे आप्तस्वकीय एकत्र येणे. केक कापणे, भेटवस्तूंची देवाण-घेवाण आणि सोबत असते स्पार्कल मेणबत्ती. या झगमगत्या स्पार्कल मेणबत्तीच्या प्रकाशाआड केवढा घातक स्फोट दडलाय. चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुक्यातल्या भिसी (Bhisi in Chimur taluka) या छोट्या गावात हा मोठा अपघात घडला आहे. आरंभ डोंगरे (Aarambha Dongre) हा दहा वर्षाचा मुलगा यात गंभीर जखमी झालाय. भिसी या छोट्या गावात राहणारे विनोद, वैशाली व  दहा वर्षीय आरंभ हे त्रिकोणी डोंगरे कुटुंब. तिघेही गावातच आपल्या मित्राकडे असलेल्या एका वाढदिवसानिमित्त जातात. वाढदिवसाला सुरुवात होते. केक कापला जातो भेटवस्तूंची देवाण-घेवाण होते. आणि सोबतीला स्पार्कल मेणबत्तीचा झगमगता प्रकाश दिपवून टाकतो. हास्यविनोदात जेवणं होतात. मुलं आसपास खेळत असताना आरंभ डोंगरे हा दहा वर्षाचा मुलगा स्पार्कल मेणबत्तीशी (sparkle candle) चाळा करत असतो. तेवढ्यात होतो मोठा स्फोट.

आरंभला लागले दीडशे टाके

या स्फोटानंतर अचानक आनंदाचा प्रसंग दुःखात परिवर्तित होतो. आरंभचा उजवा गाल आणि जीभ फाटते आणि त्याला रक्तबंबाळ अवस्थेत 50 किलोमीटर दूरवरच्या ब्रह्मपुरी या तालुक्याच्या ठिकाणी असलेल्या आस्था रुग्णालयात हलविले जाते. रक्तस्त्राव अधिक झाला असल्याने व वय कमी असल्याने प्रसंग बाका असतो. मात्र प्लास्टिक सर्जन असलेले डॉ. श्रीकांत पेरका, डॉ. सुमित जयस्वाल आणि डॉ. पंकज लडके यांच्या अथक परिश्रमाने 5 तास शस्त्रक्रिया चालते. आणि आरंभला दीडशे टाके लावल्यानंतर गाल- जीभ जुळवले जाते. आपल्या सर्वांच्या घरांमध्ये वाढदिवसाच्या कार्यक्रमात स्पार्कल मेणबत्ती सर्रास वापरली जाते. मात्र ती किती घातक आहे हे या प्रसंगाने पुढे आणले.

मेणबत्ती विझल्यानंतर चार तासांनी झाला स्फोट

या वाढदिवस कार्यक्रमात एकदा ही स्पार्कल मेणबत्ती पेटविली गेली. त्यातून स्पार्कल बाहेर पडले. आणि स्फोट तब्बल 4 तासांनी झाला ही यातील धक्कादायक बाब आहे. जखमी झाल्यावर आरंभचे फाटलेले गाल व जिभेला पडलेल्या जखमा अशा अवस्थेत क्षण न क्षण महत्त्वाचा होता. योग्य वेळी उपचार मिळाल्याने आस्था रुग्णालयाच्या डॉक्टरांनी आरंभचा उपचार शक्य केला. मात्र अशा आनंदी प्रसंगात मुलांच्या हाती अशी स्फोटकसदृश्य वस्तू देताना सावधानता बाळगा असे आवाहन ब्रम्हपुरीचे आस्था रुग्णालयातील डॉ. सुमित जयस्वाल यांनी केलंय. एक स्पार्कल मेणबत्ती किती घातक-स्फोटक ठरू शकते, याची चुणूक या प्रसंगाने मिळाली आहे. उपचार वेळेत मिळाल्याने आरंभ थोडक्यात बचावला. मात्र समस्त पालकवर्गाने या घटनेतून बोध घेण्याची गरज आहे.

हे सुद्धा वाचा

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.