ST Strike | विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न, पालघरमध्ये बस कंडक्टरची प्रकृती नाजूक, पुढील उपचारासाठी नाशिकला पाठविले
राज्यभर एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरु आहे. कर्मचारी संपावर असल्यामुळे बसफेऱ्या बंद आहेत. राज्यभर या आंदोलनाचा लोण पसरले असताना पालघर जिल्ह्यातील जव्हार बस डेपोतील एका बस कंडक्टरने (वाहक) आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. दीपक खोरगडे (वय वर्षे 30) असे बस कंडक्टरचे नाव आहे. खोरगडे यांनी विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलाय.
पालघर : राज्यभर एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरु आहे. कर्मचारी संपावर असल्यामुळे बसफेऱ्या बंद आहेत. राज्यभर या आंदोलनाचा लोण पसरले असताना पालघर जिल्ह्यातील जव्हार बस डेपोतील एका बस कंडक्टरने (वाहक) आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. दीपक खोरगडे (वय वर्षे 30) असे बस कंडक्टरचे नाव आहे. खोरगडे यांनी विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलाय.
प्रकृती नाजूक, पुढील उपचारासाठी नाशिकला हलविले
मिळालेल्या माहितीनुसार,पालघर जिल्ह्यातील जव्हार बस डेपोतील दीपक खोरगडे यांनी विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. सध्या कमी पगार आहे. तसेच पगारात वाढ होत नसल्यामुळे मानसिक स्थिती ढासल्यामुळे खोरगडे यांनी आत्महत्याचा प्रयत्न केला. त्यांच्यावर जव्हार कुटीर रूग्णालयात उपचार सुरु होते. प्रकृती नाजुक असल्यामुळे आता त्यांना पुढील उपचारासाठी नाशिक जिल्हा रुग्णालयात पाठवले जात आहे.
सरकारसोबत सकारात्मक चर्चा- गोपीचंद पडळकर
एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण या मुख्य मागणीसह राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलनाचे हत्यार उपसलेले आहे. जोपर्यंत मागण्या मान्य होणार नाहीत तोपर्यंत संप मिटणार नाही, असा पवित्रा कर्मचाऱ्यांनी घेतलाय. एसटी महामंडळाला रोज कोट्यवधींचा तोटा होतोय. एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन आणि त्यांच्या मागण्या या मुद्द्यावर भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांची आज (13 नोव्हेंबर) परिवहन मंत्री अनिल परब यांच्यासोबत बैठक झाली. या बैठकीनंतर पडळकर यानी मीडियाशी संवाद साधला. ही बैठक सकारात्मक झाल्याचं पडळकर यांनी सांगितलं. एसटी कर्मचाऱ्यांची भावना विलनीकरणाची आहे. हे आंदोलन कर्मचाऱ्यांनी उभं केलं आहे. त्यामुळे त्यांना विचारल्याशिवाय आम्ही कोणताच निर्णय घेऊ शकत नाही. कर्मचाऱ्यांच्या बरोबर जाऊन चर्चा करू. सरकारचे पर्याय कर्मचाऱ्यांना सांगू. त्यातून काही मार्ग निघाला तर तुम्हाला सांगू, असं पडळकर म्हणाले.
इतर बातम्या :
एसटी कर्मचाऱ्यांची व्यथा ! महाराष्ट्रात 22 तर तेलंगणात 50 हजार पगार, सरकार मागण्या मान्य करणार ?
हिरव्या युतीसोबत लोटांगण घातल्याने ही परिस्थिती, भाजप नेते किरीट सोमय्या यांची उद्धव ठाकरेंवर टीका
VIDEO: 12 आठवड्यांच्या मुदतीवर तडजोड करण्यास सरकार तयार; गोपीचंद पडळकरांचं मोठं विधान