Akola firing | रेतीघाटावर उपसा करणाऱ्यांची खनिज अधिकाऱ्यांवर दगडफेक, अंगरक्षकाचा हवेत गोळीबार
अकोल्यात आज सकाळी धक्कादायक प्रकार उघडकीस आला. रेतीघाटावर उपसा करणाऱ्यांनी अधिकाऱ्यांवर दगडफेक केली. त्यामुळं अधिकाऱ्यांना हवेत गोळीबार करण्याचे करण्याचे आदेश द्यावे लागले.
अकोला : जिल्हा खनिज अधिकारी यांनी हिंगणा तामासवाडी व निभोरा पूर्णा नदी पात्रात (Purna Nadi Patra) अचानक भेट दिली. या दिलेल्या भेटीने तिथल्या ट्रॅक्टर चालक आणि मजुरांची तारांबळ उडाली. त्या नदीपात्रात 50 च्या जवळपास ट्रॅक्टर व 300 मजूर आढळले. जिल्हा खनिज अधिकारी (District Mineral Officer) यांना बघताच मजूर आणि ट्रॅक्टर चालक पळून गेले. पळून जात असताना अधिकाऱ्यांच्या अंगावर दगडफेक केली. यामुळे अंगरक्षकाने हवेत गोळीबार केला. ही घटना अकोला तालुक्यातील नदीपात्रातली आहे. प्रणिता राजेंद्र चापले असं जिल्हा खानिकर्म अधिकाऱ्यांचं नाव आहे. विलास मनोहर गोमासे यांनी अखेर गोळीबार (firing in the air) केला. अकोल्यात आज सकाळी धक्कादायक प्रकार उघडकीस आला. रेतीघाटावर उपसा करणाऱ्यांनी अधिकाऱ्यांवर दगडफेक केली. त्यामुळं अधिकाऱ्यांना हवेत गोळीबार करण्याचे करण्याचे आदेश द्यावे लागले.
अशी घडली घटना
निंभोरा तालुका अकोला येथील पूर्णा नदीपात्रातील रेतीघाटावर ही घटना घडली. तपासणीसाठी अधिकारी गेले असत त्याठिकाणी 25 ते 30 लोकांचा जमाव होता. अनेकदा सांगूनही ते जुमानत नव्हते. त्यांची आक्रमक परिस्थिती बघून व योग्य प्रकारे रेती घाटाचे निरीक्षण करता यावे म्हणून जमाव हटविणे आवश्यक होते. नाईलाजास्तव संरक्षक यांनी 9 एप्रिल रोजी सकाळी 9.30 वाजता हवेत गोळीबार करण्याबाबत आदेश दिल्याचे माहिती आहे.
नेमकं काय घडलं
नदीपात्रात सकाळी अधिकारी तपासणी करायला गेले. त्याठिकाणी अतिरिक्त उपसा सुरू होता. अधिकाऱ्यांना पाहून वाळूचा उपसा करणारे पळून गेले. पण, पळता-पळता त्यांच्यापैकी काही जणांनी अधिकाऱ्यांवर दगडफेक केली. त्यामुळं अधिकाऱ्यांना गोळीबार करण्याचे आदेश द्यावे लागले. रेतीचे काही ठेकेदार हे मुजोर असतात. अशाच काही जणांनी दगडफेक केल्यानं ही घटना घडली.