कोरोनात हृषिकेशची पत्नी गेली, तर सुमित्रानं पतीला गमावलं! मुलांच्या भविष्यासाठी सुमित्रा-हृषिकेशची लग्नगाठ

कोरोनाने हृषिकेशची पत्नी गेली, तर सुमित्रानं पतीला गमावलं. अश्या परिस्थितीत मुलांच्या भविष्यासाठी सुमित्रा-हृषिकेशची लग्नगाठ बांधली

कोरोनात हृषिकेशची पत्नी गेली, तर सुमित्रानं पतीला गमावलं! मुलांच्या भविष्यासाठी सुमित्रा-हृषिकेशची लग्नगाठ
Follow us
| Updated on: May 31, 2022 | 11:16 AM

मुंबई : कोरोनाने (Corona) आपल्या जवळच्या लोकांना हिरावून घेतलं. त्यामुळे अनेकांचा आधार हरपला. अश्यात जर आपल्या पती किंवा पत्नीला गमावलं तर आपल्या जगण्याचा आधार जातो. एकटेपण येतं. पण अश्यात कुटुंब तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभं असेल तर या एकाकीपणावर सहज मात करू शकता. असाच काहीसा अनुभव हृषिकेश आणि सुमित्राला (Sumitra Hrishikesh Marriage) आला. घरातील मंडळींच्या साथीमुळे त्यांनी लग्नगाठ बांधली. परंपराना मोडीत काढत हा विवाह पार पडला. दोघांनी मुलांसह एकमेकांना स्विकारलं. दोन्ही कुटुंबाच्या संमतीने 27 मेला हा विवाह पार पडला.

कोरोनाने हृषिकेशची पत्नी गेली, तर सुमित्रानं पतीला गमावलं. अश्या परिस्थितीत मुलांच्या भविष्यासाठी सुमित्रा-हृषिकेशची लग्नगाठ बांधली. रूढी, परंपरा बाजूला सारत लोक काय म्हणतील, याचा विचारही न करता त्यांनी आपल्या मुलांसाठी आणि स्वत:साठी मोठा निर्णय घेतला. त्यांच्या या निर्णयामुळे त्यांच्या वैयक्तिक आयुष्याला सुखाची पालवी फुटलीय. काहीही झालं तरी प्रत्येकाला आनंदी आयुष्य जगण्याचा अधिकार आहे, असं म्हणत त्यांनी सप्तपदी घेतली.

सुमित्रा यांनी आपल्या पतीला गमावलं तर ऋषीकेश यांची पत्नी कोरोनाने हिरावून घेतली. या दोघांनाही मुलं आहेत. आपला जोडीदार गमावल्यानंतर त्यांनी आपल्या जीवनात पुढे जाण्याचा निर्णय घेतला. तसंच मुलांचही भविष्य घडावं यासाठी ते एकत्र आलेत.

हे सुद्धा वाचा

शिंदखेडा तालुक्यातील अक्कडसे गावच्या सुमित्रा यांचे पती विनोद पाटील यांचं कोरोनामुळे निधन झालं. त्यानंतर त्या कोसळल्या त्यांच्यासोबत पाच वर्षांच्या मुलीच्या डोक्यावरचं पित्याचं छत्र हरपलं. तर भडगाव तालुक्यातील कनाशी गावच्या ऋषीकेश यांच्या पत्नी अनघा यांचंही कोरोनामुळे निधन झालं. त्या शिक्षिका होत्या. ऋषीकेश यांनाही 22 वर्षांचा मुलगा आहे. त्यांच्याशी सुमित्रा यांचे दीर नितीन पाटील यांनी संपर्क केला.मग सुमित्रा यांचे दीर नितीन पाटील यांनी पुढाकार घेत त्यांचं दुसरं लग्न लावून दिलं. सुमित्रा यांची दुसरं लग्न करण्याची इच्छा इच्छा नव्हती. पण त्यांच्या दीराच्या पुढाकाराने हे लग्न पार पडलं.

तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.