“‘शासन आपल्या दारी’ ही प्रचारी थाटाची कल्पना”; सत्ताधाऱ्यांवर शेतकरी नेत्याचा घणाघात…

ऊस दर नियंत्रण मंडळ स्थापन करायला वेळ नाही आणि म्हणे हे गतिमान सरकार असल्याचे सांगण्यात येत आहे. यावेळी त्यांनी म्हटले आहे की, तुम्ही आमच्या दारात आला ठीक आहे पण आमच्या ऊस दरात काय? अनुदानाचं काय? असा सवालही त्यांनी सरकारला उपस्थित केला आहे.

'शासन आपल्या दारी' ही प्रचारी थाटाची कल्पना; सत्ताधाऱ्यांवर शेतकरी नेत्याचा घणाघात...
Follow us
| Updated on: Jun 12, 2023 | 8:00 PM

कोल्हापूर : राज्य सरकारचा ‘शासन आपल्या दारी’ या कार्यक्रमाच्या निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह सरकारमधील अनेक मंत्री वेगवेगळ्या भागात कार्यक्रम घेत आहेत. त्यानिमित्ताने सरकारकडून ‘शासन आपल्या दारी’ या योजनेच्या प्रसारासाठी वेगळ्या प्रकारे त्याची जाहिरात केली जात आहे. त्यावरूनच स्वाभिमानीचे प्रमुख राजू शेट्टी यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. राज्यातील अनेक भागात सध्या ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमाच्या निमित्ताने मुख्यमंत्र्यासह वेगवेगळ्या जिल्ह्यात मंत्र्याचे दौरे सुरु आहेत. त्यावरूनच आता माजी खासदार राजू शेट्टी यांनी सरकारवर टीका केली आहे. राजू शेट्टी म्हणाले की, ‘शासन आपल्या दारी’ ही प्रचारी थाटाची कल्पना आहे.

राज्यातील शेतकरी वेगवेगळ्या समस्यांनी ग्रस्त असताना सरकार फक्त योजनांच्या जाहिरातीबाजीवर लक्ष केंद्रीत करत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या समस्या जैसे थे असून या सरकारमुळे राज्यातील शेतकरी संकटात आला आहे.

राज्यातील कधी अवकाळी पावसामुळे शेतकरी मोठ्या संकटात आला आहे, तर कधी शेतमालाला योग्य बाजारभाव मिळाला नसल्याने आर्थिक संकटात सापडला आहे. शेतकऱ्यांची ही परिस्थिती असतानादेखील सरकार मात्र योजनांच्या प्रसिद्धी मागे लागले असल्याचे म्हणत त्यांनी राज्य सरकारवर घणाघाती आरोप केला आहे.

तर दुसरीकडे ऊस दर नियंत्रण मंडळ स्थापन करायला वेळ नाही आणि म्हणे हे गतिमान सरकार असल्याचे सांगण्यात येत आहे. यावेळी त्यांनी म्हटले आहे की, तुम्ही आमच्या दारात आला ठीक आहे पण आमच्या ऊस दरात काय? अनुदानाचं काय? असा सवालही त्यांनी सरकारला उपस्थित केला आहे.

राजू शेट्टी यांनी प्रशासनातील अधिकाऱ्यांच्या आणि कर्मचाऱ्यांच्या बदल्यांवरूनही त्यांनी प्रशासनाला धारेवर धरले होते. त्यावरुन ते म्हणाले की, बदल्याचं रेटकार्ड मी जाहीर केलं होतं, पैसे देऊन बदल्या करून घेणारे अधिकारी नागरिकांना लुटत असतात. त्यामुळे आता उद्याचा कार्यक्रम झाल्यानंतर कुठल्या लाभधारकाने कुणाला किती पैसे दिले याची यादीच मी जाहीर करणार असा इशाराही त्यांनी सरकारला आला आहे.

'शक्यता नाकारता येत नाही...', बीड प्रकरणावरून पवारांचं CM यांना पत्र
'शक्यता नाकारता येत नाही...', बीड प्रकरणावरून पवारांचं CM यांना पत्र.
'भक्तांना भिकारी म्हणतात मग तुम्हाला.', अंधारेंनी सुजय विखेंना सुनावलं
'भक्तांना भिकारी म्हणतात मग तुम्हाला.', अंधारेंनी सुजय विखेंना सुनावलं.
संतोष हत्येतील आरोपी फरार झाले कसे? सरपंचाची हत्या करून कुठं मुक्कामी?
संतोष हत्येतील आरोपी फरार झाले कसे? सरपंचाची हत्या करून कुठं मुक्कामी?.
लाडक्या बहिणींनो खुशखबर! 'या' महिन्यानंतर 2100 रुपये मिळणार
लाडक्या बहिणींनो खुशखबर! 'या' महिन्यानंतर 2100 रुपये मिळणार.
मोफत अन्न बंद करण्यावरून भिकाऱ्यांवर नेम, विखेंच्या प्रतिष्ठेची कोंडी
मोफत अन्न बंद करण्यावरून भिकाऱ्यांवर नेम, विखेंच्या प्रतिष्ठेची कोंडी.
'त्याला भाजप संपवतो...म्हणून शिंदे अन् दादांची नार्को टेस्ट करा'- कडू
'त्याला भाजप संपवतो...म्हणून शिंदे अन् दादांची नार्को टेस्ट करा'- कडू.
मतदारांचा अपमान,संजय गायकवाडांची घसरली जीभ तर अजितदादांचीही उर्मट भाषा
मतदारांचा अपमान,संजय गायकवाडांची घसरली जीभ तर अजितदादांचीही उर्मट भाषा.
2 कोटींच्या खंडणीची डील थेट मुंडेंच्या सरकारी बंगल्यावर? धसांचा आरोप
2 कोटींच्या खंडणीची डील थेट मुंडेंच्या सरकारी बंगल्यावर? धसांचा आरोप.
'साई भक्तांच्या भावना दुखावल्या हे मान्य, पण...', विखेंचं स्पष्टीकरण
'साई भक्तांच्या भावना दुखावल्या हे मान्य, पण...', विखेंचं स्पष्टीकरण.
'खासदराची चड्डी जागेवर राहणार नाही', पोलीस अधिकाऱ्याची वादग्रस्त पोस्ट
'खासदराची चड्डी जागेवर राहणार नाही', पोलीस अधिकाऱ्याची वादग्रस्त पोस्ट.