परिसरात दहशत निर्माण करायचा युवक, चौघांनी एकत्र येऊन अशी घडवली अद्दल

मारहाण करणाऱ्या युवकाची चांगलीच धुलाई केली. यात त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर आरोपी चारही जणांनी स्वतः पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले.

परिसरात दहशत निर्माण करायचा युवक, चौघांनी एकत्र येऊन अशी घडवली अद्दल
Follow us
| Updated on: Jun 15, 2023 | 5:39 PM

निलेश डाहाट, प्रतिनिधी, चंद्रपूर : गावात काही जण दहशत पसरवण्याचा प्रयत्न करतात. आपला दबदबा राहिला पाहिजे, असा त्यांचा समज असतो. पण, शेरास सव्वा शेर असतात. त्यामुळे कुण्या एकाची मक्तेदारी फार काळ टिकून राहत नाही. अशीच एक घटना बल्लारपुरात घडली. एक युवक स्वतःला त्या भागात डॉन समजायचा. तो नेहमी कुणाशीही भांडण करून स्वतःचे वर्चस्व प्रस्तापित करण्याचा प्रयत्न करायचा. त्यामुळे त्यावरून काही जणांशी त्याचा वाद होता. मृतकाने एका जणाला मारहाण केली. त्याचे मित्र धाऊन आले. त्यांनी मारहाण करणाऱ्या युवकाची चांगलीच धुलाई केली. यात त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर आरोपी चारही जणांनी स्वतः पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले. आता पोलीस कोणती भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष आहे.

दीपक कैथवास असे मृतकाचे नाव

परिसरात सतत दहशत निर्माण करणाऱ्या एका युवकाची त्याच परिसरातील 4 जणांनी मिळून हत्या केली. ही थरारक घटना बल्लारपूर शहरातील मौलाना आझाद वार्डात घडली. दीपक रामआसरे कैथवास (वय 28 वर्षे) असे मृतकाचे नाव आहे.

हे सुद्धा वाचा

आरोपींनी केले आत्मसमर्पण

बल्लारपूर पोलीस स्टेशन हद्दीतील रवींद्र वार्ड, कारवा रोड येथील दीपक कैथवास या युवकाची चार जणांनी मिळून हत्या केली. चारही आरोपींनी पोलीस स्टेशनमध्ये जात आत्मसमर्पण केले. मृतक दीपक कैथवास हा गुंड प्रवृत्तीचा युवक होता. परिसरात दहशत निर्माण करण्याचे काम करत राहायचं.

अशी आहेत आरोपींची नावे

यादरम्यान एका युवकाला त्याने बेदम मारहाण केली होती. त्याचा काटा काढण्यासाठी 4 जणांनी मिळून दगडाने ठेचून दीपकची निर्घृण हत्या केली. अर्जुन राजू कैथवास (वय 28 वर्षे), प्रथम शंकर पाटील (वय 25 वर्षे), गौरव राजू लिडबे (वय 22 वर्षे) तिघेही राहणार मौलाना आझाद वार्ड, बल्लारपूर आणि अमन दुखशौर कैथवास (वय 20 वर्षे, रा. बुद्धनगर वार्ड बल्लारपूर असे खून करणाऱ्या आरोपींची नावं आहेत.

बल्लारपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून आरोपींना अटक करण्यात आली आहे. पुढील तपास बल्लारपूर पोलीस करीत आहेत. अशी माहिती बल्लारपूरचे पोलीस निरीक्षक उमेश पाटील यांनी दिली.

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.