Amit Shah In Maharashtra : : महाराष्ट्राची भूमी सहकार क्षेत्रात काशीएवढीच पवित्र, अमित शाह यांचे गौरवोद्गार

महाराष्ट्राची भूमी सहकार क्षेत्रात काशीएवढीच पवित्र आहे, असे गौरवोद्गार केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी काढले. अहमदनगर जिल्ह्यातल्या प्रवरानगर (Pravara Nagar) इथं पहिल्या सहकार परिषदेत ते बोलत होते.

Amit Shah In Maharashtra : : महाराष्ट्राची भूमी सहकार क्षेत्रात काशीएवढीच पवित्र, अमित शाह यांचे गौरवोद्गार
अमित शाह
Follow us
| Updated on: Dec 18, 2021 | 2:37 PM

अहमदनगर : महाराष्ट्राची भूमी सहकार क्षेत्रात काशीएवढीच पवित्र आहे, असे गौरवोद्गार केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी काढले. अहमदनगर जिल्ह्यातल्या प्रवरानगर (Pravara Nagar) इथं पहिल्या सहकार परिषदेत ते बोलत होते.

‘बाळासाहेब विखे पाटलांनी चळवळ सुरू केली’

अहमदनगर जिल्ह्यातल्या प्रवरानगरात राधाकृष्ण विखे पाटील यांच्यातर्फे सहकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं. यावेळी भाजपाचे नेते आणि विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर, सुजय विखे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. यावेळी त्यांनी महाराष्ट्र राज्यातल्या सहकार क्षेत्राचे गुणगान गायले. बाळासाहेब विखे पाटील (Balasaheb Vikhe Patil) आणि धनंजयराव गाडगीळ (Dhananjay Gadgil) यांनी सहकाराची चळवळ रोवली. महाराष्ट्रात पद्मश्री बाळासाहेब विखे पाटील यांनी ही चळवळ उभी केली. महाराष्ट्रात हे होत असताना देशात अशाप्रकारे काहीतरी व्हावं, असं कोणालाही वाटलं नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदीं(PM Narendra Modi)नी मात्र अशाप्रकारचं मंत्रालय तयार केलं, असं ते म्हणाले.

‘सहकार क्षेत्र अडचणीत’

पुढे ते म्हणाले, की आज सहकार क्षेत्र अडचणीत आहे. मात्र, सहकारातल्या व्यक्तींमध्ये जर काही दोष असतील, तर त्यातून स्वत: ला मुक्त करण्याची जबाबदारी आपली आहे. महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यातल्या जिल्हा बँक आदर्श मानल्या जात होत्या. आज फक्त तीन बँका आहेत. हजारो कोटींचा घोटाळा कुणी केला? रिझर्व्ह बँकेनं केला का? असा सवाल अमित शाह यांनी केला.

‘शाह हे सहकारी चळवळीतून तयार झालेले कार्यकर्ते’

अमित शाह हे सहकारी चळवळीतून तयार झालेले कार्यकर्ते आहेत. सहकाराच्या मुळापर्यंतची ज्यांना जाणीव त्यांनाच मोदींनी सहकार मंत्री केले. इन्कम टॅक्सच्या जाचातून अमित शाह यांनी साखर कारखान्यांना सोडवलं, असं यावेळी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले.

Ajit Pawar : स्वत:चा राखीव सूट अमित शाहांना मुक्कामासाठी दिला, अजित पवारांकडून महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीचं दर्शन

हिंमत असेल तर वांद्र्यातून निवडून येऊन दाखवा, परब हे खेडेकर-कदम यांचे ‘महात्मा गांधी’; रामदास कदम यांचा हल्लाबोल

जगात सर्वाधिक सेंद्रिय शेती भारतामध्येच..! काय आहेत फायदे ? जाणून घ्या सर्वकाही

'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.