सर्व हप्ते भरूनही घराचा ताबा नाही! संतप्त म्हाडा लॉटरी विजेत्यांचं थेट श्रीकांत शिंदेंना साकडं
खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांना भेटून लॉटरी विजेत्यांनी गाऱ्याने मांडल्यानंतर म्हाडाचे सभापती विनोद घोसाळकर यांनी शिरढोण गावामध्ये जाऊन म्हाडाच्या सर्व सदनिकांची पाहणी केली आहे. तसेच लॉटरी विजेत्यांना दिवाळीच्या अगोदर सदनिकांचा ताबा देण्याचे आश्वासन दिले. म्हाडाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नितीन महाजन हे देखील यावेळी उपस्थित होते.
डोंबिवली : डोंबिवलीतील (Dombivli) शिरढोण आणि खोणी गावामध्ये म्हाडाच्या दोन हजार सदनिका बांधण्यात आल्या आहेत. मात्र, लॉटरी विजेत्यांना अद्यापही घराचा ताबा हा देण्यात आला नसल्याने लॉटरी विजेत्यांनी थेट कल्याण लोकसभेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांच्याकडे आपले गराने मांडले. विशेष म्हणजे लॉटरी विजेत्यांनी घराचे सर्व हप्ते भरूनही त्यांना घराचा ताबा मिळाला नसल्यामुळे ते अधिक आक्रमक झाल्याचे दिसून आले. कमी उत्पन्न असलेल्या गटासाठी दोन हजार सदनिका या शिरढोणमध्ये म्हाडाकडून (Mhada) बांधण्यात आल्या आहेत. या घरांची लॉटरी तब्बल 2018 मध्ये काढण्यात आली.
म्हाडाचे सभापती विनोद घोसाळकर यांनी घेतली भेट
खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांना भेटून लॉटरी विजेत्यांनी गाऱ्याने मांडल्यानंतर म्हाडाचे सभापती विनोद घोसाळकर यांनी शिरढोण गावामध्ये जाऊन म्हाडाच्या सर्व सदनिकांची पाहणी केली आहे. तसेच लॉटरी विजेत्यांना दिवाळीच्या अगोदर सदनिकांचा ताबा देण्याचे आश्वासन दिले. म्हाडाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नितीन महाजन हे देखील यावेळी उपस्थित होते. डॉ. नितीन महाजन यांनी लॉटरी विजेत्यांच्या नेमक्या काय समस्या आहेत, हे देखील जाणून घेतले.
म्हाडाचे सर्व हप्ते भरूनही घरांचा ताबा नाहीच
सदनिका विजेत्यांना सवलत मिळावी, अशी मागणी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी केली. या घरांची लॉटरी 2018 मध्येच काढली गेली होती. त्यानंतर लॉटरी विजेत्यांना 2021 मध्येच घरांचा ताबा मिळणार होता. मात्र, सदनिकेचे काम पूर्ण झाले नसल्यामुळे लॉटरी विजेत्यांना ताबा हा 2021 मध्ये मिळू शकला नाही. मात्र, म्हाडाचे सर्व हप्ते भरूनही आपली हक्काची घरे मिळत नसल्यामुळे लॉटरी विजेते आक्रमक झाले. घर कधी मिळणार याबाबतचे कुठलेही आश्वासन मिळत नसल्याने लॉटरी विजेत्यांनी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनाच मदत मागितले.