AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पालकमंत्र्यांना स्क्रिप्ट लिहून देणाऱ्यांनी आता कन्सेप्ट बदलावी, शौमिका महाडिक यांचा टोला

पालकमंत्री सतेज पाटील यांनी महाडिकांवर इतका अभ्यास केला की त्यांना एखादी डॉक्टरेट ही मिळू शकेल असा टोला देखील यावेळेस महाडिक यांनी लगावलाय. (Those who wrote the script to the Guardian Minister should change the concept now, says Shaumika Mahadik)

पालकमंत्र्यांना स्क्रिप्ट लिहून देणाऱ्यांनी आता कन्सेप्ट बदलावी, शौमिका महाडिक यांचा टोला
शौमिका महाडिक यांचा टोला
Follow us
| Updated on: Apr 25, 2021 | 6:29 PM

कोल्हापूर : गोकुळ निवडणुकीत पालकमंत्री शिळ्या कढीला ऊत आणत आहेत त्यांना स्क्रिप्ट लिहून देणाऱ्यांनी आता कन्सेप्ट बदलली पाहिजे अशी खोचक टीका जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष शौमिका महाडिक यांनी केली आहे. दऱ्याचे वडगाव येथे आयोजित ठराव धारकांच्या मेळाव्यात त्या बोलत होत्या. पालकमंत्री सतेज पाटील यांनी महाडिकांवर इतका अभ्यास केला की त्यांना एखादी डॉक्टरेट ही मिळू शकेल असा टोला देखील यावेळेस महाडिक यांनी लगावलाय. (Those who wrote the script to the Guardian Minister should change the concept now, says Shaumika Mahadik)

गोकुळ निवडणुकीत पाटील-महाडिक यांच्यात शाब्दिक वाद

गोकुळ निवडणुकीच्या निमित्ताने पालकमंत्री सतेज पाटील आणि माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्या शाब्दिक वाद रंगलाय. या वादात आता महाडिक यांच्या स्नुषा आणि जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष शौमिका महाडिक यांनी उडी घेतली आहे. महाडिक यांना गोकुळमधून लुटलेल्या पैशाची मस्ती असल्याचा घणाघात सतेज पाटील यांनी केला होता. याला शौमिका महाडिक यांनी प्रत्युत्तर दिलंय. महाडिक उद्योग समूह गेली अनेक वर्ष कार्यरत आहे. गोकुळमध्ये आम्ही टँकरच्या माध्यमातून डल्ला मारल्याचा आरोप होतोय..मात्र महाडिकांना गोकुळ मधून मिळणारे उत्पन्न त्यांच्या एकूण उद्योग समुहा मधून मिळणाऱ्या उत्पन्नाच्या तीन टक्के देखील नाही. त्यामुळे पालकमंत्र्यांचा आरोप चुकीचा असल्याचं त्यांनी म्हटले आहे. याउलट तुमच्या शिक्षण संस्थांमध्ये किती मुलांना मोफत शिक्षण दिलं? कोणती सहकारी संस्था स्थापन करून चालवून दाखवली असे सवाल त्यांनी उपस्थित केलेत. गोपाळ दूध संघावर बोलणाऱ्या नेत्यांनी महालक्ष्मी दूध संघावर ही भाष्य करावे असे आव्हान देखील शौमिका महाडिक यांनी दिलंय. पालकमंत्री यांनी प्रत्येक निवडणूक महाडिक विरोधात करून जिंकली यावेळी मात्र असं होणार नाही असा विश्वास शौमिका महाडिक यांनी व्यक्त केलाय.

जमिनी बळकावून, डोनेशन उकळून आम्ही व्यवसाय केले नाहीत

दरम्यान याच मेळाव्यात माजी खासदार धनंजय महाडिक यांनीही पालकमंत्री सतेज पाटील यांच्या वक्तव्याचा समाचार घेतलाय. जमिनी बळकावून आणि डोनेशन उकळून आणि कोणतेही व्यवसाय केलेले नाहीत. निवडणूक आली की महाडिकांवर आरोप करायचे आणि पळून जायचं इतकाच उद्योग विरोधक करत असल्याचं धनंजय महाडिक म्हणाले. तसेच गोपाळ दूध संस्था ही सहकारी संघ नव्हता तर खाजगी संस्था होती. त्यामुळे महालक्ष्मी सारखा संघ बुडवणाऱ्यांनी आपली टिमकी वाजवून नये असा टोला माजी खासदार धनंजय महाडिक यांनी खासदार संजय मंडलिक यांना उद्देशून लगावला. (Those who wrote the script to the Guardian Minister should change the concept now, says Shaumika Mahadik)

इतर बातम्या

Photo: राजा ललकारी अशी दे… नाकात नथ, कानात डोरलं, गळ्यात पोत अन् लाल साडी… शेवंताचा हा मराठमोळा लूक पाहाच!

संतापजनक ! डेटिंग अ‍ॅपवर चिटचॅट, भेटायला बोलावलं, शिक्षकाकडून अल्पवयीन मुलावर जबरदस्ती करत अनैसर्गिक सेक्स

लाडक्या बहिणींना 500 रुपये देणं ही फसवणूक; राऊतांची महायुतीवर टीका
लाडक्या बहिणींना 500 रुपये देणं ही फसवणूक; राऊतांची महायुतीवर टीका.
पीएम मुद्रा योजनेनं पालटलं कोट्यवधी भारतीयांचं नशीब; कसा करायचा अर्ज?
पीएम मुद्रा योजनेनं पालटलं कोट्यवधी भारतीयांचं नशीब; कसा करायचा अर्ज?.
शेतकरी ओळखपत्र नसेल तर मिळणार नाहीत लाभ; अशी करा नोंदणी..
शेतकरी ओळखपत्र नसेल तर मिळणार नाहीत लाभ; अशी करा नोंदणी...
पंतप्रधान मुर्ख बनवतात, पाकिस्तानचा काहीही बदला घेतला नाही - संजय राऊत
पंतप्रधान मुर्ख बनवतात, पाकिस्तानचा काहीही बदला घेतला नाही - संजय राऊत.
भारताचा पाकिस्तानला पूर्णपणे व्यापारावर बंदीचा दणका
भारताचा पाकिस्तानला पूर्णपणे व्यापारावर बंदीचा दणका.
सर्जिकल स्ट्राईकच्या वादग्रस्त वक्तव्यावरून कॉंग्रेस खासदाराचं घुमजाव
सर्जिकल स्ट्राईकच्या वादग्रस्त वक्तव्यावरून कॉंग्रेस खासदाराचं घुमजाव.
मुख्यमंत्री व्हावं वाटतं अन् कधी ना कधी... दादांना म्हणायचंय तरी काय?
मुख्यमंत्री व्हावं वाटतं अन् कधी ना कधी... दादांना म्हणायचंय तरी काय?.
'लाडकी बहीण'च्या निधीवरून शिरसाट भडकले, थेट दादांच्या खात्यावर निशाणा
'लाडकी बहीण'च्या निधीवरून शिरसाट भडकले, थेट दादांच्या खात्यावर निशाणा.
पाकिस्तानच्या मंत्र्यानं डिवचलं, पुढच्याच क्षणी भारतानं दाखवला इंगा
पाकिस्तानच्या मंत्र्यानं डिवचलं, पुढच्याच क्षणी भारतानं दाखवला इंगा.
'सिंधू'वरून पाकचा थयथयाट, संरक्षणमंत्र्यांची पुन्हा भारताला पोकळ धमकी
'सिंधू'वरून पाकचा थयथयाट, संरक्षणमंत्र्यांची पुन्हा भारताला पोकळ धमकी.