मोठ्या भावाच्या निधनाचे वृत्त कळताच लहान भाऊ गेला, बंधूप्रेम पाहून ‘धर्नुधर’लाही धक्का बसला! तीन मृत्यूनंतर गावकरी सुन्न
मूत्रपिंडाच्या आजारावर उपचार घेत असलेल्या मोठ्या भावाच्या निधनाचे वृत्त कळताच लहान भावाचा हृदयविकाराने मृत्यू झाला. (Three Person Died in Washim on same day)

वाशिम : मूत्रपिंडाच्या आजारावर उपचार घेत असलेल्या मोठ्या भावाच्या निधनाचे वृत्त कळताच लहान भावाचा हृदयविकाराने मृत्यू झाला. तर या दोन भावांमधील प्रेम पाहून गावातील एका तिसऱ्याही व्यक्तीचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. ही हृदय हेलावणारी घटना वाशिमच्या मानोरा तालुक्यातील सोयजना येथे घडली. (Three Person Died in Washim on same day)
वाशिममधील मानोरा तालुक्यातील सोयजना येथील जनार्दन सीताराम पवार (75) हे मूत्रपिंडाच्या आजाराने ग्रस्त होते. त्यांच्यावर वर्धा येथील सावंगी मेघेच्या रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र रविवार 27 जूनला त्यांचे निधन झाले. जनार्दन यांच्या मृत्यूनंतर त्यांचे पार्थिव घरी आणले. मात्र ते पाहूनच त्यांचे लहान बंधू मुरलीधर सीताराम (70) यांना हृदयविकाराचा झटका आला आणि काही क्षणात त्यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे गावकरी सुन्न झाले.
तर दुसरीकडे या दोन भावांचे प्रेम पाहून गावातील धनुर्धर लक्ष्मण कोल्हे (55) हेही भारावले. या दोघांचे अंत्यसंस्कार पार पाडून जनार्दन पवार घरी परतले. त्यावेळी त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांचेही निधन झाले. दरम्यान एकाच दिवशी गावातील तिघांचा मृत्यू झाल्याने गावात स्मशान शांतता पसरली होती.
अर्ध्या तासाच्या फरकानेच दोघांचा मृत्यू
जनार्दन पवार यांचे पार्थिव पाहून त्यांचे लहान बंधू मुरलीधर पवार यांचा हृदयविकाराने मृत्यू झाला. तर जनार्दन पवार यांचे अंत्यसंस्कार पार पाडून घरी परतल्यानंतर अवघ्या अर्ध्या तासानेच धनुर्धर कोल्हे यांनाही हृदयविकाराचा धक्का बसला. विशेष म्हणजे त्यांना उपचारासाठी रुग्णालयात नेण्याची संधीही नातेवाईकांना मिळाली नाही. मुरलीधर पवार यांच्या मृत्यूनंतर अवघ्या अर्ध्या तासातच धनुर्धर कोल्हे यांचाही दुर्दैवी मृत्यू झाला. यामुळे संपूर्ण गाव शोकमग्न झाले. (Three Person Died in Washim on same day)
संबंधित बातम्या :
‘चंद्रपूरमधील दारूबंदी लागू करा, अन्यथा क्रांती दिनी पुरस्कार परत करणार’, पुरस्कार्थींची घोषणा
दिवसा जमावबंदी, रात्री संचारबंदी, डेल्टा प्लसचा धोका, निर्बंधात बदल, अकोल्यात काय सुरु काय बंद?