रायगड / मेहबूब जमादार : झेनिथ धबधब्यावर सहलीसाठी आलेले तीन पर्यटक पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्याची दुर्दैवी घटना खोपोलीत घडली आहे. मृतांमध्ये दोन महिला आणि एका आठ वर्षाच्या बालकाचा समावेश आहे. महिलांचे मृतदेह हाती लागले असून चिमुरडा अद्याप बेपत्ता आहे. रेस्क्यू पथकाकडून चिमुरड्याचा शोध सुरु आहे. मेहरबानू खान( 40), रुबिना वेळेकर (40), आलंमा खान (8) अशी वाहून गेलेल्या तिघांची नावे असून हे खोपोली येथील रहिवासी असून त्यांचे कुटुंब व मित्र परिवारातील 12 जणांना रेस्क्यू करण्यात यश आले असून बेपत्ता चिमुरड्याची शोध मोहीम हाती घेण्यात आली आहे. (Three tourists were carried to Zenith Falls in Khopoli; Eight-year-old boy goes missing)
रायगड जिल्ह्यात कर्जत, खालापूरमध्ये मुसळधार पाऊस सुरुच आहे. खोपोलीतील झेनिथ धबधबा हे पर्यटकांचे आवडते ठिकाण असून रोज येथे पर्यटक मोठ्या प्रमाणात भेट देत असतात. झेनिथ धबधब्याच्या प्रवाहापासून निघाणाऱ्या नदीमध्ये आज सकाळपासूनच पाण्याचा प्रवाह वाढला आहे. काही पर्यटक या नदीचा प्रवाह ओलांडताना वाहून गेले तर काही जण प्रवाहामध्ये अडकले होते. ही घटना कळताच खोपोली पोलीस व अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी कार्यकर्त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी तीन पर्यटक वाहून गेले तर 12 पर्यटकांना रेस्क्यू करण्यात यश आले आहे.
दोन दिवसापूर्वी बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने गुलाब वादळ तयार झाले होते. हे वादळ ओरिसाच्या किनारपट्टीवरच क्षमले असले तरी याचा परिणाम सर्वत्र दिसत आहे. गेले दोन दिवस महाराष्ट्रात मुसळधार पाऊस सुरु आहे. सतत कोसळणाऱ्या पावसामुळे राज्यातील नद्या दुथडी भरुन वाहत आहेत. तसेच पावसामुळे सर्वत्र धबधबेही प्रवाहित झाले असून पर्यटक पावसाळी सहलीचा आनंद घेण्यासाठी मोठ्या प्रमाणावर धबधब्यांवर गर्दी करीत आहेत. प्रशासनाकडून वारंवार धोक्याचा इशारा देऊनही पर्यटक याकडे दुर्लक्ष करताना दिसत आहेत.
गंगापूर तालुक्यातील धमोरी गावातही पूराचा फटका बसला. कालपासून झालेल्या मुसळधार पावसाने नागझरी नदीला पूर आला आहे. या पुरातून गावाकडे परतण्यासाठी दोघे शेतकरी हे पात्र पार करत होते. मात्र पाण्याचा प्रवाह एवढा अफाट आणि वेगवान होता की या दोघांना त्यात तग धरणे मुश्कील झाले. अर्धी नदी पार केल्यानंतर काहीच अंतर शिल्लक असताना पाण्याच्या वेगासोबत हे दोघे शेतकरी वाहून गेले. दोन शेतकरी वाहून जातानाचा व्हिडीओ कॅमेऱ्यात झाला कैद झाला आहे.
उस्मानाबाद तालुक्यातील दाऊतपूर येथे तेरणा नदीच्या पुरात अडकलेल्या 6 मजुरांना हेलिकॉप्टरच्या सहाय्याने सुखरुप बाहेर काढण्यात अखेर संध्याकाळच्या सुमारास यश आले आहे. उस्मानाबाद जिल्ह्याला सोमवारी रात्री मुसळधार पावसाने झोडपून काढले आहे. अतिवृष्टीमुळे तेरणा धरण पूर्ण भरले. त्यामुळे धरणाचे सर्व दरवाजे उघडण्यात आले. तेरणा नदीत मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग करण्यात आल्याने नदीकाठच्या गावात मोठ्या प्रमाणात पाणि शिरले. त्यामुळे दाऊतपूरमध्ये 6 मजूर गेल्या 36 तासापासून पुराच्या पाण्यात अडकून पडले होते. हेलिकॉप्टरच्या सहाय्याने या मजुरांना सुखरुपपणे बाहेर काढण्यात यश आले आहे. (Three tourists were carried to Zenith Falls in Khopoli; Eight-year-old boy goes missing)
Video | Aurangabad | औरंगाबादेत पुरात वाहून जाणारे दुचाकीस्वार गावकऱ्यांमुळे थोडक्यात बचावले -tv9 #Rain #Marathwada #Weather #WeatherForecast #MaharashtraWeather pic.twitter.com/GTnEMCOXDj
— TV9 Marathi (@TV9Marathi) September 28, 2021
इतर बातम्या
अतिवृष्टी, पुरस्थितीचा अजित पवार यांनी घेतला आढावा, जिल्ह्यांच्या प्रशासनाला सतर्क राहण्याचे निर्देश
नवी मुंबईकरांच्या पाण्याचा प्रश्न मिटला, मोरबे धरण 100 टक्के भरले!