Chandrapur Tourist | अनधिकृत संकेतस्थळांमुळे पर्यटकांची फसवणूक; चंद्रपूरच्या ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील प्रकार

ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाने यासंदर्भात पोलीस विभागात आता रीतसर तक्रार दिली आहे. फसवणूक झालेल्या पर्यटकांनाही संबंधित पोलीस ठाण्यामध्ये रीतसर तक्रार नोंदविण्याचे आवाहन करण्यात आले आहे. गेली दोन वर्ष www.mytadoba.org हे अधिकृत संकेतस्थळ उत्तमरित्या ताडोबा प्रवेश नोंदणीचे काम करत आहे.

Chandrapur Tourist | अनधिकृत संकेतस्थळांमुळे पर्यटकांची फसवणूक; चंद्रपूरच्या ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील प्रकार
अनधिकृत संकेतस्थळांमुळे पर्यटकांची फसवणूकImage Credit source: t v 9
Follow us
| Updated on: May 14, 2022 | 12:23 PM

चंद्रपूर : चंद्रपूरच्या ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या (Tadoba-Dark Tiger Project) प्रवेश नोंदणी संदर्भात अनधिकृत संकेतस्थळांमुळे पर्यटकांची लुबाडणूक होत आहे. यामुळेच व्याघ्रप्रकल्पाच्या अधिकृत संकेतस्थळा (Unofficial Website) व्यतिरिक्त अन्य कुठल्याही संकेतस्थळावरून प्रवेश नोंदणी करू नये असे आवाहन क्षेत्र संचालक डॉ. जितेंद रामगावकर (Area Director Jitendra Ramgaonkar) यांनी केले आहे. गेल्या काही दिवसांत अनधिकृत असलेल्या काही संकेतस्थळावरून प्रवेश नोंदणी झाली. प्रत्यक्ष प्रवेश निश्चित न झाल्याने पर्यटकांनी तक्रारी केल्या होत्या. या अनधिकृत संकेतस्थळांच्या माध्यमातून पर्यटकांनी ऑनलाईन भरलेली रक्कमही परत मिळाली नाही. ताडोबा संदर्भात पर्यटकांमध्ये संभ्रम पसरला होता.

अधिकृत संकेतस्थळ काय

ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाने यासंदर्भात पोलीस विभागात आता रीतसर तक्रार दिली आहे. फसवणूक झालेल्या पर्यटकांनाही संबंधित पोलीस ठाण्यामध्ये रीतसर तक्रार नोंदविण्याचे आवाहन करण्यात आले आहे. गेली दोन वर्ष www.mytadoba.org हे अधिकृत संकेतस्थळ उत्तमरित्या ताडोबा प्रवेश नोंदणीचे काम करत आहे. वेबसाईट संदर्भात फसवणूक टाळण्यासाठी यापुढच्या काळात ताडोबा शब्दाचा अन्य कुठल्या वेबसाईटने वापर करू नये यासाठी न्यायालयाकडून आदेश प्राप्त करणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

नवीन पर्यटकांची फसवणूक

ताडोबा म्हटलं की, हमखास वाघ दिसणारचं. त्यामुळं मोठ्या प्रमाणात पर्यटक येतात. परंतु, नवीन पर्यटकांनी नोंदणीबाबत पुरेसी माहिती नसते. अशावेळी त्यांची फसवणूक होते. ही फसवणूक झाल्याचे लक्षात आले आहे. त्यामुळं अधिकृत संकेतस्थळावर नोंदणी करावी, असं आवाहन क्षेत्र संचालक जितेंद्र रामगावकर यांनी केले आहे. अधिकृत संकेतस्थळ कोणतं याची माहिती त्यांनी इथं दिली आहे.

हे सुद्धा वाचा

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.