राखेच्या वाहतुकीविरोधात परळीच्या महिला आक्रमक, ड्रायव्हरला चोप, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
बीडच्या परळी तालुक्यातील पांगरी गावातील महिला अवैधरित्या आणि खुलेआम होणाऱ्या राखेच्या वाहतुकी विरोधात आक्रमक झाल्या आहेत. (transportation of Ash parali pangari Women Aggresive Video Viral on Social Media)
बीड (परळी) : बीडच्या परळी तालुक्यातील पांगरी गावातील महिला अवैधरित्या आणि खुलेआम होणाऱ्या राखेच्या वाहतुकीविरोधात आक्रमक झाल्या आहेत. उघड्या वरून राखेची वाहतूक होत असल्यानं तसंच परिसरात राखेचे लोट पसरत असल्याने त्यांनी राखेची वाहतूक करणारी गाडी अडवून थेट ड्रायव्हरलाच चोप दिला. (transportation of Ash parali pangari Women Aggresive Video Viral on Social Media)
पांगरी गावच्या परिसरात राखेच्या वाहतुकीमुळे महिलांना अडचणींचा सामना करावा लागतोय. याच विरोधात पांगरी गावातील महिला आक्रमक झाल्या असून राखेची वाहतूक करणाऱ्या गाड्या अडवून, गाडी चालकांकडून या महिलांनी रस्त्यावर जमा झालेली राख साफ करून घेतलीय.
या महिला एवढ्यावरच थांबल्या नसून त्यांनी गाडी चालकांना चोप देखील दिला आहे. या सर्व प्रकाराचा व्हिडिओ समोर आला आहे. अनेक वेळा या राखेची वाहतूक थांबवण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली होती. परंतु स्थानिक प्रशासनाकडून कोणतीच कारवाई न झाल्याने या महिला आक्रमक झाल्या आहेत.
व्हिडीओ पाहा :
(transportation of Ash parali pangari Women Aggresive Video Viral on Social Media)
हे ही वाचा :