सफरचंदाची वाहतूक करणारा ट्रक पलटी, सफरचंद घरी घेऊन जाण्यासाठी नागरिकांची गर्दी

अहमदनगर जिल्ह्यातील करंजी घाटाजवळ ट्रकचा अपघात झालाय. ट्रक पलटी झाला, कल्याण - निर्मळ राष्ट्रीय महामार्गावर हा अपघात झाला. अपघातग्रस्त ट्रक सफरचंदाची वाहतूक करत होता. हा ट्रक मुंबईहून नांदेडकडे सफरचंद घेऊन जात असताना करंजी घाटाजवळ हा अपघात घडला.

सफरचंदाची वाहतूक करणारा ट्रक पलटी, सफरचंद घरी घेऊन जाण्यासाठी नागरिकांची गर्दी
सफरचंदाने भरलेला ट्रक पलटी
Follow us
| Updated on: Apr 07, 2022 | 10:47 AM

अहमदनगर : अहमदनगर (Ahmednagar) जिल्ह्यातील करंजी घाटाजवळ ट्रकचा अपघात (Truck Accident) झालाय. ट्रक पलटी झाला, कल्याण – निर्मळ राष्ट्रीय महामार्गावर हा अपघात झाला. अपघातग्रस्त ट्रक सफरचंदाची वाहतूक करत होता. हा ट्रक मुंबईहून नांदेडकडे सफरचंद घेऊन जात असताना करंजी घाटाजवळ हा अपघात घडला. आज सकाळी आठच्या दरम्यान हा ट्रक पलटी झाला. हा ट्रक कसा पलटी झाला याबाबत अद्याप माहिती समोर आलेली नाही. मात्र चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रक पलटी झाला असावा असा अंदाज बांधण्यात येत आहे. अपघाताची माहिती मिळताच नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली. ट्रक पलटी झाल्यामुळे सफरचंद रस्त्यावर पडले होते. नागरिकांनी या सफरचंदावर ताव मारण्यास सुरुवात केली. मात्र पोलीस (police) घटनास्थळी दाखल झाल्याने त्यांनी नागरिकांना सफरंद नेण्यास मज्जाव केला.

पोलीस घटनास्थळी दाखल

घटनेबाबत अधिक माहिती अशी की, एक ट्रक सफरंच घेऊन मुंबईहून नांदेडकडे जात होता. याच दरम्यान हा ट्रक कल्याण- निर्मळ राष्ट्रीय महामार्गावरील करंजी घाटाजवळ आला असता अचानक पलटी झाला. या ट्रकमध्ये सुमारे नऊ टन सफरचंद होते. ट्रक पलटी झाल्याने सर्व सफरचंद रस्त्यावर पडले. हे सफरचंद गोळा करण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली.  मात्र अपघाताची माहिती मिळतचा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि मदत कार्याला सुरुवात केली. पोलिसांनी नागरिकांना सफरचंद घरी घेऊन जाण्यास मज्जाव केला. या अपघातातमध्ये सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती पोलिसांनी दिली.

ट्रकचे नुकसान

या अपघातामध्ये सुदैवाने जीवितहानी टळली आहे. मात्र वाहनाचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे. ट्रकचा समोरचा काच फुटला आहे. सोबतच ट्रकमधील सर्व सफरचंद रस्त्यावर पडल्याने मोठे नुकसान झाले आहे. हा अपघात नेमका कसा झाला याची माहिती समोर येऊ शकलेली नाही. मात्र चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला असावा असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरू आहे.

संबंधित बातम्या

Rape on Animal | घृणास्पद! कोल्हापुरात घोरपडीवर बलात्कार, कोकणातून तरुण ताब्यात

Nashik Public Healthcare: नाशिक जिल्हा रुग्णालयात 3 महिला बोगस डॉक्टर आढळल्याने खळबळ

Aurangabad | शहरातील MIM चे जिल्हाध्यक्ष, पदाधिकाऱ्यावर अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा, पक्षाच्याच माजी नगरसेवकाची तक्रार

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.