AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आम्ही विकासाचा शब्द देतो आणि पाळतोही, उदयनराजे भोसलेंचा शिवेंद्रसिंहराजेंना टोला

संपूर्ण महाराष्ट्रात एकमेव अशी सातारा विकास आघाडी आहे, जिने केलेल्या कामच जाहीरपणे ऑडिटचे बोर्ड लावले होते, असा खोचक टोला खासदार उदयनराजे भोसले यांनी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना लगावला आहे.

आम्ही विकासाचा शब्द देतो आणि पाळतोही, उदयनराजे भोसलेंचा शिवेंद्रसिंहराजेंना टोला
शिवेंद्रराजे भोसले उदयनराजे भोसले
Follow us
| Updated on: Sep 15, 2021 | 8:53 AM

सातारा: विकास कामांचे आम्ही केवळ आश्वासन देत नाही. शब्द देतो आणि तो पाळतो, असं राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले यांनी म्हटलं आहे. संपूर्ण महाराष्ट्रात एकमेव अशी सातारा विकास आघाडी आहे, जिने केलेल्या कामच जाहीरपणे ऑडिटचे बोर्ड लावले होते, असा खोचक टोला खासदार उदयनराजे भोसले यांनी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना नाव न घेता लगावला आहे. सातारा नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उदयनराजे भोसले यांच्या या वक्तव्य हे सातारा विकास आघाडी आणि आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या नगरविकास आघाडी स्वतंत्रपणे निवडणूक लढणार असल्याचे संकेत आहेत.

पाहा व्हिडीओ

नगरपालिका स्वतंत्रपणे लढण्याचे संकेत

सातारा नगरपालिका निवडणुकीत दोन्ही राजे एकत्र लढणार नसल्याचं संकेत भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांनी आज स्ट्रीटलाईट शुभारंभ कार्यक्रमात दिले आहेत. सातारा विकास आघाडी केवळ आश्वासन देत नाही तर आम्ही शब्द देतो आणि तो पाळतो असा खोचक टोला त्यांनी नगरविकास आघाडीला म्हणजेच शिवेंद्रराजे भोसले यांना लगावला आहे. संपूर्ण महाराष्ट्रात एकमेव अशी सातारा विकास आघाडी आहे की तिने केलेल्या कामाचं जाहीरपणे ऑडिट बोर्डवर लावले होते असं म्हणतं केलेल्या कामाचा पाढा उदयनराजेंनी माध्यमांसमोर वाचला. त्यामुळे होणाऱ्या नगरपालिका निवडणुकीत दोन्ही राजे एकत्र लढणार की मनोमिलन तुटणार यावर आता प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.

सातारा नगरपालिकेत उदयनराजेंची सत्ता

सातारा नगरपालिकेची निवडणूक 2016 मध्ये झाली होती. त्या निवडणुकीत मतदारांतून थेट नगराध्यक्ष निवडण्यात आला होता. 2016 च्या निवडणुकीत देखील मनोमिलन तुटलं होतं. खासदार उदयनराजे भोसले यांच्या सातारा विकास आघाडीकडून नवख्या माधवी कदम यांना संधी देण्यात आली होती. तर, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या नगरविकास आघाडीकडून वेदांतिकाराजे भोसले यांना उमेदवारी देण्यात आली होती. माधवी कदम यांच्या प्रचारासाठी उदयनराजे भोसले यांनी सातारा ढवळून काढला होता. अखेर माधवी कदम विजयी झाल्या. तर, सातारा विकास आघाडीचे 22 नगरसेवक निवडून आले होते. तर, भाजपचे 6 नगरसेवक त्या निवडणुकीत विजयी झाले होते. नगरविकास आघाडीला 12 जागा मिळाल्या होत्या.

साताऱ्यात तिरंगी लढतीची शक्यता

2019 च्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि खासदार उदयनराजे भोसले भाजपमध्ये दाखल झाले. त्यामुळे साताऱ्यात आता दोन्ही नेत्यांच्या स्वतंत्र आघाड्या निवडणूक लढवतील. साताऱ्यात गेल्यावेळी निवडून आलेले भाजप नगरसेवक कोणत्या आघाडीच्या बाजूनं जाणार हे पाहावं लागणार आहे. तर, राष्ट्रवादी काँग्रेस साताऱ्यात आमदार शशिकांत शिंदे यांच्या नेतृत्त्वात निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. त्यामुळं सध्यातरी सातारा नगरपालिकेची निवडणूक तिरंगी होणार असल्याचं चित्र दिसत आहे.

इतर बातम्या:

शिवेंद्रराजेंना मी कोणतंही निमंत्रण दिलेले नाही, पक्षाच्या निष्ठेबद्दल कुणीही काहीही सांगण्याची गरज नाही : शशिकांत शिंदे

साताऱ्यातील मराठा गोलमेज परिषदेकडे उदयनराजेंनी फिरवली पाठ; अनुपस्थितीची रंगली चर्चा

Udayanraje Bhonsle criticise Nagar Vikas Aaghadi and Shivendrasinghraje Bhonsle over development works in Satara

पाकिस्तानला भारताचा आणखी एक दणका!
पाकिस्तानला भारताचा आणखी एक दणका!.
5 तारखेला लग्न झालं अन् फोन आला, हळदीच्या अंगाने जवान सीमेवर परतला
5 तारखेला लग्न झालं अन् फोन आला, हळदीच्या अंगाने जवान सीमेवर परतला.
टेररीस्ट अ‍ॅक्टिव्हिटीसाठी धार्मिक स्थळांचा आसरा - विक्रम मिस्री
टेररीस्ट अ‍ॅक्टिव्हिटीसाठी धार्मिक स्थळांचा आसरा - विक्रम मिस्री.
दहशतवाद्यांचे अड्डे हेच आमचं टार्गेट,विक्रम मिस्रींनी स्पष्टच सांगितलं
दहशतवाद्यांचे अड्डे हेच आमचं टार्गेट,विक्रम मिस्रींनी स्पष्टच सांगितलं.
ड्रोन, मिसाईलला हवेतच निकामी केलं - कर्नल सोफिया कुरेशी
ड्रोन, मिसाईलला हवेतच निकामी केलं - कर्नल सोफिया कुरेशी.
एअर स्ट्राईकनंतर आता वॉटर स्ट्राईक! बगलिहार, सलाल धरणाचे दरवाजे उघडले
एअर स्ट्राईकनंतर आता वॉटर स्ट्राईक! बगलिहार, सलाल धरणाचे दरवाजे उघडले.
पाकिस्तानला धुळीत लोळवणारं एस-400 सिस्टिम काय आहे?
पाकिस्तानला धुळीत लोळवणारं एस-400 सिस्टिम काय आहे?.
हार्पी ड्रोनची ताकद अन् पाक उद्ध्वस्त, भारताकडून करारा जवाब, घडतंय काय
हार्पी ड्रोनची ताकद अन् पाक उद्ध्वस्त, भारताकडून करारा जवाब, घडतंय काय.
भारताकडून पहिल्यांदा S-400 सिस्टिमचा वापर
भारताकडून पहिल्यांदा S-400 सिस्टिमचा वापर.
बलुच नागरिकांचं टोकाचं पाऊल, पाकविरोधात बंडाचं हत्यार; कारण काय?
बलुच नागरिकांचं टोकाचं पाऊल, पाकविरोधात बंडाचं हत्यार; कारण काय?.