नारायण राणे घाईघाईत दिल्लीकडे रवाना; केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश होणार?
भाजपचे खासदार नारायण राणे घाईघाईत दिल्लीकडे रवाना झाले आहेत. उद्याच नरेंद्र मोदी सरकारचा विस्तार होण्याची शक्यता आहे. या विस्तारात नारायण राणेंना संधी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. (narayan rane)
सिंधुदुर्ग: भाजपचे खासदार नारायण राणे घाईघाईत दिल्लीकडे रवाना झाले आहेत. उद्याच नरेंद्र मोदी सरकारचा विस्तार होण्याची शक्यता आहे. या विस्तारात नारायण राणेंना संधी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यातच राणे आज घाईघाईने दिल्लीला रवाना झाल्याने राणेंच्या मंत्री होण्याच्या चर्चेने अधिकच जोर धरला आहे. (Union cabinet reshuffle on the cards, narayan rane likely to be inducted)
नारायण राणे कणकवलीतील ओम गणेश बंगल्यावरून दिल्लाकडे जाण्यासाठी निघाले आहे. कणकवलीहून ते गोव्याला जातील. तिथून थेट दिल्ली रवाना होणार आहेत. त्यामुळे अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. कालच राणेंना त्यांच्या केंद्रीय मंत्रिमंडळातील समावेशाबाबत विचारण्यात आले होते. त्यावर त्यावर अधिकृत पत्रं किंवा फोन येत नाही तोपर्यंत काही बोलता येणार नाही, असं राणे म्हणाले होते. कालच त्यांनी हे वक्तव्य केलं होतं. त्यानंतर आज ते तातडीने दिल्लीकडे रवाना झाले. त्यामुळे त्यांना दिल्लीहून मंत्रीपदाची शपथ घेण्यासाठी बोलावणं आलं का? अशी चर्चा सुरू झाली आहे. मात्र, राणे किंवा त्यांच्या दोन्ही मुलांनी त्याबाबत काहीही भाष्य केलं नाही. भाजपकडूनही काहीही सांगण्यात आलेलं नाही. त्यामुळे राणेंच्या दिल्लीवारीचं गूढ वाढलं आहे.
काय म्हणाले होते राणे
काल राणेंनी सिंधुदुर्गात पत्रकार परिषद घेतली होती. तुमचा केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश होणार असल्याची चर्चा आहे, असं राणे यांना विचारण्यात आलं. त्यावेळी त्यांनी अत्यंत सावध प्रतिक्रिया दिली. असं काही घडत असेल तर मी आभार मानतो. तुमच्या तोंडात साखर पडो. अधिकृत पत्रं येत नाही आणि जोपर्यंत शपथ घेत नाही, तोपर्यंत जरा धीर धरा, असं राणे यांनी हसत सांगितलं होतं.
अपना दल, जेडीयूचा समावेश?
याशिवाय जेडीयू, अपना दलचाही मंत्रिमंडळात समावेश होण्याची शक्यता आहे. पुढच्या वर्षी उत्तर प्रदेशात निवडणुका आहेत. त्यामुळे अपना दलच्या अध्यक्षा अनुप्रिया पटेल यांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागण्याची चिन्हे आहेत. नुकतीच पटेल यांनी भाजपचे नेते अमित शहा यांची भेट घेतली होती. (Union cabinet reshuffle on the cards, narayan rane likely to be inducted)
संबंधित बातम्या:
शरद पवार यांना असा मुख्यमंत्री कसा चालतो?; नारायण राणेंचा सवाल
येत्या 7 जुलै रोजी केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार?, राणे, हिना गावित यांचा समावेश होणार?
(Union cabinet reshuffle on the cards, narayan rane likely to be inducted)