‘गुलाबराव झोपा काढतात का?’, उन्मेष पाटलांचा सवाल; नारायण राणेंना पुरुन उरलोय, नादी लागू नका, पालकमंत्र्यांचा पलटवार

राज्य सरकारनं जाहीर केलेल्या मदतीमध्ये जळगावचं नाव नसल्याचा आरोप करत खासदार उन्मेष पाटील यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यावर सडकून टीका केली.

'गुलाबराव झोपा काढतात का?', उन्मेष पाटलांचा सवाल; नारायण राणेंना पुरुन उरलोय, नादी लागू नका, पालकमंत्र्यांचा पलटवार
उन्मेष पाटील गुलाबराव पाटील
Follow us
| Updated on: Nov 03, 2021 | 1:37 PM

जळगाव: पावसाळ्यात अतिवृष्टीमुळं झालेल्या नुकसानाची शेतकऱ्यांना राज्य सरकारकडून भरपाई देण्यात येत आहे. राज्य सरकारनं जाहीर केलेल्या मदतीमध्ये जळगावचं नाव नसल्याचा आरोप करत खासदार उन्मेष पाटील यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यावर सडकून टीका केली. शेतकरी नुकसान भरपाई यादीत जळगाव जिल्ह्याचे नाव नाही, हे गुलाबभाऊ झोपा काढतात काय? असा सणसणीत टोला भाजप खासदार उन्मेष पाटील यांनी लगावला. तर, उन्मेष पाटील यांनी सकाळी यावं त्यांना सर्व हिशोब देऊ, असं आव्हान गुलाबराव पाटील यांनी दिलं. गुलाबराव पाटील यांनी यावेळी गिरीश महाजन यांच्यावर देखील टीका केली.

गुलाबराव पाटील सोंगाडे मंत्री झाल्याचा आरोप

शेतकरी नुकसान भरपाई यादीत जळगाव जिल्ह्याचे नाव नाही,हे गुलाबभाऊ झोपा काढता काय? त्यांना लाज वाटली पाहिजे, असा सणसणीत टोला भाजप खासदार उन्मेष पाटील यांनी लगावला. गुलाबराव पाटील हे पालक आहेत का बालक आहेत, असा सवाल उन्मेष पाटील यांनी केला. शेतकरी मोर्चामध्ये बोलताना ते म्हणाले, गिरीशभाऊ महाजन मंत्रिमंडळात असताना जिल्ह्यात सिंचनासाठी पैसे आणले.परंतु, पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी एक पैसाही आणला नाही. एक वेळ या गुलाबभाऊंचा आवाज असायचा ते शिंगाडा मोर्चा काढायचे मात्र आता ते सोंगाडे मंत्री झाल्याचा आरोप उन्मेष पाटील यांनी केला. गुलाबराव पाटील मोर्चे काढायचे त्यावेळी ते खऱ्या अर्थाने वाघ वाटत होते.मात्र, आता सरकारमध्ये त्या वाघाची शेळी झाली आहे, अशी टीका भाजपच्या खासदारांनी केली. या मंत्र्यांना गावगावात फिरू देवू नका, असं आवाहन देखील उन्मेष पाटील यांनी केली.

गुलाबराव पाटलांच्या नादी लागू नका, नारायण राणे देखील थकले

भाजप खासदार आमच्यावर टीका करतात पण. त्यांनी एक स्वच्छतागृह बांधल्याचे दाखवावे, असं आव्हान गुलाबराव पाटील यांनी उन्मेष पाटील यांनी दिलं आहे. भारतीय जनता पार्टीचे खासदार उन्मेष पाटील यांच्यावर टीका करताना ते म्हणाले ,आम्ही दोन वर्षात काय केले असे भाजप खासदार उन्मेष पाटील विचारतात परंतु मी त्यांना विचारतो खासदार झाल्यावर खासदार निधीतून एक तरी स्वच्छतागृह बांधलं काय? हे दाखवून द्यावे, असं आव्हान गुलाबराव पाटील यांनी दिले.

उन्मेष पाटील यांना खासदार म्हणून आपण निवडून दिले आहे.आमदार किशोर पाटील तर तयारच नव्हते पण आपण त्यांना तयार केले आहे. त्यामुळे आपल्यावर टीका करताना त्यांनी विचार करावा आपण नारायण राणे यांच्या सारख्यांना पुरून उरलो आहोत त्या मुळे तुम्ही तर माझ्या पुढे कुठेच लागत नाही, असा इशाराच गुलाबराव पाटील यांनी दिला. आमदार किशोर पाटील यांच्या कार्याबाबत बोलताना ते म्हणाले, हे शेतकरी हितासाठी कायम आवाज उठवत असतात. नगरविकास विभागाकडून ही त्यांनी मोठ्या प्रमात निधी आणून शहराच्या विकास साधला असल्याचे गुलाबराव पाटील यांनी सांगितले.

इतर बातम्या:

‘खासदाराला साधा अर्ज भरता येत नाही, याला काय म्हणावं’, गुलाबराव पाटलांचा रक्षा खडसेंना टोला

‘भाजपनं बेईमानी केली नसती तर उद्धवसाहेबही बेईमान झाले नसते’, गुलाबराव पाटलांची भाजपवर सडकून टीका

Unmesh Patil and Gulabrao Patil slam each other over relief fund to farmers of Jalgaon

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.