Prakash Ambedkar: आंबेडकरांच्या ‘अकोला पॅटर्न’ची पुन्हा चर्चा, शिवसेना, भाजपसह पाच पक्षांना धक्का देत जिल्हापरिषदेत प्रचंड विजय

Prakash Ambedkar: विशेष म्हणजे अनुसूचित जातीसाठी हा मतदारसंघ राखीव होता. या मतदार संघात शिवसेना, राष्ट्रवादी आणि प्रहार युतीने मुस्लिम समाजात विवाह केलेली बौद्ध महिला आणि काँग्रेसने देखील बौद्ध उमेदवार दिला होता.

Prakash Ambedkar: आंबेडकरांच्या 'अकोला पॅटर्न'ची पुन्हा चर्चा, शिवसेना, भाजपसह पाच पक्षांना धक्का देत जिल्हापरिषदेत प्रचंड विजय
आंबेडकरांच्या 'अकोला पॅटर्न'ची पुन्हा चर्चा, शिवसेना, भाजपसह पाच पक्षांना धक्का देत जिल्हापरिषदेत प्रचंड विजयImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jun 17, 2022 | 4:43 PM

अकोला: वंचित बहुजन आघाडीचे (vba) सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांच्या अकोला पॅटर्नची पुन्हा एकदा राज्यात चर्चा सुरू झाली आहे. त्याला कारणही तसंच घडलं आहे. प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांच्या नेतृत्वाखाली हातरुण लोहारा जिल्हा परिषद पोटनिवडणुकीत वंचितच्या उमेदार लिनाताई सुभाष शेगोकर 1700 मतांनी विजयी झाल्या आहेत. मागील निवडणूकीत शिवसेनेने (shivsena) 98 मतांनी जिंकलेली ही जागा विक्रमी मतांनी वंचितने खेचून आणली आहे. सोशल इंजिनीयरिंग करून प्रकाश आंबेडकर यांनी या मतदारसंघात फिल्डिंग लावली. आपलं म्हणणं मतदारांपर्यंत पोहोचवण्यात वंचितच्या उमेदवार यशस्वी ठरल्या आणि वंचितने ही जागा लिलया जिंकली. त्यामुळे या आंबेडकरांच्या अकोला पॅटर्नची चर्चा जोरदार सुरू झाली आहे. आता हाच पॅटर्न आंबेडकर आगामी पालिका निवडणुकांमध्ये लढवणार का याकडेही सर्वच राजकीय पक्षांच्या नजरा खिळल्या आहेत.

विशेष म्हणजे अनुसूचित जातीसाठी हा मतदारसंघ राखीव होता. या मतदार संघात शिवसेना, राष्ट्रवादी आणि प्रहार युतीने मुस्लिम समाजात विवाह केलेली बौद्ध महिला आणि काँग्रेसने देखील बौद्ध उमेदवार दिला होता. भाजपने हिंदू कार्ड म्हणून मातंग समाजाच्या उमेदवार दिला होता. एकंदरीत भाजपा विजयी व्हावी अशीच सेटिंग होती. पाच पक्ष विरुद्ध वंचित अशी ही लढत होती. काल झालेल्या मतदानात 9500 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. त्यानंतर मतमोजणी पार पडली. यात वंचित बहुजन आघाडीच्या लीला शेगोकार या 4301 मते मिळवून विजयी झाल्या. तर सेनेच्या अश्विनी गवईंना 2660 मते मिळाली असून भाजपच्या राधिका पाटेकर यांना 2091 तर काँग्रेसच्या रसिका इंगळे यांना 362 आणि अपक्ष उमेदवाराला 39 मते मिळाली. या निवडणुकीत काँग्रेस उमेदवाराचा नुसताच पराभव झाला नाही तर त्याचं डिपॉझिटही जप्त झालं आहे.

हे सुद्धा वाचा

वंचितला पराभूत करण्याचा घाट

तर वंचितला पराभूत करण्यासाठी सेना, भाजप, राष्ट्रवादी, काँग्रेस आणि प्रहार या पाच पक्षांनी छुपी युती केली होती. शिवसेनेला नाही जमले तर भाजपकडे मते वळवून वंचितच्या उमेदवाराला पराभूत करायचा घाट या पाचही पक्षांनी घातला होता. तर वंचितच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी जोरदार प्रचार करत ही निवडणूक सूक्ष्म नियोजन आणि आक्रमक प्रचाराच्या बळावर जिंकली. वंचितने पाच राजकीय पक्षांना पराभूत करण्याची किमया घडविली आहे.

अजून एक पोटनिवडणूक

अकोल्यात अजून एक पोटनिवडणूक होणार आहे. व्याळा जिल्हा परिषदेत शिवसेनेचा आणखी एक सदस्य अपात्र ठरला आहे. त्यामुळे या ठिकाणी पोटनिवडणूक होत आहे. विशेष म्हणजे हा मतदारसंघही अनुसूचित जातीसाठी राखीव आहे. त्यामुळे आता या पोटनीवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या पोटनिवडणुकीतही आंबेडकरांचा अकोला पॅटर्न चालणार का हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.