Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video | रेल्वे ट्रॅकवर 10 वर्षीय मुलाचा अपघात, जिवाची बाजी लावत रुग्णालयात केले दाखल, पोलीस शिपायाचे कौतूक

रेल्वे पोलिसांच्या कार्यतत्परतेमुळे वसई रेल्वे स्थानकावर एका दहा वर्षीय मुलाचे प्राण वाचले आहेत.

Video | रेल्वे ट्रॅकवर 10 वर्षीय मुलाचा अपघात, जिवाची बाजी लावत रुग्णालयात केले दाखल, पोलीस शिपायाचे कौतूक
VASAI RAILWAY POLICE VIRAL VIDEO
Follow us
| Updated on: Jul 21, 2021 | 11:37 PM

पालघर : रेल्वे पोलिसांच्या कार्यतत्परतेमुळे वसई रेल्वे स्थानकावर एका दहा वर्षीय मुलाचे प्राण वाचले आहेत. रेल्व रुळावर पडल्यामुळे हा मुलगा जखमी झाला होता. रेल्वे पोलिसात शिपाई असलेल्या ठाणाबीर यांनी त्याला तत्काळ रुग्णालयात दाखल केल्यामुळे त्याचे प्राण वाचले आहेत. जखमी झालेल्या युवकाचे नाव मलेशी देवाप्पा एलगी असून 20 जुलै रोजी ही घटना घडली. (Vasai railway police saved 10 year old boy who got accident on railway track)

वसई रेल्वे स्थानकावर आल्यानंतर मुलाचा अपघात 

मिळालेल्या माहितीनुसार 20 जुलै रोजी मलेश एलगी नावाचा दहा वर्षांचा मुलगा सकाळी 11.15 वाजता चर्चगेट ते विरार दरम्यान स्लो लोकल ट्रेनमधून आला होता. यावेळी वसई रेल्वे स्थानकावर आल्यानंतर हा मुलगा अपघाताने रेल्वे रुळावर पडला. यामध्ये त्याला गंभीर दुखापत झाली. हा प्रकार समजल्यानंतर रेल्वे पोलिसातील एका शिपायाने घटनास्थळी धाव घेतली.

धावत जात पोलीस शिपायाने मुलाला दवाखान्यात दाखल केले 

प्लॅटफॉर्मवर गस्तीवर असणाऱ्या या पोलीस शिपायाने मलेश एलगी याला रुळामधून बाहेर काढले. त्यासाठी या पोलीस शिपायाने प्रवाशांची मदत घेतली. त्यानंतर कुठल्याही मदतीची वाट न पाहता या पोलीस शिपायाने लहानग्याला हातात उचलले. तसेच प्लॅटफॉर्मवरुन धावत जात पोलीस शिपायाने लहान मुलाला जवळच्या रवी हॉस्पीटलमध्ये उपाचराकरीता दाखल केले.

पाहा व्हिडीओ :

पोलीस शिपाई ठाणाबीर यांचे कौतूक 

सध्या या मुलाची प्रकृती स्थिर आहे. मुलगा भाईंदरच्या उत्तर रोडवरील, मुडदा खाडीजवळील झोपडपट्टीत राहतो. त्याची आई मरियम्मा देवाप्पा एलगी ही वसई विरार क्षेत्रात भाजीविक्रीचा व्यवसाय करते. तो आईला शोधण्यासाठी वसईला उतरत होता. त्यावेळी ही दुर्घटना घडली होती. मुलाला तत्काळ मदत मिळाल्याने त्याचे प्राण वाचले आहेत. त्यामुळे सध्या पोलीस शिपाई ठाणाबीर यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

इतर बातम्या :

VIDEO: दोन डोस घेतलेल्यांना बाहेर पडू द्या; अजित पवार मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंशी चर्चा करणार

Video | अन्ना दुराईंच्या रिक्षात आयपॅडसह टीव्ही, पेपर, मासिके, स्नॅक्स अन् बरंच काही, व्हिडीओ एकदा पाहाच

Video | खारुताई-मांजरीमध्ये जबरदस्त मारामारी, व्हायरल व्हिडीओ एकदा पाहाच

(Vasai railway police saved 10 year old boy who got accident on railway track)

प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार
प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार.
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक.
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा.
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला.
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी.
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण.
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार.
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार.
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात.
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत.