Video | ही पहा शपथविधी पहायला चाललीय.. राज्यातल्या राजकीय नाट्यावरून चिपळूणच्या मगरीवर भन्नाट प्रतिक्रिया
गोवळकोट येथे दोन दिवसांपूर्वी एक मोठी मगर चक्क रस्त्यावर चालत होती. मगरीला असे चालताना बघून लोकांनी आपली वाहने दूरच उभी केली. मगरीला असा प्रकारे चालताना बघून अनेकांना व्हिडीओ शूट करण्याचा मोह आवरला नाही. मग काय प्रत्येकजण रस्त्यावर आपल्या जीव मगरीपासून वाचवत मोबाईलमध्ये व्हिडीओ शूट करत होता.

मुंबई : चिपळूण (Chiplun) येथे गेल्या काही दिवसांपासून पावसाने जोरदार हजेरी लावलीयं. चिपळूणच्या वाशिष्ठी नदीपात्रात मगरींचा वावर कायम असतो, अनेकदा मगरी पाण्याच्या बाहेर नदीच्या किनाऱ्यावर देखील दिसतात. मात्र, चिपळूण तालुक्यातील गोवळकोट येथे दोन दिवसांपूर्वी थेट रस्त्यावरच मगर (Crocodile) दिसली. विशेष म्हणजे मगर अगदी आराम रस्त्यावरून हळूहळू चालत होती. मात्र, असे अचानक मगरीला रस्त्यावर बघून अनेकांचे हृदयाचे ठोके वाढले. मगरीचा हा रस्त्यावरील चालताना व्हिडीओ (Video) सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होताना दिसतो आहे.
इथे पाहा मगरीचा व्हायरल होणारा व्हिडीओ
गोवळकोटच्या रस्त्यावर मगरीचा मुक्तसंचार
गोवळकोट येथे दोन दिवसांपूर्वी एक मोठी मगर चक्क रस्त्यावर चालत होती. मगरीला असे चालताना बघून लोकांनी आपली वाहने दूरच उभी केली. मगरीला असा प्रकारे चालताना बघून अनेकांना व्हिडीओ शूट करण्याचा मोह आवरला नाही. मग काय प्रत्येकजण रस्त्यावर आपल्या जीव मगरीपासून वाचवत मोबाईलमध्ये व्हिडीओ शूट करत होता. हा चिपळूणचा मगरीचा व्हिडीओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरला आहे. सोशल मीडियावरती फक्त या रस्त्यांनी जाणाऱ्या मगरीचीच चर्चा सुरू आहे.



मगरीच्या व्हिडीओवर यूजर्सच्या मजेदार कमेंट
विशेष म्हणजे सोशल मीडियावर मगरीच्या या व्हिडीओखाली यूजर्सने मजेदार कमेंट केल्या आहेत, काही जणांचे म्हणणे आहे की, पाण्यात राहून हिला नक्कीच बोर झाल्याने फेरफटका मारण्यासाठी ही रस्त्यावर आलीयं. एका युजर्सने मजेदार कमेंट करत म्हटंले की, बहुतेक शपथविधीसाठी मुंबईला ही निघाली असणार. अनेक लोकांनी या व्हिडीओला लाईकही केले आहे, तर काहींना गोवळकोट गावातील नागरिकांना रस्त्यांनी जाताना काळजी घेण्याचे आवाहन देखील केले आहे.