लसीकरण कमी झाल्यास गावचे सरपंच पद धोक्यात; जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांचा इशारा
याबाबत सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्याकडे तसा स्वामी यांनी प्रस्ताव देखील पाठवला आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी स्वामी यांनी इशारा दिल्यानंतर सोलापूर जिल्ह्यातील सरपंचांचे धाबे दणाणले आहेत.
पंढरपूर : ज्या गावात कोरोना लसीकरण कमी होईल अशा गावातील सरपंचांना जबाबदार धरून त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई केली जाईल, असा इशारा सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी दिला आहे. सोलापूर जिल्ह्यात आतापर्यंत 64% लसीकरण पूर्ण झाले आहे. यामध्ये जिल्ह्यातील 77 ग्रामपंचायतींचे 100% लसीकरण झालेले आहे अन्य गावांमध्ये मात्र लसीकरणाचा वेग फारच कमी आहे. लसीकरण वाढवावे यासाठी जिल्हा परिषदेकडून प्रत्येक गावांमध्ये दिवाळीपूर्वी तीन दिवसांचा मेगा लसीकरण कॅम्प घेण्यात येणार आहे. (Village Sarpanch’s post in danger if vaccination is reduced, Chief Executive Officer of Zilla Parishad warned)
लसीकरण शिबिरात ज्या ग्रामपंचायतींचा सहभाग कमी असेल किंवा लसीकरण अत्यंत कमी होईल अशा ग्रामपंचायतींच्या सरपंचांना जबाबदार धरून त्यांच्यावर साथरोग नियंत्रण कायद्यांतर्गत अपात्रतेची कारवाई केली जाईल. याबाबत सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्याकडे तसा स्वामी यांनी प्रस्ताव देखील पाठवला आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी स्वामी यांनी इशारा दिल्यानंतर सोलापूर जिल्ह्यातील सरपंचांचे धाबे दणाणले आहेत. मुख्याधिकारी स्वामी यांनी पंढरपुरात येऊन लसीकरणाचा आढावा घेतला.
रत्नागिरीत पुन्हा वाढतेय रुग्णसंख्या
रत्नागिरी जिल्ह्यात पुन्हा एकदा कोरोना रुग्ण संख्या वाढलेली पहायला मिळतेय. गेल्या चोवीस तासात जिल्ह्यात 17 नवे रुग्ण आढळून आलेत. मात्र गेल्या दोन दिवसांपासून कोरोनामुळे एकही मृत्यू झाल्याची नोंद नाहीय. त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील कोरोनाचा मृत्यू दर कमी होतोय असंच चित्र पहायला मिळतंय.
नागपुरात जिल्हाधिकाऱ्यांचे कोरोना नियम पाळण्याचे निर्देश
वर्षातील सर्वात मोठा म्हटला जणारा दिवाळी हा सण काही दिवसांवर आलाय. सध्या कोरोना रुग्णांची संख्या कमी झाल्यामुळे निर्बंध शिथील करण्यात आले आहेत. आतापर्यंतचे सर्व सण साध्या पद्धतीने साजरे करण्यात आले असून आता दीपावली हा सण कसा साजरा करावा यासाठी नियमावली जारी करण्यात आली आहे. नागपुरात दिवाळी उत्सवासंदर्भात जिल्हाधिकारी विमला आर. यांनी निर्देश दिले आहेत.
फटाके फोडणे टाळावे, दिव्यांची आरास करा
दिवाळी उत्सव घरगुती आणि मर्यादित स्वरूपात साजरा करावा. यावर्षी फटाके फोडणे टाळावे. तसेच दिव्यांची आरास करून उत्सव साजरा करा. दिवाळी पहाट कार्यक्रमाचे आयोजन करताना गर्दी होणार नाही याची काळजी घ्या. तसेच कोरोना प्रतिबंधात्मक सूचनांची अंमलबजावणी करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी विमला आर. यांनी दिले आहेत. (Village Sarpanch’s post in danger if vaccination is reduced, Chief Executive Officer of Zilla Parishad warned)
MPSC : राज्य सेवा पूर्व परिक्षेची फॉर्म भरण्याची मुदत वाढवलीhttps://t.co/BYFcn6GNee#MPSC |#PreExam |#StateService |#FormFilling |#Extend
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 30, 2021
इतर बातम्या
गाई-म्हशी खरेदीसाठी सरकार देतेय 45000 अनुदान, पोल्ट्री फार्मसाठी पैसे घ्या अन् असा करा अर्ज
‘आर्यन खाननंतर वेळ मिळाला तर राज्यातील शेतकऱ्यांकडे पाहा’, विनायक मेटेंचा ठाकरे सरकारवर निशाणा