जितेंद्र आव्हाड म्हणतात, राष्ट्रवादीला सर्व मार्ग खुले; विनायक राऊत म्हणाले, बंधन नाही

| Updated on: Dec 11, 2021 | 5:01 PM

राष्ट्रवादीला आघाडीचे सर्व मार्ग खुले आहेत. भाजपही फारसा दूर नाही, असं विधान राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केलं आहे. त्याला शिवसेना नेते विनायक राऊत यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

जितेंद्र आव्हाड म्हणतात, राष्ट्रवादीला सर्व मार्ग खुले; विनायक राऊत म्हणाले, बंधन नाही
vinayak raut
Follow us on

मुंबई: राष्ट्रवादीला आघाडीचे सर्व मार्ग खुले आहेत. भाजपही फारसा दूर नाही, असं विधान राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केलं आहे. त्याला शिवसेना नेते विनायक राऊत यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. आघाडी केली म्हणजे सर्वांनी शंभर टक्के आघाडीत आलंच पाहिजे असं काही नाही. कुणालाही कसलेही बंधन नाही, असं शिवसेना नेते विनायक राऊत यांनी म्हटलं आहे.

विनायक राऊत यांनी टीव्ही9 मराठीशी संवाद साधताना ही प्रतिक्रिया व्यक्त केली. जितेंद्र आव्हाड हे अभ्यासू आणि सुज्ञ नेते आहेत. महाविकास आघाडीच्या माध्यमातून सर्वच निवडणूका लढवल्या पाहिजेत या विचाराचे ते आहेत. मात्र कुठे काही वैचारिक मतभेद किंवा गॅपिंग असेल तर ती नक्कीच दूर केली जाईल. परंतु कोणत्याही परिस्थितीत मोठ्या निवडणूका या महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढवल्या जाव्यात असं सर्वांचे मत आहे, असं राऊत म्हणाले.

आव्हाड-भाजपमधील अंतर किती? मला माहीत नाही

महाविकास आघाडीतील सर्वच पक्ष हे स्वतंत्र आहेत. त्यांना कोणी बंधन केलेलं नाही. मात्र प्रत्येकजण परिस्थितीनुसार युती-महायूती करतील आणि भविष्यातील निवडणूका लढवतील. कोणावर बंधनं नाहीत. सत्ता स्थापन झाली म्हणजे शंभर टक्के महाविकास आघाडीत आलचं पाहिजे असं बंधन नाही, परंतु एक संकेत आहेत. सर्वाना वाटतं महाविकास आघाडीच्या माध्यमातून निवडणूका झाल्या तर चांगलं होईल, असं सांगतानाच भाजप आणि जितेंद्र आव्हाड यांच्यातील अंतर मी पाहीलेलं नाही. किती आहे ते नेमकं? असा टोला राऊत यांनी लगावला.

महाराष्ट्रा एवढी संसद सोपी नाही

यावेळी त्यांनी केंद्रीय सुक्ष्म, लघु, मध्यम उद्योग मंत्री नारायण राणेंवरही टीका केली. लोकसभेत खासदार कन्नीमोळी यांनी राणेंना एक प्रश्न विचारला होता. त्यांना हा प्रश्न इंग्रजीत विचारला होता. राणेंचीही लोकसभेत बोलण्याची पहिलीच वेळ होती. त्यामुळे त्यांचा अभ्यास तेवढा झाला की नाही माहीत नाही. त्यामुळे त्यांना लोकसभेत व्यवस्थित उत्तर देता आले नाही. त्यांना प्रश्न समजला नसावा. पण मी यावर फार टीकाटिप्पणी करणार नाही. जेवढा महाराष्ट्र सोपा आहे, तेवढीच देशाची संसद सोपी आहे असं कुणी समजू नये, असा टोला त्यांनी राणेंना लगावला.

राणे आपलेच गाववाले

लोकसभेत मला सुध्दा राणेंना प्रश्न विचारता आला असता. पण ते आपलेच गाववाले आहेत. आपण दुर्लक्ष करायला पाहिजे म्हणून मी त्यांना प्रश्न विचारला नाही, असा टोलाही त्यांनी लगावला.

संबंधित बातम्या:

VIDEO: 25 वर्षापूर्वी शरद पवार संघ, गोळवलकर गुरुजी आणि सावरकरांबद्दल काय म्हणाले?; पवारांच भाषण जसंच्या तसं

मुसळधार पाऊस खिडकीत उभा राहून… नव्हे, उभी राहून पाहा… राऊतांची जोरदार कविता, पवारांची हसून दाद

‘लोकसभेत राणेंना इंग्रजीत प्रश्न विचारला गेला, मी ही विचारला असता पण ते आपलेच गाववाले’, विनायक राऊतांचा टोला